Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, December 5, 2017

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनविषयक माहिती

    Views

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनविषयक माहिती

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर .

     जीवनपरिचय

           घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल, 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला .त्यांचे वडील रामजी सपकाळ हे लष्करात सुभेदार होते .लष्करातील नोकरी सोडल्यानंतर रामजी दापोली येथे आले व नंतर सातारा येथे स्थायिक झाले .
    रामजीबाबा हे कबीरपंथी होते .कबीराचे दोहे ऐकविणारे त्यांचे वडील लष्करी बाण्याचे साधुपुरुष होते .आंबेडकरांना आपल्या आईवडिलांचा विलक्षण  अभिमान होता .डाॕ .आंबेडकरांचे विद्यार्जन हे प्रदीर्घ आहे .त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले .तर माध्यमिक शिक्षण सातारा व मुंबई येथे झाले.लहानपणी अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे चटके त्यांना बसले .वर्गातील विद्यार्थी त्यांच्याशी संभाषण करीत नसत पणा वाईट परिस्थितीचा एक चांगला फायदा त्यांना झाला तो म्हणजे त्यांची पुस्तकांशी मैत्री जमली व पुढे ती वाढत गेली .शाळेत एकच मायेचा माणूस भेटला ते म्हणजे आंबेडकर गुरुजी .त्यांनीच डॉक्टरांचे सपकाळ हे आडनाव बदलून आंबेडकर हे नाव त्यांना लावले .आंबेडकरांचे महाविद्यालयीन शिक्षण एलफिन्स्टन कॉलेजमध्ये झाले .बी.ए.झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला .यासाठी त्यांना बडोद्याच्या महाराज्यांनी आर्थिक मदत केली. एम. ए. , पी. एच. डी (कोलंबिया ). , डी. एस. सी. (लंडन )., एलएल.डी. (कोलंबिया ).,  डी.लिट ,बार ॲट लॉ (लंडन ),एवढे विद्यार्जन करुन झाल्यावर बडोदे संस्थांनात मिलिटरी सेक्रेटरी म्हणून व नंतर मुंबई येथे अर्थशास्त्र व कायदा या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले .काही दिवस वकिलीचा  व्यवसाय केला .नंतरचे आयुष्य समाजकारण व राजकारण यात व्यस्त झाले .जुन्या मुंबई राज्यात विधिमंडळाचे सदस्य ,भारतीय संसदेचे सदस्य ,घटनासमितीचे अध्यक्ष ,कायदामंत्री अशी अनेक पदे त्यांनी भुषविले .

     शिक्षणविषयक विचार 

          शिक्षणातूनच दलितांचा विकास होईल यावर त्यांचा विश्वास होता .डॉ.आंबेडकरांच्या मते , शिक्षण हे दलितांच्या उत्थानाचे व सामाजिक क्रांतीचे अत्यंत प्रभावी साधन आहे .शिक्षणातून प्रथम व्यक्तींपरिवर्तन व त्याद्वारे समाजपरिवर्तनास चालना मिळते .त्यांनी आपल्या बांधवांना
     'शिका ,संघटित व्हा व संघर्ष करा " 
         हा संदेश दिला. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार हा राष्ट्र प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे हे स्पष्ट करुन त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे यासाठी आग्रह धरला. लोकांच्या खुशीवर शिक्षण ही बाब सोपविल्यास प्राथमिक शिक्षणाचा प्रसार होण्यास कित्येक वर्ष लागतील म्हणून शिक्षण हे शासनाच्या हाती असावे .सक्तीच्या शिक्षणाची अंमलबजावणी शासन योग्य प्रकारे करेल असे विचार त्यांनी व्यक्त केले आहेत .त्यांनी विद्यापीठात दिल्या जाणाऱ्या शिक्षणासंबधी प्रतिपादन करतांना हे शिक्षण समाजाभिमुख असावे असे म्हटले आहे .शिक्षणाचा उद्देश केवळ माहिती पुरविणे नसुन विद्यार्थ्यांचे व्यक्तींमत्व विकसित होईल ,त्यांच्या मानसिक व बौद्धिक क्षमतांची वाढ होऊन ते विद्वानांच्या विचारांचे टीकात्मक परिक्षण करण्यास समर्थ होतील ,तसेच कोणत्याही विषयासंबधी जिज्ञासा निर्माण होऊन त्याद्वारे सखल अध्ययनाचा विकास करणे हा उद्देश आहे .पदवी म्हणजे ज्ञान नसून ते केवळ ज्ञानार्जनाचे साधन आहे .याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे .डाॕ आंबेडकरांनी स्रियांचे शिक्षण पुरुषांच्या बरोबर एकत्र असले पाहिजे असे मत व्यक्त करुन सहशिक्षणाचा पुरस्कार केला आहे .दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी ' भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ' याची स्थापना केली .मुंबई व औरंगाबाद येथे शैक्षणिक संस्था स्थापन केल्या .

    सामाजिक कार्य 

    समाजातील इतर घटकांप्रमाणेच दलितांना सामाजिक व राजकीय अधिकार प्राप्त व्हावेत यासाठी त्यांनी प्रखर लढा दिला .सामाजिक आंदोलनांद्वारे त्यांनी दलितांचे प्रश्न समाजासमोर मांडले .दलित वर्गात आपल्या सामाजिक ,धार्मिक व राजकीय हक्कांबद्दल जागृती निर्माण केली .धर्मशास्र व रुढींवर त्यांनी प्रचंड टीका केली.1926साली कायद्याने सार्वजनिक पाणवठा सर्वांसाठी खूला केला पण समाजात त्याचे आचरण घडेना .यासाठी आंबेडकरांनी सत्याग्रह करुन 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क आपल्या अनुयांयासह बजावला .सामाजिक विषमतेला व दलितांच्या हीन परिस्थितीला कारणीभूत असलेल्या "मनुस्मृती" चे त्यांनी दहन केले .दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला व दलितांमध्ये आपल्या हक्कांबद्दल जागृती ,चेतना व ईर्षा निर्माण केली . त्यांनी दलितांना राजकीय हक्क मिळावेत यासाठीही प्रयत्न केले . मतदानाचा अधिकार ,कायदेमंडळात प्रतिनिधित्व , शासनात सहभाग इत्यादी अधिकार दलितांच्या विकासासाठी महत्त्वाचे होते .हा हेतू पूणे करार यातून साध्य झाला .सन 1936 मध्ये कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी "स्वतंत्र मजूर पक्ष" स्थापन केला.आपल्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी "मूकनायक" , "बहिष्कृत भारत" ,"जनता" ही वृत्तपत्रे सूरु केली व त्याद्वारे समाजात जागृती घडविली. सामाजिक व राजकीय कार्य करण्याच्या हेतूने "शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन" ची स्थापना केली. हिंदू धर्मात मिळालेल्या विषमतेच्या वागणूकीमूळे डाॕ .आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करुन आपल्या अनुयांयासह 14 आॕक्टोबर ,1956 रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.कायदा ,चळवळ व आत्मनिर्भरता याद्वारे त्यांनी दलितांमध्ये जागृती केली .डाॕ आंबेडकरांनी दलितांना हक्क तर मिळवून दिलेच पण त्याच बरोबर त्यांना अस्मिता व स्वतंत्र अस्तित्व ही प्राप्त करुन दिले .संविधान लिहिल्या नंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु

    संविधान  म्हणजे भारताचा आत्मा ;

    1 - विश्वरत्न  डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ??  ;
    394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर
    2- महात्मा फुले यांनी  बहुजन समाजाला  शिक्षण  ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले ; शाळा चालू केले ; त्या शाळेचा क्रमांक 395 होता ; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले  

    3 - संविधानाच्या या मसूदा समितीवर  सात लोकांची निवड करण्यात आली होती
    त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला ; एकाचा मृत्यू झाला; एक विदेशात गेला ; एकाची तब्येत ठीक नव्हती;  एक राजकारणात अडकला

    4- त्या मुळे मसुदा समिती अध्यक्ष या म्हणून  संविधान लिहण्याची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येवून पडलीय व ती त्यांनी समर्थपणे एकट्यानेच  पार पाडली म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे "संविधानाचे शिल्पकार" आहेत  

    5-संविधानाची सुरूवात कशी करावी ? यावरून वाद चालू होता
    त्यात मौलाना हजरत मोहली म्हणून लागले की ;संविधान "अल्लाहच्या "नावाने सुरू करावे
    पंडीत मालवीय म्हणाले की; "ओम नम शिवाय" यां नावाने सुरू करा
    एच :पी :कामत म्हणाले की -"ईश्वर "नावाने सुरू करा
    मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " लोक" नावाने सुरू करा
     मग या वर मतदान झाले
    मग बाबासाहेब आंबेडकर यांना 68 मते पडली
    तर देवाच्या नावाने 41 मते पडलीय
    संविधानाची सुरुवात  "आम्ही भारताचे लोक "
    या नावाने झाली ;

    पहिल्याच मतदानात दगडाचे देव हरले व माणूस जिंकला

    6 - संविधानाचा कच्चा मसूदा बाबासाहेब आंबेडकर घरी लिहत बसले होते ;
    त्या वेळी  बॅ: पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले

    7- यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यां चे स्वागत केले ;
    तसेच संविधानाचा लिहत असलेला कच्चा मसूदा  बॅ: पंजाबराव देशमुख  यांना दाखवून  म्हणाले ; "की दादा यावर थोडी नजर मारा व काही सूचना असतील तर सूचवा " मी थोडयावेळात येतो"
     असे म्हणून बाबासाहेब बाहेर गेले

    8- परत आले तर बॅ :देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू पाहून बाबासाहेब  म्हणतात की दादा तुम्ही का  रडताय ?
     यावर देशमुख यांनी सांगितले की  बाबासाहेब  " माझ्या मराठा कुणबी समाजाच्या आरक्षणाची तरतूद करा " हे सांगण्यासाठी बाबासाहेब मी तुमच्याकडे  आलो होतो;
    पण तुम्ही किती महान आहात की मी येण्याच्या अगोदरच तुम्ही तो मसूदा तयार करून ठेवलाय ; यामुळे मला आनंदाश्रू आवरत नाहीत

    9- महात्मा फुले यांनी असे भाकित केले होते की ज्या वेळी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल ; त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही ;
    पहा बाबासाहेबानी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ जाहीरपणे जाळला व फुलेचा विश्वास खरा केला व फुले यांनी म्हटले होते की दुसरा राजग्रंथ निर्माण 
    करेल ;
    मग तो राजग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान  लिहून पूर्ण केला  

    10 - अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठाने एक अहवाल तयार केला की त्या कालेजमधे शिकुन गेलेल्या 200 वर्षाच्या इतिहासात जगात सर्वात विदवान कोण ?  त्यांनी जाहीर केले होते की जगात  डाॅ :बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न ; विदवान आहेत ; father of modern India is Dr  ambedkar

    11- कोलंबिया विद्यापीठाच्या मैदानात बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविला आहे व त्यात खाली लिहले होते की    "SYMBOL OF KNOWLEDGE "

    12- तेथील  कुलगूरूच्या कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे
    व खाली लिहिले आहे की "आम्हाला गर्व आहे की आमच्या काॅलेजमधे शिकून गेलेला आमचा विद्यार्थी एका देशाचा संविधान शिल्पकार ठरला  "

    13- नेल्सन  मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखा एकच गोष्ट ती म्हणजे आंबेडकर यांनी लिहलेले संविधान  

    14 - संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर  एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की डाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान लिहताना काही अडचण येत होती का ? यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी लगेच उत्तर दिले, की माझ्या  डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते
    म्हणून मला अडचण आली नाही  "

    15-बाबासाहेब म्हणाले की संविधान कितीही चांगलेच असू दया पण राबवणारे हात वाईट असेल तर ते संविधान  कुचकामी ठरते  ; म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हताश मनाचा मानबिंदू म्हणजे संविधान  

    16- संविधान  लिहून झाल्यावर  बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या वेळी तेथील पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून तुम्ही नाराज का आहात ? यावर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की ; " मी बहुजनाच्या  कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत " ;
    मला यांच्यावर विश्वास बसत नाही  की ते संविधान  जशाच्या तसे लागू करतील


    रत्नागिरी जिल्हा फणस, आंबा यांसारख्या  फळांच्या रत्नाचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्याने लोकमान्य टिळक, साने गुरुजी यान सारख्या थोर नररत्नांना जन्म दिला. रत्नागिरी जवळ आंबवडे नावाचे खेडे आहे. तेथे रामजी सपकाळ नावाचा सरदारी बाण्याचा, जातीने माहार आचरणाने व विचाराने सुसंस्कृत असलेला इसम राहत होता वयाच्या अठराव्या वर्षी त्याने लष्करात प्रवेश केला. शिक्षणाची आवड असल्याने नोकरी बरोबर त्याचे शिक्षणही चालूच होते. लष्करातील मेजर मुरवाडकर यांची थोरली मुलगी भीमाबाई हि रामजीची बायको. भीमा बाई दिसण्यास सुरेख होती. स्पष्टवक्तेपणा मुळे तिचा सर्वांवर वचक होता.
     ** अश्या या रामजीचे आणि भिमाबाईचे दिवस आनंदात व मजेत चालले होते. रामजीचे बंधू म्हणजे भिमाबाईचे दीर हे संन्याशि होते. त्यांनी भीमा बाईला भविष्यवाणी केली होती कि तुला महान तेजस्वी मुलगा होईल.  सोमवार दिनांक १४ एप्रिल १८९१ सालची पहाट.अतिशय मंगल पहाट होती ! सूर्य-चंद्र ईत्यादी ग्रहांचा पवित्र मिलाप झाल्याचा तो दिवस होता. तो दिवस भाग्याचा व पुन्न्याचा समजला गेला.त्याच वेळी भीमा बाईला पुत्ररत्न झाले. बाराव्या दिवशी मुलाचे भीमराव असे नाव ठेवण्यात आले.

    **  सन १८१४ मध्ये रामजी मेजर च्या हुद्यावर असताना लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते दापोलीस आले. भीमराव तेथील शाळेत जाऊ लागला. पण मुळात भिमाचा स्वभाव खोडकर असल्या मुळे त्याची भांडणे मिटविणे दिवसें दिवस त्यांना जड होऊ लागले. त्या मुळे तें सातार्यास राहण्यास आले.भिमाचा खोडकर स्वभाव जावा म्हणून त्याला क्यमप मध्ये टाकण्यात आले. सातार्याचे वातावरण भीमा बाई ना लाभदायक नव्हते. त्यांची तब्येत वारंवार बिघडत असे. त्यामुळे त्यांनी कायमचे अंथरून घरले. आणि लवकरच त्या मृत्यू पावल्या. त्यावेळी भीमराव अवघ्या सहा वर्षाचे होते.

    **  इ.सन.१९०० मध्ये भीमराव साताराहायस्कूल मध्ये शिक्षणा साठी आले. ईंगरजी शाळेत प्रवेश झाल्याने भीमाला ती शाळा फारच आवडली. पण शाळेतील वातावरण ….? आपण शिकलेल्या क्य्म्प मधील व येथील शाळेत फार फरक आहे.  हे भीमाच्या चाणाक्ष मनाने ताबडतोब हेरले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईस आले भीमाने तेथे एल्फ़िन्सटन हायस्कुलात प्रवेश केला. जातीने अस्पृश्य असल्याने भीमाला ईच्छा असूनही संस्कृत चा अभ्यास करता आला नाही. पार्शियन भाषेत त्याचा नंबर असे. आनंदाची अभ्यासातील प्रगती बेताचीच असल्याने त्यास नोकरीला लावले. नंतर आनंद व भीमाची लग्ने केली. लग्नाचे वेळी भीमा चौदा वर्षाचा व व रमाबाई वर्षाची होती.

    **  आपल्या मुलालाप्रखर बुद्धी मत्तेची दैवी देणगी लाभलेली आहे हे ओळखून रामजींनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईस पाठविले. हिंदू समाजातील एका अडाणी व क्रूर रूढी मूळे त्या काळी अस्पृश्य गणल्या जाणाऱ्यां जातीत जन्मल्या मुळे शिक्षणात त्यांचा काहीजणांन कडून अपमान व्हायचा पण त्यातही त्यांच्यावर प्रेम करणार्या केळुसकर गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामूळे भीम उत्तम तऱ्हेने दहावी पास झाला. व बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून एल्फ़िन्स्टन कॉलेजात गेला. त्यांच्या चाळीत त्यांचा मोठा सत्कार केला.

    ** १९१२ साली ते बी.ए. झाले बडोद्याच्या महाराजांच्या ऋणातून अल्पसे मुक्त होण्यासाठी त्यानि त्यांचे कडे नोकरीचा अर्ज केला.त्यांना गायकवाडांकडे  नौकरी मिळाली. परंतु वडील आजारी असल्याची तार मिळताच ते मुंबईस निघाले. घरी गेल्यावर समजले मुलाचा चेहरा पाहण्यासाठी वडील आतुर झाले होते.त्यांचा चेहरा पाहताच वडीलांनी त्याच्या वरून प्रमाणे हात फिरविला व व त्या महान पुरुश्याने ह्या जगाचा निरोप घेतला.

    **  त्यानंतर ते अमेरिकेत शिक्षणाकरीता गेले. तेथे एखाद्या तपस्व्या प्रमाणे दिवसाचे १८ तास ते अभ्यासात घालवु लागले.१९१५ साली ते एम. ए. झाले. त्या नंतर त्यांनी २, ३ विषयांवर प्रबंध लिहिले.या कष्टाचे फळ म्हनूण  १९२४ साली ते कोलम्बिया विद्यापीठाने त्यांना “डॉ ऑफ फ़िलॉसॊफ़ी” हि पदवी मिळाली. सरकारी कचेरीत त्यांना मोठ्या हुद्याची जागा मिळत नसे. हाता खालचे लोक देखील त्यांच्या टेबलावर दुरून फाईल टाकीत. मानी भीमरावांना हि वागणूक पसंत नसूनही त्यांचा स्वाभिमान दुखावला जात असे. म्हणून ते मुंबईला परतले. त्यांनी आपला धीर खचू दिला नाही.तरीही खटपट करूनही त्यांनी सिडेनह्यम कॉलेज मध्ये प्राध्यापकाची जागा मिळविली. पैसा जमविला व १९२० साली उरलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा लंडन ला रवाना झाले. तेथे त्यांनी निरनिराळ्या ग्रंथालयात पुस्तके वाचून आणि त्याच बरोबर आभ्यास हि चालू ठेवला. याचे फळ म्हणून त्यांना १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने “डॉ ऑफ सायन्स” हि पदवी दिली.

    ** अस्पृश्य समाजा साठी स्व: काहीतरी करावे असे त्यांना मनापासून वाटे. यामुळे त्यांच्यात एक प्रकारे चैतन्य निर्माण होई.व त्यांनी पाउल पुढे टाकले.पहिली सुरवात म्हणजे त्यांनी १९२० साली त्यांनी सुरु केलेले पाक्षिक पत्र  ‘मूकनायक’ हेच होय. त्यानंतर त्यांनी महाडच्या तळ्यातील सर्वांसाठीच म्हणजे अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते. पाणी हेच जीवन  त्यांच्या पासून हिरावल्या जाते,या साठी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. मार्च १९२७ रोजी सत्याग्रही तळ्याकडे निघाले.माणुसकीचे हक्क व निसर्गाची देणगी हे पाणी मिळवायचेच ईतक्यासाठी आंबेडकर पुढे होऊन सत्याग्रह सुरु झाला. अस्पृश्य म्हणून ज्यांनी मुंबईच्या कॉलेजात पाण्यासाठी हाल सोसलेत, बडोद्याच्या हॉटेल मध्ये ज्यांनी मार खाल्ला ते आंबेडकर खरोखरच सत्याग्रहींचे सेनापती शोभत होते.
    पाण्याचा घोट घेऊन त्यांनी ईतरान्ना पाणी पिण्याची मोकळीक दिली.पुढे पुढे त्यांच्या कार्याची प्रगती होऊ लागली.

    ** पाच वर्षे झगडत राहिल्याने १९३५ साली नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला. याच काळात त्यांनी “बहिष्कृत भारत” नावाचे नियतकालिक सुरु केले. ** आपल्या भारत देश्यात इंग्रजांचे राज्य होते.१५ ऑगष्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्या नंतर भारतातल्या लोकांना विशिष्ट पद्धतीने राज्य कारभार करता यावाया साठी भारताची स्वतंत्र राज्य घटना असणे आवश्यक झाले.त्या दृशीने भारतीय विद्वानांची एक तज्ञ समिती निर्माण करण्यात आली.त्यामध्ये ते प्रमुख होते. त्यांची कायदा मंत्री म्हणून निवड झाली.त्यावेळी घटना लिहिण्याचे काम त्यांच्या कडे देण्यात आले.त्यांनी अहोरात्र कष्ट करून आपल्या अंगी असलेली बुद्धिमत्ता प्राणपणाला लावली १९४८ च्या फ़ेब्रुआरित घटना लिहून पूर्ण केली. त्यामुळे त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून संबोधन्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ पास करून घेतले. अस्पृष्यान साठी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय, व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय  काढलेत.

    ** “पिकते तेथे विकत नाही” आपल्या जवळ असलेल्या माणसाचे गुण आपण जाणू शकत नाही.दूरच्या माणसाला त्याची परख होते. म्हणून १जून १९५२ रोजी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने ‘ डॉ ऑफ लों ‘ हि पदवी देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी  स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकषाही तत्वाचा पुरस्कार करणारे अनेक ग्रंथ लिहिले, भाषणे दिली. आणि आपली द्लीतांबद्दलची भूमिका स्पष्ट केली. शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण या सर्वांमध्ये त्यांनी आपले स्वतंत्र तर्कशुद्ध विचार मांडून दाखविले. दलित समाजात जागृती निर्माण झाली तेव्हा त्यांना ज्ञानाचे महत्व पटले.आजही त्यांच्या नावाने कितीतरी कार्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे कार्यरत आहेत.

    ** त्यांचा हिंदू धर्मातील पाखंडी संतांना विरोध होता. भारत देश्यावर त्यांचे अलोट प्रेम होते. त्यामुळे हिंदू धर्मातून पर धर्मात जाण्याचा विचार करतानाहि भारतातच उगम पावलेल्या आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. नागपुरात त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत १४ आक्टोंबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांचे सर्व आयुष्य कष्टात गेले. जातीने अस्पृश्य असल्याने लहानपणी लोकांकडून त्यांची हेटाळणी झाली. त्यातून मार्ग काढण्या साठी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. व मोठेही झाले त्यामानाने त्यांना हवी असलेली समानतेची वागणूक मिळेना! ती मिळण्या साठी त्यांना अनेक गोष्टीन सोबत झगडावे लागले.  अनेक गोष्टीना तोंड द्यावे लागले. पैश्याच्या अडचणी तून मार्ग काढावे लागले. त्यासाठी त्यांनी उन्हातान्हाची पर्वा न करता अतोनात कष्ट केले. त्यामध्ये साहजिकच त्यांची प्रकृती ढासळत गेली. आणि रक्तदाब, मधुमेह, या रोगाने त्यांचे शरीर थकले.
    •  दलित समाजा साठी अविरत कार्य करणारा आणि शिका, संघटीत व्हा, व संघर्ष करा, असा मुलमंत्र देणारा हा मांनव धम्माचा उपासक आपल्या कर्तुत्वाच्या स्मृती मागे ठेवून ६ डिसेंबर १९५६ रोजी या विश्वाला सोडून गेला. मरणोत्तर त्यांना “भारत रत्न” हा किताब भारत सरकारने बहाल केला. अश्या या थोर पुरुष्याला आमच्या सर्वांचे कोटी कोटी विनम्र अभिवादन !!!

    No comments:

    Post a Comment