Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, November 1, 2017

    चालू घडामोडी 1 नोव्हेंबर 2017

    Views

    चालू घडामोडी 1 नोव्हेंबर 2017


    नवी दिल्ली : ज्या व्यक्तींना फौजदारी गुन्ह्यासाठी शिक्षा झाली आहे, त्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी आणावी, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना गुन्हेगार खासदार आणि आमदारांचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कोर्टानं हे मत मांडलं.

    फौजदारी गुन्हे दाखल असणाऱ्या नेत्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय सुरु करावं. हे न्यायालय उभं करण्यासाठी किती वेळ आणि पैसा लागेल, हे सांगण्यासाठी न्यायालयानं सरकारला 6 आठवड्यांचा कालावधी दिला आहे. 13 डिसेंबरला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

    2014 मधील आकडेवारीनुसार खासदार आणि आमदारांविरोधात दाखल असलेल्या 1 हजार 581 पैकी किती केसेसचा निपटारा झाला, याची माहिती कोर्टाने मागवली आहे. किती जण दोषी ठरले, तर किती जणांची निर्दोष मुक्तता झाली, याबाबतही सुप्रीम कोर्टाने विचारणा केली.

    2014 ते 2017 या कालावधीत किती राजकीय नेत्यांवर गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले, याबाबतही माहिती देण्यास कोर्टाने सांगितलं आहे. न्यायालयानंच आता राजकीय गुन्हेगारीवर प्रश्न उपस्थित केल्यानं कडक कायदा होण्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

    मुंबई : मुंबईत खेळवल्या गेलेल्या सामन्यात आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश राव या खेळाडूने 82 चेंडूत 279 धावा ठोकल्या. क्रिकेटच्या इतिहासातील हा एक मोठा विक्रम आहे. व्यंकटेश रावने राष्ट्रीय अंध चषकात हा विक्रम केला.

    व्यंकटेशने ही खेळी 40 चौकार आणि 18 षटकारांनी सजवली. व्यंकटेशने 268 धावा केवळ चौकार आणि षटकारांनीच मिळवल्या. या दमदार फलंदाजीच्या जोरावर आंध्र प्रदेशने महाराष्ट्रावर 292 धावांनी विजय मिळवला.

    आंध्र प्रदेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला महाराष्ट्राचा संघ 20 षटकांमध्ये 88 धावांच्या आत माघारी परतला. या चषकानंतर 17 खेळाडूंची निवड होणार आहे, जे पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 चषकात खेळतील.

    हा चषक पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळवला जाणार आहे. विजेत्या संघाला 50 हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला 30 हजार रुपये बक्षिस दिलं जाईल

    नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तानच्या नावाचा टॉप 20 मध्ये समावेश झाला आहे. फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध झालेल्या अहवालात पाकिस्तानला अपयशी देश म्हणून संबोधलं आहे.

    अमेरिकेने पाकिस्तानाला दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं बंद करण्याचा वारंवार समज देऊनही, पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची ओळख संपूर्ण जगात दहशतवाद्यांचा आश्रित देश म्हणून झाली आहे.

    अमेरिकेतील एका प्रतिनिधी सभेतही पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी एक प्रस्ताव नुकताच देण्यात आला होता. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही दहशतवादी कारवायांवरुन पाकिस्तानच्या नेतृत्वाला खडेबोल सुनावले होते.

    विशेष म्हणजे, पाकिस्तानला सातत्यानं पाठिशी घालणाऱ्या चीनमधील ब्रिक्स देशांच्या बैठकीतही एक संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आलं. यात पाकिस्तानाने किती दहशतवादी संघटनांना आश्रय दिला याची आकडेवारीसह नावं प्रसिद्ध करण्यात आली होती.

    त्यातच आता फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत पाकिस्तानचा टॉप 20 देशांच्या यादीत समावेश झाला आहे. पाकिस्तानचा या यादीत 18 वा क्रमांक असून, त्यामुळे पाकिस्तानचं खरं रुप पुन्हा जगासमोर आलं आहे.

    FRAGILE STATE INDEX 2017

    फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही पाकिस्ताननं देशांतर्गत असणाऱ्या अनेक क्षेत्रात महत्वपूर्ण बदल करण्याची गरज असल्याचं मत मांडलं आहे. पाकिस्ताननं शेजारच्या देशांमध्ये दहशतवादी पाठवून अस्थिरता पसरवण्यापेक्षा देशांतर्गत सुरक्षेचा विचार आधी करावा, असंही या अहवालातून पाकिस्तानला खडसावण्यात आलं आहे.

    No comments:

    Post a Comment