Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, August 1, 2017

    पेट्रोलियम पदार्थाचे मोजमाप

    Views

    पेट्रोलियम पदार्थाचे मोजमाप

    (काॅपी-पेस्ट, दै लोकसत्ता)

    सुमारे ७५० विविध जीवनोपयोगी पदार्थाचा स्रोत असलेले खनिज तेल बॅरल (पिंपा)मध्ये भरून मोजले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे मोजमाप करणाऱ्या या पिंपाचे आकारमान १५९ लिटरइतके भरते.
    द्रव पदार्थाची घनता ग्रॅम प्रति मिलिलिटर किंवा किलोग्रॅम प्रति लिटर या मापात मोजली जाते. प्रत्येक पदार्थाची घनता विशिष्ट तापमानाला विशिष्ट असते; परंतु बरेच पेट्रोलियम पदार्थ हे हायड्रोकार्बन रसायनांचे मिश्रण असतात. त्यांची घनता ही विशिष्ट संख्यांच्या टप्प्यात येते. उदा. पेट्रोलची घनता ६५० ते ७५० ग्रॅम प्रति लिटर या दरम्यान भरते, तर डिझेल इंधनाची घनता ८०० ते ८५० ग्रॅम प्रति लिटर या टप्प्यात असते, मात्र एकाच वेळी उत्पादित केलेल्या पदार्थाची घनता एकच असते. (उदा. पेट्रोलची ७२५.५ ग्रॅम प्रति लिटर आणि डिझेलची ८३५ ग्रॅम प्रति लिटर असू शकते.) जोपर्यंत त्या पदार्थात बदल होत नाही तोपर्यंत त्याची घनता बदलत नाही. त्यामुळे इंधनात भेसळ झाली आहे का, हे तपासण्यासाठी त्या इंधनाची घनता मोजली जाते.
    घनता ही पेट्रोलियम पदार्थाची गुणवत्ता कसोटी नसली तरी पेट्रोलियम पदार्थाची उलाढाल करण्यासाठी या कसोटीचा वापर केला जातो. द्रवरूप इंधनाचे टँक, ट्रकच्या टाक्यात भरताना प्रमाणित केलेल्या धातूच्या काठीचा म्हणजे ‘डिपरॉडचा’ वापर करतात आणि त्यात भरलेल्या इंधनाचे आकारमान तक्त्यावरून काढतात. या धातूच्या काठीवर एक प्रकारची पेस्ट चोळतात. इंधनाच्या संपर्कात ती आली की रंगीत होते. अशा रीतीने टाकीतील इंधनाचे प्रमाण मोजतात.
    परंतु पिंपात जेव्हा वंगणे भरतात तेव्हा त्याचे वजन करतात आणि मग घनतेच्या साहाय्याने आकारमान काढतात. घनता ही वजन आणि आकारमानाच्या गुणोत्तरात असते, या सूत्राचा इथे वापर करतात. आपल्याकडच्या २१० लिटर आकारमानाच्या पिंपात व्यावसायिक उलाढालीसाठी २०५ लिटर वंगण तेल भरतात.
    अर्थात, घनता ही तापमानाशी निगडित असते. तापमान जास्त असेल तर घनता कमी भरते आणि तापमान कमी असेल तर घनता जास्त भरते. सकाळ-संध्याकाळच्या वेळी तापमान कमी असते; त्या वेळी वाहनात इंधन भरण्यामागची हीच गोम आहे.
    पेट्रोलियम क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार इंधनाची घनता १५ अंश सेल्सियस तापमानाला, तर वंगणाची घनता २९.५ अंश सेल्सियस तापमानाला नोंदवितात.

    No comments:

    Post a Comment