🔹21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा
“योगा फॉर हेल्थ” या संकल्पनेखाली 21 जून 2017 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आहे.
▪️पार्श्वभूमी
भारतीय संस्कृतीत योग हा एक प्राचीन शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक अभ्यास आहे. आज जगभरातील विविध स्वरूपात त्याचा अभ्यास केला जातो आणि लोकप्रियता वाढू लागली आहे.
11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव 69/131 मंजूर करून 21 जून या तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे घोषित केले गेले.
▪️योग संदर्भात भारताचा पुढाकार
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने, भारत सरकारने योग आणि संबंधित कार्यात सहभागी असलेल्यांचे अनुभव जाहीर करण्याकरिता 'सेलिब्रेटिंग योगा' या नावाने एक मोबाइल अॅपचे उद्घाटन केले आहे. हे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी केले. अॅपमधील माहिती विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या संकेतस्थळावर देखील दिसेल.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून योगचे फायदे शास्त्रोक्त पद्धतीने सत्यापित करण्यासाठी संशोधन करण्यासाठी 'योग आणि ध्यान यांचे विज्ञान व तंत्रज्ञान' हा कार्यक्रम सुरू केला आहे. या अॅपमार्फत विद्यार्थ्यांना विभागाच्या कार्यक्रमाअंतर्गत योगावरील अभ्यासांबद्दल माहिती दिली जाईल.