जागतिक दिवस
राष्ट्रीय ग्राहक दिन
ठळक घटना, घडामोडी
१९२२ : आयरिश मुक्त राष्ट्राने लेखक आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीचा सदस्य अर्स्किन चाइल्डर्स आणि इतर आठांना बेकायदेशीर रीत्या रिव्हॉल्वर बाळगल्याबद्दल गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
१९४० : दुसरे महायुद्ध-स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
१९४३ : दुसरे महायुद्ध-यु.एस.एस. लिस्कोम बे या युद्धनौकेला टोरपेडो लागून बुडाली. ६५० ठार.
१९४३ : दुसरे महायुद्ध-टोक्योवर ८८ अमेरिकन लढाऊ विमानांनी हल्ला चढवला. जपानी राजधानीवर झालेला हा पहिलाच थेट हल्ला होता.
१९६३ : जॉन एफ. केनेडीचा खून करणाऱ्या ली हार्वे ऑसवाल्डचा डॅलस पोलिस स्थानकात जॅक रुबीने खून केला. योगायोगाने या प्रसंगाचे दूरचित्रवाणीवर देशभर प्रक्षेपण झाले.
१९६५ : जोसेफ डेझरे मोबुटुने काँगोमध्ये उठाव करून सत्ता बळकावली.
१९६६ : टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार.
१९७१ : डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही.
१९७६ : तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी.
जयंती/जन्मदिवस
१६५५ : चार्ल्स अकरावा, स्वीडनचा राजा.
१६९० : हुनिपेरो सेरा, स्पेनचा ख्रिश्चन धर्मप्रसारक.
१७८४ : झकॅरी टेलर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
१८५३ : बॅट मास्टरसन, अमेरिकन गुंड.
१८६९ : अँतोनियो ऑस्कार कार्मोना, पोर्तुगालचा ९७वा पंतप्रधान आणि ११वा राष्ट्राध्यक्ष.
१८७७ : आल्बेन बार्कली, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
१८७७ : कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर.
१८८४ : इत्झाक बेन-झ्वी, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
१८८८ : डेल कार्नेगी, अमेरिकन लेखक.
१८९४ : हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८९९ : टेड बंडी, अमेरिकन मारेकरी.
१९३७ : केशव मेश्राम, मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक.
१९५५ : इयान बॉथम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९६१ : अरुंधती रॉय, भारतीय लेखिका.
१९७८ : कॅथरिन हाइगल, अमेरिकन अभिनेत्री.
No comments:
Post a Comment