Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, November 5, 2017

    एसटी महामंडळाची लिपिक - टंकलेखक पदाची ऑनलाईन परीक्षादि. 7/11/2017 ते 11/11/2017 व 14/11/2017 रोजी  होईल

    Views
    एसटी महामंडळाची लिपिक - टंकलेखक पदाची ऑनलाईन परीक्षा
    दि. 7/11/2017 ते 11/11/2017 व 14/11/2017 रोजी  होईल
    मुंबई (  04 नोव्हेंबर )
                  जानेवारी २०१७ मध्ये एसटी महामंडळामार्फत देण्यात आलेल्या विविध रिक्त पदांच्या जाहिरातीमधील लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ ) या पदाची ऑनलाईन परीक्षा 7नोव्हेंबर ते 11नोव्हेंबर व 14 नोव्हेंबर 2017 रोजी राज्यामधील विविध 54 केंद्रांवर 3 सत्रात (म्हणजे सकाळी ९ ते १०. ३० , दुपारी १२. ३० ते २. ०० व सायंकाळी ४ ते ५. ३० ) घेण्यात येणार आहे.
            या पदाच्या२५४८ रिक्त जागांसाठी १ लाख ३८ हजार अर्ज महामंडळास प्राप्त झाले आहेत. सर्व उमेदवारांना लघु संदेश (एस एम एस ) व ई-मेलद्वारे  परीक्षा स्थळ, परीक्षेची वेळ व तारीख, आसन क्रमांक कळविण्यात आला आहे . तरी, सर्व संबंधित उमेदवारांनी महामंडळाच्या www.msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र  दि.5/11/2017 पासून उमेदवारांनी दिलेल्या e-mail पत्यावर उपलब्ध करून देण्यात येत असून सदर प्रवेशपत्र घेऊन उमेदवारांनी नियोजित परीक्षाकेंद्रावर वेळेवर परीक्षेस उपस्थित राहावे.
           ज्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या परीक्षाकेंद्रांच्या पसंतीक्रमांका व्यतिरिक्त इतर ठिकाणी परीक्षाकेंद्र मिळाले होते, अशा सुमारे 18 हजार उमेदवारांना त्यांच्या राहत्या विभागात अथवा जवळच्या विभागात परीक्षाकेंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत* याबाबत लघुसंदेश (SMS) त्यांना प्राप्त होतील, तरी सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी तसेच परीक्षेसंबंधी काही अडचण निर्माण झाल्यास (उदा. आसन क्रमांक, परीक्षेचे स्थळ)  टोल फ्री क्रमांक. १८००१२१८४१४ यावर संपर्क साधावा असे आवाहन एसटी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 
    जनसंपकॆ अधिकारी
    एसटी महामंडळ

    No comments:

    Post a Comment