चालू घडामोडी 1 नोव्हेंबर 2017
चीनमध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाच्या अवमानासाठी 3 वर्षांचा तुरुंगवास
भारतात एकीकडे भारतीय राष्ट्रगीताचा बाबत कोर्टाने चित्रपटात राष्ट्रगीत सुरू असतांना
उभे राहण्याच्या वादामुळे या गीताची सक्ती करता येणार नाही अशी कोर्टाने टिप्पणी दिली असता आपल्या शेजारच्या देशांमध्ये तुरुंगात डांबण्यात येते.
उभे राहण्याच्या वादामुळे या गीताची सक्ती करता येणार नाही अशी कोर्टाने टिप्पणी दिली असता आपल्या शेजारच्या देशांमध्ये तुरुंगात डांबण्यात येते.
बीजिंग (चीन) – राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणारांस तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद करणारा कायदा चिनी संसद करणार असल्याची माहिती चीनचे राष्ट्रीय वृत्तपत्र शिनहुआ ने मंगळवारी दिली आहे. सन 2013 मध्ये शी जिनपिंग यांनी सत्ताग्रहण केल्यानंतर सीमेपलीकडून आणि अंतर्गत धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी नवीन कायदा बनवला होता आणि असंतोष आणि भाषण स्वातंत्र्यावरही अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
सप्टंबर महिन्यात चीनने केलेल्या कायद्यानुसार “मार्च ऑफ़ द व्हॉलंटियर्स’ या राष्ट्रगीताचा उपहास करणारास 15 दिवसपर्यंत पोलीस कस्टडी देण्याची तरतूद करण्यात आलेली होती. हा कायदा चीनप्रमाणेच हॉंगकॉंग आणि मकाऊ या या चिनी प्रदेशांमध्येही लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यात सुधारणा करून चिनी संसद राष्टृगीत, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय चिन्हांचा अवमान करणारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्याच्या तयारीत आहे. सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीताचे शब्द अथवा चालीचा अवमान करण, राष्ट्रध्वज जाळणे, विद्रुप करणे वा पायाखाली तुडवणे यासाठी कठोर शिक्षेची-यात तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आलेली आहे.
तसे कायद्याच्या मसुद्यात स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र हा मसुदा कधी पास करण्यात येणार याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment