Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, August 18, 2017

    चालू घडामोडी : १५ ऑगस्ट

    Views

    चालू घडामोडी : १५ ऑगस्ट

    पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

    •पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन चौथ्यांदा भाषण केले आहे. त्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

    •३ वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला. नोटाबंदीनंतर ३ लाख कोटी रुपये बँकिंग व्यवस्थेत आले.

    •नोटाबंदीनंतर हवाल्याचे काम करणाऱ्या ३ लाख कंपन्या सापडल्या. यातील पावणे दोन लाख कंपन्या रद्द केल्या आहेत.  

    • न्यू इंडिया संकल्पाची हीच योग्य वेळ आहे. आपण सर्वांना मिळून असे भारत घडवायचा आहे की जेथे गरीबांकडे घर, वीज आणि पाणी उपलब्ध असेल.

    • एक असा भारत घडवू जेथे शेतकरी शांततेची झोप घेईल.तरुणवर्ग आणि महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी मिळेल. 

    •असा भारत निर्माण करु जो दहशतवाद, सांप्रदायिकता आणि जातीयवाद यापासून मुक्त
    असेल. 

    • आस्थेच्या नावावर या देशात हिंसा खपवून घेतली जाणार नाही. हिंसेला देश कधीही स्वीकारणार नाही.

    • स्वातंत्र्यापूर्वी भारत छोडोचा नारा होता आता
    भारत जोडोचा नारा आहे.

    • देशाच्या सुरक्षेसाठी काहीही करण्यास आम्ही कमी पडणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

    • स्वातंत्र्य भारतासाठी हे विशेष वर्ष आहे. यंदा ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाचे १००वे वर्ष
    आपण साजरे करत आहोत.
    • भारत छोडो आंदोलनाचे हे ७५वे वर्ष आहे. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली होती त्याचेही यंदा १२५वे वर्ष आहे.

    • सामूहिक शक्ती, एकीचे बळ ही आपली ताकद आहे. देशात कुणी छोटा नाही, कुणी मोठा नाही, सर्व समान आहे.

    • आज देशात इमानदारीचा उत्सव साजरा होत आहे. ज्यांनी देशाला लुटलेल आणि गरिबांना लुटले त्यांची आज झोप उडाली आहे.

    • न्यू इंडियाचा संकल्प घेऊन पुढे जायचे आहे.
    न्यू इंडिया सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि जगभरात भारताचा दबदबा असणारा
    असा असेल.

    रोनाल्डो पाच सामन्यांसाठी निलंबित

    • रिअल माद्रिद फुटबॉल क्लबचा प्रमुख खेळाडू
    ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्पॅनिश फुटबॉल महासंघाने पाच सामन्यांसाठी निलंबित केले
    आहे.

    • स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना क्लबविरुद्धच्या लढतीत त्याने
    सामनाधिकाऱ्यांना जोरदार धक्का दिला. त्यामुळे त्याच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली.

    •सामन्याच्या दुसऱ्या सत्रात रोनाल्डोने
    पंच रिकाडरे डी बगरेस बेंगोएत्जी यांच्या निर्णयाविरोधात अती आक्रमकता दाखवली आणि त्यांना धक्काही दिला.

    • या लढतीत लाल कार्ड दाखवण्यात आल्यामुळे त्याच्यावर एका सामन्यांची बंदी होतीच आणि त्यात चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

    • या बंदीबरोबरच रोनाल्डोला हजार ५०० अमेरिकन डॉलरचा दंडही भरण्यास सांगितला आहे. या निर्णयाविरोधात रोनाल्डो १० दिवसांत दाद मागू शकतो.

    • या सामन्यात रिअल माद्रिदने ३-१ असा विजय मिळवला आहे. मात्र, बंदी उठली नाही तर परतीच्या लढतीत रिअल माद्रिदला रोनाल्डोशिवाय खेळावे लागणार आहे.

    वादग्रस्त ब्लू व्हेल गेमवर बंदी

    • मोबाईल गेम ‘ब्लू व्हेल’च्या सर्व लिंक हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारने फेसबुक, गूगल, व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सला वादग्रस्त   दिले आहेत.

    • भारतात ब्लू व्हेल गेममुळे  लहान मुलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने असे निर्देश दिले आहेत.

    • मुंबईत ब्लू व्हेल चॅलेंज या गेममुळे मनप्रीत सहानी या अल्पवयीन मुलाने ३० जुलैला सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

    • मनप्रीत हा ब्लू व्हेलचा भारतातील पहिला बळी होता. यानंतर इतर राज्यातही याप्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले.

    •या घटनांच्या पार्श्वभूमीवर या  आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गेमवर बंदी घालण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

    •राज्यातील विधानसभेपासून ते दिल्लीत संसदेपर्यंत या गेमवर बंदीची मागणी करण्यात आली होती.

    • त्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयाने गूगल, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, याहू, मायक्रोसॉफ्ट अशा सर्व कंपन्यांना एक पत्रक पाठवले.

    • त्यानुसार या गेमशी संबंधीत सर्व लिंक तात्काळ हटवाव्यात असे निर्देश या सोशल नेटवर्किंग साईट्सला केंद्र सरकारने दिले आहेत.

    • ब्लू व्हेल गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा असून तो रशियात तयार झाला असून या गेममुळे रशियात १३० जणांनी प्राण गमावले.

    • २०१३साली रशियात फिलिप ब्यूडेइकिन
    याने या गेमची निर्मिती केली असून त्याला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक ही करण्यात आली होती.

    • या गेमचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर ऑनलाइन मंच वापरून लोकांना वेगवेगळी आव्हाने करायला देतात. ज्यामध्ये सर्वात शेवटी खेळणाऱ्याला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.


            विद्यार्थी मित्रांनो आमच्या नोट्स तुम्हाला कशा वाटतात ते आम्हाला  रेटिंग देऊन कळवा.
            आमच्या नोट्स तुम्हाला आवडत असल्यास कृपया आम्हाला 5★ रेटिंग द्यायला विसरू नका.