गोंडस असे पील्लू माझ्या सुंदर मणीमाऊचे
चीमुकले निळसर डोळे आणि पाय त्याचे इवलेसे
मऊ गुबगुबित केस त्याचे दात जणू मोत्यांचे
कान त्याचे टवकारलेले आणि शेपूट जणू कापसाचे
शुभ्र असा रंग त्याचा मद्दे ठिबके काळ्या रंगाचे
खेळताना त्याने मारले ओरखडे कोवळ्या नखांचे
तरी कुरवाळून भरवितो मी त्याला घास दूध भाताचे
गोँडस असे पील्लू माझ्या सुंदर मणीमाऊचे
No comments:
Post a Comment