Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, October 18, 2017

    विषबाधा होते का? हवाबंद डब्यातील अन्न खाल्ल्याने

    Views


    विषबाधा होते का? हवाबंद डब्यातील अन्न खाल्ल्याने

    घरगुती पद्धतीने साठवलेल्या भाज्या, खारवलेले मासे, घरी बनवलेले चीज अशा आम्लाचे प्रमाण कमी असलेल्या पदार्थांमुळे बोटूलिझम नावाची अन्नविषबाधा होते. अन्नविषबाधेचा हा एक भयंकर पण सुदैवाने क्वचित आढळणारा प्रकार आहे. क्लॉस्ट्रिडियम बाटुलिनम नावाच्या जीवाणूपासून निर्माण होणाऱ्या विषद्रव्यामुळे ही विषबाधा होते. हे विष अतिशय विषारी असते. इतके विषारी की १०० ग्रॅम विषयामुळे जगातील सर्व लोक मृत्यूमुखी पडतील. क्लॉस्ट्रिडियम बाोटुलिनम हा जीवाणू माती, धूळ आणि प्राण्यांच्या आतडय़ांमध्ये सापडतो. या जिवाणूच्या कोषावस्था अन्नावाटे माणसाच्या शरीरात जातात. असे अन्न खाल्ल्यानंतर १२ ते ३६ तासांत विषबाधेची लक्षणे दिसून येतात. ऑक्सिजन नसलेल्या अवस्थेत विषाची ने निर्मिती होते. हे तयार असलेले विष आपण सेवन करतो व त्यामुळे विषबाधा होते. हे विष मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम करते. या विषबाधेत गिळायला त्रास होणे, एका ऐवजी दोन वस्तू दिसणे, पापण्या उघडता न येणे, सांधे दुखणे, दृष्टीवर परिणाम होणे, हातपाय गळून जाणे व लुळे पडणे; अशी लक्षणे दिसतात. श्वसन थांबल्याने व हृदयाचे कार्य थांबल्याने मृत्यू येतो.

    या विषबाधेच्या उपचारामध्ये बाटुलिनमसाठीच्या प्रतिविषाचा प्रामुख्याने उपयोग करतात. मेंदूतील पेशींवर विषाचा परिणाम झालेला नसेल तरच हे प्रतिविष उपयुक्त ठरते. बोटुलिनम टॉक्साईडने लसीकरण केल्यास या रोगाचा प्रतिबंध करता येतो. चांगली चिकित्सा सेवा व शुश्रूषा मिळाल्यास रोगी वाचू शकतो. या विषाचा विषारीपणा उष्णतेमुळे नाहीसा होतो. त्यामुळे अन्न १०० सेंटिग्रेड तापमानाला काही मिनिटे तापवले तर विषबाधेचा धोका राहणार नाही. सर्वात चांगले म्हणजे रोज ताजे अन्न खावे.

    *डॉ. जगन्नाथ दीक्षित*
    *डाॅ. अंजली दीक्षित*
    यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

    No comments:

    Post a Comment