Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, February 1, 2017

    Views

    आत्मविश्‍वास कसा वाढवायचा?

    कोणतीही गोष्ट करताना आपल्यापैकी कित्येकांच्या मनात एक वेगळ्याच प्रकारची धाकधुक असते की, हे काम आपल्याकडून होईल की नाही, हे मला जमेल की नाही. चार चौघांत माझं हसू झालं तर? असे प्रश्‍न मनात निर्माण होतात आणि शेवटी आपण माघार घेतो परिणामी आपल्या मनात असलेली ही अनामिक भिती जिंकत जाते. हे सर्व तुमच्यासोबतही होत असेल कदाचित. मात्र त्यामागील कारण जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही. मित्रांनो हे सगळं होतं ते आत्मविश्‍वासाअभावी…
    आयुष्यात घडणार्‍या अनेक गोष्टींमुळे आपला आत्मविश्‍वास कमी होऊ लागतो. आणि याचाच परिणाम आपल्या दैनंदीन जीवनावर होतो. मात्र काही गोष्टी नियमीत केल्यास आपला आत्मविश्‍वास आपल्याला परत मिळवता येऊ शकतो. तो कसा ते पाहूयात...

    स्वतःलाच शाबासकी द्या-

      सकाळी उठल्यानंतर दिवसभरात हाती घेतलेले काम पुर्णत्वास नेण्याचा निर्धार करा. मी हे काम अतिशय व्यवस्थित करू शकतो हे आधी स्वतःला पटवून द्या. नियोजन बनवा आणि सर्व कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. हाती घेतलेले काम पुर्ण झाल्यास स्वतःची स्तुती करा व स्वतःलाच शाबासकी द्या.

    गर्व करू नका-

      जर आपली कोणी स्तुती केल्यास त्यांचे आभार माना, गर्व करू नका. कारण गर्वाचे घर नेहमी खालीच असते हे लक्षात ठेवा.

    इम्प्रेसिव पेहराव ठेवा-

    रोज घरातून बाहेर पडताना काही तरी घालायचं म्हणून घालू नका. कारण आपले कपडे देखील आपला आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी चांगली कामगिरी पार पाडतात.

    विश्‍वास ठेवा-

    उगाच कुठल्याही गोष्टीबद्दल अनावश्यक काळजी बाळगू नका. हे काम आपणच करणार आहोत त्यामुळे ते पुर्ण होईलच असा विश्‍वास मनाशी बाळगा. नेहमी चेहर्‍यावर स्मित हास्य असू द्या. कोणी काहीही बोलले तरी प्रेमाने उत्तर द्या. सर्वांना स्वतःहून मदत करा. एखाद्याचे चुकत असल्यास त्याच्या चुकीवर पांघरून न घालता त्याला समजावून सांगा, आक्रमक होऊ नका. यामुळे लोकांचा तुमच्याबद्दल असलेला दृष्टीकोन बदलेल. व लोकांचा हा बदललेला दृष्टीकोन तुमचा आत्मविश्‍वास वाढवण्यास कारणीभुत ठरेल.

    संगत वाढवते आत्मविश्‍वास-

      -
    तुमचा आत्मविश्‍वास हा तुमच्या सभोवताली असणार्‍या तुमच्याच जवळच्या लोकांवर देखील अवलंबून असतो. चुकीची अथवा वाईट संगत तुमचा आत्मविश्‍वास खालावू शकते. एखादे काम हाती घेतल्यावर बर्‍याचदा लोक तुम्हाला प्रोत्साहित करण्याऐवजी पाय खेचत असतील तर वेळीच सावध व्हा. आपण हाती घेत असलेले काम हे योग्य आहे व त्यामुळे कोणाचेच नुकसान होणार नाही याची खात्री असेल तर बिनधास्त ते काम करा. यामुळे तुमचा आत्मविश्‍वास वाढेल.

    स्वत:साठी वेळ काढा -

    दिवसातून थोडा वेळ तुमच्या छंदासाठी द्या. आपल्याला काय आवडते, काय केल्यानंतर बरे वाटते याचा विचार करा व उत्तर मिळाल्यावर किमान आपला एक तास तरी त्यासाठी द्या. मग बघा आपला आत्मविश्‍वास कसा वाढतो ते.

    No comments:

    Post a Comment