गोल्डन ब्लडबद्दल कधी ऐकले आहे का?
माणसाच्या रक्ताचे आठ प्रकारचे गट असतात हे सर्वसामान्य ज्ञान शाळेपासून आपण शिकतो. ए, बी,एबी व ओ असे मुख्य चार रक्तगट त्यात पॉझिटीव्ह व निगेटिव्ह असे त्याचे आणखी चार उपप्रकार मिळून आठ प्रकारचे रक्तगट असतात. यात १९५२ साली आणखी एका रक्तगटाची नोंद झाली व तो बाँबे ग्रुप म्हणून ओळखला जाऊ लागला. बाँबे ग्रुप हा दुर्मिळ रत्त*गट असून जगात १० लाख लोकांमध्ये ४ जणांमध्ये हा रक्तगट सापडतो. आता तर त्याहूनही आणखी एक दुर्मिळ रक्तगट नेांदला गेला आहे.
हा रक्तगट गोल्डन ब्लड नावाने किंवा आरएच नल नावाने ओळखला जातो. जगात आत्तापर्यंत या ग्रुपचे फक्त ४३ लोक नोंदले गेले आहेत. विशेष म्हणजे या रक्तगटाचे लोक कोणत्याही दुर्मिळ रकतगट असलेल्यांसाठी रक्त देऊ शकतात मात्र त्यांना रक्ताची गरज असेल तर याच ग्रुपचे रक्त द्यावे लागते. या रक्तगटाचे फक्त ९ लोक सध्या ब्लड डोनर आहेत. अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीतच त्यांना रक्त देण्याची विनंती केली जाते. या ग्रुपच्या लोकांना स्वतःची खूपच काळजी घ्यावी लागते कारण त्यांच्यासाठी डोनर मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
आपल्याला हे माहिती असेल की रक्तगट ओळखताना लाल पेशींवर असलेल्या अँटीजेनच्या काऊंटवरून तो ठरविला जातो. लाल पेशींवर डोनटवरील स्प्रिंकलप्रमाणे ही अँटीजेन असतात. जेथे डी अँटीजेन आढळते ते रक्तगट आरएच र्पाझिटिव्ह म्हटले जातात तर जेथे हे अँटीजेन आढळत नाही ते आरएच निगेटिव्ह म्हटले जातात. आरएच नल मध्ये तब्बल ६१ प्रकारचे अँटीजेन आढळत नाहीत त्यामुळे हा ग्रुप अत्यंत दुर्मिळ समजला जातो. प्रत्येक लाल पेशीवर ३४२ प्रकारचे अँटीजेन असतात. गेल्या ५२ वर्षात या रक्तगटाचे फक्त ४३ लोक जगभरात नोंदले गेले आहेत.
लाल पेशींवर असलेले हे अ्रँटीजेन शरीरात अँटीबॉडीज बनवत असतात व त्यामुळे व्हायरस, बॅक्टेरिया पासून माणसाचा बचाव केला जात असतो.
No comments:
Post a Comment