Views
आनंदीबाई गोपाळराव जोशी - (३१ मार्च १८६५ - २७ फेब्रुवारी १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.१८८३ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला.कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली.
जागतिक दिवस
ठळक घटना/घडामोडी
- १८६७: प्रार्थना समाजची स्थापना.
- १९२७: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
- १९९७: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
- २००१: भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.
जन्म/वाढदिवस
- १८४३: बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.
- १८६५: आनंदीबाई गोपाळराव जोशी, पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.
- १९०६: जनरल के. एस. थिमय्या, भारतीय सरसेनापती.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १७२७: सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १९२६: दत्तात्रय बळवंत पारसनीस, इतिहास संशोधक.
- १९४५: फ्रेडरिक बर्गियस, जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता.
- १९७२: मीनाकुमारी, हिंदी चित्रपटअभिनेत्री.
- २०००: डॉ. हरदेव बहारी, हिंदी लेखक आणि शब्दकोशकार.
- २००४: गुरुचरणसिंग तोहरा, अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष.
- २००४: गणपतराव वडणगेकर गुरुजी, कोल्हापूरचे चित्रकार,कलादिग्दर्शक.
No comments:
Post a Comment