Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, July 7, 2017

    चालू घडामोडी (7 जुलै 2017)

    Views


    केशव शर्मा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक :

    • भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया) पश्चिम विभागाचे कार्यकारीव्यवस्थापकपदाची सूत्रे केशव शर्मा यांनी येथेस्वीकारली. ते याआधी अलाहाबादच्या सिविल एविएशन ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य होते.
       
    • शर्मा यांनी 1985 साली केंद्रीय लोकसेवा आयोमार्फतनागरी विमान वाहतूक महासंचालनालयात एरोड्राम ऑफिसर म्हणून कामाला सुरुवात केली.
       
    • इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्टर्स ऑफ सायन्स आणि एमफिल तसेच आयआयटीमधून मास्टर्स इन मॅनेजमेंट असे शिक्षण घेतलेल्या केशव शर्मा यांचा दिल्ली विमानतळाचे तसेच मुंबई विमानतळाच्या हवाई वाहतूक सेवेचे (एटीएस) आधुनिकीकरण या कामात मोठा वाटा आहे.
       
    • तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोल, एअरपोर्ट मॅनेजमेंट व सेफ्टी मॅनेजमेंट यात ते निष्णात मानले जातात.

    महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला कांस्यपदक :

    • महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने महिलांच्या 5000मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले.
       
    • पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत लक्ष्मणनेसुवर्णपदक जिंकून आशियाई अ‍ॅथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.दुसरीकडे मनप्रीत कौरने गोळाफेकने सुवर्ण, विकास गौडाने थाळीफेकमध्ये कांस्य, महिलांच्या लांबउडीत व्ही. नीनाने रौप्य, तर नयन जेम्सने कांस्यपदक जिंकले.
       
    • ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने 16 मि. 00.24सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित करून महाराष्ट्राची शान वाढविली.
       
    • तसेच कॅग्रीस्थानच्या दारीया मास्लोव्हाने 15 मि.57-97 से.ची वेळ नोंदवून सुवर्ण, तर यूएईच्याआलिया मोहम्मदने 15 मि. 59.95 से.ची वेळ नोंदवूनरौप्य जिंकले.

    भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकली :

    • निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीनेकेलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून विजय मिळविला. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 3-1 ने विजय मिळविला.
       
    • पाचव्या आणि निर्णायक सामन्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादवने भेदक मारा करत यजमान संघाला अवघ्या205 धावांत रोखल्यानंतर विराट कोहलीने शानदार शतकी खेळी करताना अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिकच्या साथीने जबरदस्त भागीदाऱ्या रचत भारताला विजय मिळवून दिला.

    राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद खान यांना अध्यक्षपदावरून हटविले :

    • गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांना राज्य शासनाने आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविले आहे.
       
    • खान हे जळगाव जिल्ह्यातील असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
       
    • खान यांना जानेवारी 2015 मध्ये आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले होते. काही प्रकरणांत त्यांनी स्वत: न्यायालय असल्याच्या थाटात आदेश पारित केले, अशी तक्रार झाली होती.
       
    • जमीन महसूल संहितेंतर्गत जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारांचा वापर ते करीत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. काही प्रकरणांत त्यांनी स्वत:ला अधिकार असल्याच्या थाटात सुनावणी दिल्याचेही तक्रारीत म्हटले होते.
       
    • तसेच अध्यक्षपदावरून खान यांना हटविण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला आणि त्यानंतर आदेश निघाला.

    दिनविशेष :

    • भारतीय टेनिसपटू महेश भूपती यांचा जन्म 7 जुलै1974 मध्ये झाला.
       
    • जुलै 1981 हा भारतीय क्रिकेट खेळाडू व माजी कर्णधार 'महेंद्र सिंह धोनी' यांचा जन्मदिन आहे.

    No comments:

    Post a Comment