Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, October 17, 2017

    चालू घडामोडी 17 ऑक्टोबर 2017 (text)

    Views
    🔹इज ऑफ डूईंग बिझनेस रँकिंगमध्ये UP, MP सह 11 राज्यांना झिरो; मोदींना मोठा झटका

    भारतातील ईज ऑफ डुइंग बिझनेस रँकिंग सुधारण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. देशातील 11 राज्य अशी आहेत जी जागतिक बँक आणि डीआयपीपीच्या रियल टाइम रँकिंगमध्ये शुन्यावर आहे. यात भाजपशासित मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांचाही समावेश आहे.

    ▪️ही आहेत झिरो मिळालेली राज्य

    मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मेघालय, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, लक्ष्यद्विप, अंदमान-निकोबार यांचा समावेश आहे.

    ▪️या राज्यांना शुन्य का ?

    डीआयपीपी आणि जागतिक बँकेने मिळून एप्रिल 2017 मध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी एक अॅक्शन प्लॅन तयार केला होता.

    या योजनेनुसार राज्यांमध्ये सुधारणेसाठी 405 शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार राज्यांना आपल्या येथे अॅक्शन प्लॅन लागू करायचा होता, आणि त्या दिशेने पाऊले उचलून सुधारणा करायच्या होत्या.

    याच अॅक्शन प्लॅननुसार रँकिंग देण्यात आली. याचा अर्थ ज्या राज्यांनी जेवढ्या जास्त सुधारणा केल्या तेवढी त्यांची रँकिंग असते.

    झिरो रँकिंगचा अर्थ या राज्यांनी त्या दिशेने कोणतेच काम केलेले नाही.

    या रँकिंगमध्ये महाराष्ट्रही फार काही महत्त्वाची कामगिरी करु शकलेले नाही. महाराष्ट्रचा क्रमांक रँकिंगमध्ये 5वा राहिला आहे.

    ▪️चांगल्या रँकिंगचा फायदा ?

    रियल टाइम रँकिंगमुळे गुंतवणूकदारांना कोणत्या राज्यात गुंतवणूक केली पाहिजे याचे आकलन होते.

    ज्या राज्यांना चांगली रँकिंग आहे, तिथे गुंतवणूकदार अधिक आकर्षित होतात आणि तिकडे त्यांचा ओढा असतो. खराब रँकिंग असलेल्या राज्यांबद्दल ते फार विचार करत नाही.

    🔹माळशिरसमध्ये तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान

    दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.

    ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. यात तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजप पुरस्कृत तृतीयपंथ ज्ञानदेव कांबळे यांना निवडून दिलं.


    No comments:

    Post a Comment