ससेभाऊ ससेभाऊ
ससेभाऊ ससेभाऊ
चार उडया मारा पाहू
कश्या कश्या कश्या?
अश्या अश्या अश्या
अहो अहो हत्ती
डुलडुलता किती
कसे कसे कसे?
असे असे असे!
अहो अहो गाढवदादा
जरा तुमचा सुर काढा
कसा कसा कसा
असा असा असा
होँ... हो... होँ