डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण, निबंध, सूत्रसंचालन!
🔷जन्म : एप्रिल १४, इ.स. १८९१
🔷महापरिनिर्वाण : डिसेंबर ६, इ.स. १९५६
🔷जन्मस्थान: महू, मध्य प्रदेश
🔷पत्नी: रमाई भीमराव आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर ऊर्फ माई (माहेरच्या शारदा कबीर)
🔷अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर
🔷आई: भिमाई रामजी आंबेडकर
🔷वडील: रामजी मालोजी आंबेडकर
💐 काही अभिमानाच्या गोष्टी 💐
देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, संस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनिय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते. इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (The Greatest Indian) या भारताच्या आंतराराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर १ महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षांमधील जगातल्या सर्वांत प्रभावशाली १०० विश्वमानवांची यादी प्रकाशित केली, त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रगाढ विद्वता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४ विषयांवर प्रभुत्व (मास्टरी) होते, एवढ्या साऱ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत, असे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापिठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापिठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे.भारतीय बौद्धांसाठी डॉ. आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत, ही बौद्ध धर्मातील सर्वोच्छ उपाधी त्यांना नेपाळमध्ये इ.स. १९५४ मध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेसाठी आलेल्या बौद्ध भिक्खुंनी प्रदान केली होती. त्यानंतर इ.स. १९५५ मध्ये दलाई लामा बाबासाहेबांना भेटले तेव्हा लामांनी त्यांना बोधिसत्व संबोधले होते. जातिव्यवस्थेविरूद्ध प्रखर संघर्ष, महान भारतीय संविधान निर्माण अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंतीसुद्धा जगातल्या ६५ पेक्षा अधिक देशांत दरवर्षी साजरी केली जाते.
सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणार्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळवलेल्या आहेत.
🍁भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
🍁सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते.
🍁कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.
🔷सुरुवातीचे जीवन
🍀मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे पुत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.
🍀डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.
🍀इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे मोठे काम आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.
🍀रामजींनी इ.स. १८९८ साली कुटुंब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.
🍀 इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला.
🍀इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरल
🍀अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली.
🍀इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला.
🍀कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.
🎓शिक्षण
📚पदवी-
एम.., पीएच. डी,. डी.एस्सी, एल्एल.डी., बॅरिस्टर अॅट लॉ.
📚प्राथमिक शिक्षण
भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.
🎓उच्च शिक्षण
📚बी.ए.
डॉ. बाबासाहेब तथा बी.आर.आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३मध्ये ते बी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला.
बडोदा संस्थानचे स्कॉलर म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले.
📚एम.ए.
एम.ए.या पदवीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेले होते.
अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळवायचे होते.या विषयांचा सखोल अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठला दि. १५ मे १९१५ रोजी अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २/६/१९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली.
✴आंदोलने
🌀चवदार तळे सत्याग्रह
इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.
🌀काळाराम मंदिर सत्याग्रह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली.
२ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली.
रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी शंकरराव गायकवाडावर सोपवण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.
✏पुणे करार (संक्षिप्त मसुदा)
यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली.
इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या. नथुराम गोडसे सारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे अत्रे यांना दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही. आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांत पराभव केला
🔷शैक्षणिक विचार
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
🔷हिंदू कोड बिल
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भाग्य हिंदुसमाजाचे! आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला.
🔷भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार
स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.
🔷भारतीय घटनेचे शिल्पकार
भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्न करण्यात आले.
१९४६ ला माउंटबॅटनच्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले. हा आयोग संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला. या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. संविधान निर्मितीच्या पूर्वेतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, अन्य कुणापेक्षाही जास्त आहे.
बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार ठरविण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे.
🌀धर्मांतर
बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला.त्या दिवशी अशोकविजयादशमी होती(या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता).हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. महास्थविर चंद्रमणी यांचेकडूनत्रिशरण व पंचशील ग्रहण करून त्यांनी धम्मदीक्षा घेतली.व आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञांद्वारे संदेश दिला.
🌀महापरिर्निवाण
डॉ.आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चात्तापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल.
🙏बाबासाहेब आम्बेडकर🙏
⭐जीवनेतिहास (थोडक्यात)⭐
🔷 १४ एप्रिल इ.स.१८९१
🔶महू गावी जन्म.
🔷 इ.स.१८९६
🔶आई, भिमाईचे निधन
🔷 नोव्हेंबर इ.स.१९०० 🔶सातार्याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
🔷 इ.स.१९०४
🔶एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
🔷 इ.स. १९०६
🔶रमाई यांचेशी विवाह
🔷 इ.स.१९०७
🔶मॅट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
🔷 इ.स.१९०८ जानेवारी 🔶एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
🔷 इ.स.१९१२
🔶मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला.
🔷 इ.स. १९१३
🔶बी.ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
🔷 जून इ.स.१९१५
🔶एम.ए.ची परीक्षा पास झाले.
🔷 जून इ.स.१९१६
🔶कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
🔷 इ.स.१९१७
🔶कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली.
🔷 जून इ.स.१९१७
🔶लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
🔷 इ.स.१९१८
🔶साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
🔷 नोव्हेंबर इ.स.१९१८
🔶सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
🔷 जून ३१ इ.स.१९२०
🔶साप्ताहिक मूकनायक सुरू केले
🔷 मार्च २१ इ.स.१९२०
🔶कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
🔷 जून इ.स.१९२१
🔶लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.
🔷 मार्च इ.स.१९२३
🔶रुपयाची समस्या हा प्रबंध व डी.एस्सी.(अर्थशास्त्र) ही पदवी
🔷२० जुलै इ.स.१९२४
🔶बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
🔷 २० मार्च इ.स.१९२७
🔶चवदार तळे सत्यागृह
🔷एप्रिल ३ इ.स.१९२७
🔶बहिष्कृत भारत नावाचे वृतपत्र सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली
🔷सप्टेबर इ.स.१९२७
🔶समाज समता संघ स्थापन केला.
🔷 इ.स.१९३४
🔶परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
🔷 मे २६ इ.स.१९३५
🔶रमाई भीमराव आंबेडकर यांचे निधन
🔷 ऑक्टोबर १३ इ.स.१९३५ 🔶येवला, येथे धर्मांतराची घोषणा
🔷 ऑगस्ट इ.स.१९३६
🔶स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
🔷 डिसेंबर इ.स.१९४०
🔶थॉट्स ओन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
🔷जुलै इ.स.१९५१
🔶भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
🔷मे इ.स.१९५३
🔶मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
🔷डिसेंबर २५ इ.स.१९५५ 🔶देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना
🔷डिसेंबर 6 , इ.स.1956
🔶महापरिनिर्वाण
🔯 निबंध डॉ बाबासाहेब आंबेडकर 🔯
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.
शैक्षणिक विचार:
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा :
डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.
स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे
कैवारी :
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.
अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय.
No comments:
Post a Comment