Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, December 3, 2017

    सुपरमून म्हणजे काय? आणि तो केव्हा दिसतो? जाणून घ्या...

    Views
      आज -रविवारी दिसणार सुपरमून

         रविवारी, ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ दिसणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हटले जाते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. परंतु रविवारी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. सुपरमून योगाच्या वेळी पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे चौदा टक्के मोठे आणि सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसते, अशी माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

            पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्राला रिचर्ड नोले यांनी सर्वप्रथम १९७९ मध्ये ‘सुपरमून’ असे नाव दिले. रविवारी, ३ डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे. या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी पूर्वेला पौर्णिमेचा चंद्र रोहिणी नक्षत्रात असताना उगवेल. मार्गशीर्ष पौर्णिमा रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्ण होईल. त्यावेळी चंद्रबिंब नेहमीपेक्षा जास्त मोठे आणि तेजस्वी दिसेल. संपूर्ण रात्रभर आकाशात दर्शन देऊन चंद्र सोमवारी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी मावळेल. रविवारी रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्व आकाशात सर्वांना साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन घेता येईल. या आधी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुपरमूनचे दर्शन झाले होते. यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी, १ जानेवारी २०१८ रोजी पौष पौर्णिमेच्या रात्री ‘सुपरमून’ दिसणार आहे. त्यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.

    No comments:

    Post a Comment