Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, November 1, 2017

    सचिन पिळगावकर यांना पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार -चालू घडामोडी 1 नोव्हेंबर 2017

    Views
    सचिन पिळगावकर यांना पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार

    आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन इव्हेंट्स अँड मीडियातर्फे प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक आणि पाश्र्वगायक सचिन पिळगावकर यांना यंदाचा पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘फास्टर फेणे’ चित्रपटामुळे गाजत असलेला अभिनेता अमेय वाघ आणि ‘मुघल-ए-आझम’ या महानाटय़ातील अनारकली म्हणून लोकप्रिय असलेली गायिका-अभिनेत्री प्रियांका बर्वे यांना तरुणाई सन्मान जाहीर झाला आहे.
    चार संपादक आणि शब्दप्रभू पु. लं.
    दिलीप पाडगावकर, गोविंद तळवलकर, अरुण साधू आणि ह. मो. मराठे अशा साक्षेपी पत्रकारितेचे स्तंभ असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना ‘चार संपादक’ या कार्यक्रमातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. ग्रंथालीचे दिनकर गांगल, ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे, राजीव खांडेकर आणि प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांचा सहभाग असलेला कार्यक्रम ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी १२ नोव्हेंबर रोजी ‘शब्दप्रभू पु. लं.’ या विषयावर होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक मुकुंद टाकसाळे, प्रा. मििलद जोशी, डॉ. मंदार परांजपे, गायक चंद्रकांत काळे आणि ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचा सहभाग आहे. हे दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता होणार आहेत.

    कॉसमॉस बँक प्रस्तुत ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत यंदाचा पुलोत्सव होणार आहे. कोहिनूर ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे यंदाच्या पुलोत्सवाला विशेष सहकार्य लाभले आहे. ‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपटाद्वारे १९६२ मध्ये सुरू झालेला सचिन यांचा कलाप्रवास अजूनही दर्जेदारपणे सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आलेली मरगळ त्यांच्या चित्रपटांमुळे दूर होऊन नवसंजीवनी मिळाली. मराठी चित्रपटांपासून दूर गेलेला रसिक पुन्हा चित्रपटगृहांकडे वळाला. त्यांची बहुपैलू कारकिर्द पाहता सचिन यांना पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २५ हजार रुपये, पुणेरी पगडी, उपरणं, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सचिन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी मंगळवारी दिली. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांत यशस्वी मुशाफिरी करणारा अमेय वाघ सध्या फास्टर फेणे चित्रपटातून लोकप्रिय झाला आहे. घरातूनच संगीताचा वारसा लाभलेली प्रियांका बर्वे हिचा बालगीते, चित्रपटांसाठी पाश्र्वगायन ते संगीत रंगभूमीवरील अभिनय असा प्रवास झाला आहे. या दोघांना तरुणाई सन्मान जाहीर झाला आहे. प्रत्येकी २१ हजार रुपये, पुणेरी पगडी, उपरणं, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे ११ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होईल.


    No comments:

    Post a Comment