Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, May 18, 2018

    स्वच्छ सर्वेक्षणात देशात सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला

    Views

    🔹स्वच्छ सर्वेक्षणात देशात सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला

    केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल जाहीर केला.

    स्वच्छतेच्या कामगिरीत महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील ९ शहरांना स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे, यातील ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार तर ३ शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. देशात सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.

    1) नागपूर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले.

    2) नवी मुंबई हे शहर घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम ठरले आहे.

    3) मराठवाड्यातील परभणी हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिसादात उत्कृष्ट ठरले.

    4) भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

    5) राज्याची राजधानी असलेल्या शहरांना स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर असा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    6) भुसावळ शहरास गतिमान लहान शहर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    7) देशातील विभागनिहाय पुरस्कारात महाराष्ट्राला पश्चिम विभागात ३ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

    8) सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    9) नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजना घाट या शहराला मिळाला आहे.

    10) पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

    No comments:

    Post a Comment