Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, August 30, 2017

    ३० ऑगस्ट १९८४

    Views
    ३० ऑगस्ट १९८४

    स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन

    अंतरीक्ष यान

    मानवाला अवकाशात झेपावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ठ म्हणजे अंतरीक्ष यान होय. मागील ५० वर्षात अमेरिका व रशिया या दोन देशांनी वेगवेगळे अवकाशयाने तयार करून त्यांचा वापर सुर्यमालेतील ग्रहांचा व अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी केला आहे. अपोलो यानांनी तर थेट चंद्रावर पोहचुन मानवी यशाचा झेंडा रोवला आहे. अशा या अंतरीक्ष यानांच्या मालिकेतील सर्वात आगळे-वेगळे यान म्हणजे अमेरिकेचे स्पेस शटल होय. अवकाश स्थानकांचा विकास व उपग्रह कक्षेत पाठवण्यासाठी स्पेस शटलचा वेळोवेळी वापर करण्यात आला आहे. स्पेस शटल हे विमान आणि रॉकेटचे एकत्रीतपणे तयार केलेले अंतरीक्षयान होते. त्याचा एका अवकाश मोहिमेनतंर परत वापर करणे शक्य होत असे. सुरवातीला चार स्पेस शटलची निर्मिती केली गेली होती म्हणजेच 
    १) कोलंबिया
    २) डिस्कव्हरी
     ३) अ‍ॅटलँटिस 
    ४) चॅलेंजर.
    १९८१ साली कोलंबिया या स्पेस शटलने पहिल्यांदा उड्डांन घेतले. चेलेंजर या यानाला १९८६ साली अपघात झाला व त्याच्या जागेवर इंडीएव्हर या नवीन स्पेस शटलचा समावेश करुन घेण्यात आला. त्यानंतर २००३ मध्ये कोलंबिया या यानाला देखील अपघात झाला. स्पेस शटलविषयी थोडं:

    १) गडद नारंगी रंगाची टाकी स्पेस शटलच्या मुख्य इंजिनला द्रवरुप हायड्रोजन व ऑक्सीजन इंधन पुरवण्यासाठी असे. दोन पांढर्‍या रंगाचे रॉकेट्स म्हणजेच सॉलिड रॉकेट बुस्टर्ससह इंधन टाकी जोडलेली असत. ही इंधनाची टाकी फक्त एकदाच वापरली जात असत. 
    २) सॉलिड रॉकेट बुस्टर्स : दोन पांढर्‍या रंगाचे रॉकेट्स हे इंधन टाकीच्या दोन्ही बाजुस जोडलेले असत. स्पेस शटलच्या उड्डानानंतर ४६ कि.मी वर गेल्यावर त्यातील इंधन संपल्यानंतर ही दोन्ही रॉकेट्स स्पेस शटलपासुन वेगळी केली जात असे. त्यानंतर त्यात असणार्‍या पॅराशुटच्या साहाय्याने रॉकेट्स पृथ्वीवर पडल्यानंतर परत वापर करण्यासाठी गोळा केली जात असे.
    ३) स्पेस शटलचे इंजिन : आत्तापर्यंत सर्वात आधुनिक पद्धतीचे तीन इंजिन स्पेस शटलच्या मागील बाजुस त्रिकोणीय आकारात बसवलेली असत. उड्डाणाच्या वेळी प्रथम उजव्या बाजुचे, नंतर डाव्या बाजूचे व शेवटी दोहामधील तिसरे इंजिन सुरू होत असे. विशिष्ठ कक्षेत पोहचल्यानंतर हे इंजिन बंद होत असे व त्यानंतर इंधन टाकी देखील स्पेस शटलपासुन वेगळी केली जात असे.

     ४) अंतरीक्षयान : पांढर्‍या रंगाचे विमानासारखे दिसणारे यान हे मुख्यतः अ‍ॅल्युमिनियम पासुन बनलेले होते आणि सुर्यापासुन व वातावरणातील वायुकणांशी घर्षन झाल्यानंतर तयार झालेल्या प्रचंड उष्णतेपासुन सरंक्षण होण्यासाठी त्याभोवती एक विशिष्ठ आवरण असे. यामध्ये अंतराळवीर, अवकाशस्थानकासाठी लागणार्‍या वस्तू तसेच उपग्रह ठेवलेले असे. इंधनटाकी वेगळी झाल्यानंतर त्या कक्षेतून अंतरीक्षयान मग अंतराळस्थानकाच्या कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळस्थानक व यान एकाच कक्षेत प्रवास करत असतानाच अंतराळवीर स्पेस शटलवरील यंत्रनेचा वापर करून यान अवकाशस्थानकाला जोडले जात असे, यालाच डॉकिंग असे म्हणत. त्यानंतर अंतराळवीर अवकास्थानकात पोहचत असे. एखादा उपग्रह कक्षेत पाठवण्याताना स्पेस शटल याच पद्धतीने ठरावीक कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळवीर त्याचा विशिष्ठ पोशाख घालून सोबत नेलेला उपग्रह त्या कक्षेत सोडुन परत पृथ्वीवर येत असे. याचप्रकारे हबल दुर्बिन अवकाशात पाठविण्यात आली होती व वेळोवेळी त्या कक्षेत पोहचून दुर्बिनीला पकडुन दुरूस्ती करण्यात आली होती. 
     स्पेस शटलचे अपघात : 
    १) २८ जानेवारी १९८६ रोजी चॅलेंजर या यानाला उड्डाणानंतर ७३ सेकंदांनी उजव्या बाजुच्या रॉकेटमध्ये यांत्रिक बिघाड झाला व त्याचा स्फोट झाला. त्यात ते संपूर्ण यान जळून खाक झाले व त्यात सात अंतराळवीरांचा देखील होता. 

    २) १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया हे स्पेस शटल अंतराळस्थानकावरून परत पृथ्वीवर येत असताना पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर त्याचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये देखील सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला व त्यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला हिचा समावेश होता. अशाप्रकारे त्या पाच स्पेस शटल्सने १३० पेक्षा जास्त मोहिमा सन १९८१ ते २०१२ या काळात पार पडल्या. त्यात काही उपग्रह आणि ३७ वेळा अंतराळस्थानकाच्या बांधकामासाठी उड्डान घेतले होते. आता सर्व स्पेस शटल्सची निवृत्ती झाली आहे.


    No comments:

    Post a Comment