चालू घडामोडी - २० फेब्रुवारी
Mon, 20 Feb 2017 : : Govind Padvi
महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्यात सर्वोत्कृष्ट
# कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने गेल्या वर्षभरात राज्यात सर्वोत्कृष्ट काम केले. या कामाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास सर्वोत्कृष्ट विधी सेवा प्राधिकरणाचा पुरस्कार जाहीर केला.
साई पॉर्इंट होंडा ऑल इंडिया विनर
# आॅस्ट्रेलियातील सिडनी येथे पार पडलेल्या आॅल इंडिया वितरकांच्या व्यावसायिक मेळाव्यात साई पॉर्इंट होंडाला लागोपाठ सातव्यांदा आॅल इंडिया विनरचा बहुमान मिळाला आहे. साई पॉर्इंट होंडाने २०१६ मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वाधिक २६०७ दुचाकी वाहने विकल्यामुळे साई पॉर्इंट होंडाला विशेष पुरस्कार देण्यात आला. साई पॉर्इंट होंडाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिलीप पाटील यांनी हा पुरस्कार होंडाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अयामा सान यांच्या हस्ते स्वीकारला.
देश-विदेश
‘इंडियन एक्सप्रेस डिजिटल’ ची बाजी, डिजिटल माध्यमांमध्ये देशात दुसरा क्रमांक!
आंतरराष्ट्रीय
सौदीत प्रथमच महिलांची महत्वाच्या पदांवर नियुक्तीप्रशांत महासागरात आठव्या खंडाचा शोध
# नैऋत्य प्रशांत महासागरात वव्हंशी पाण्याखाली बुडालेल्या अवस्थेत असलेल्या ‘झीलंडिया’ या पृथ्वीवरील नव्या आणि आठव्या खंडाचा शोध लावल्याचा दावा न्यूझीलंडमधील भूवैज्ञानिकांनी केला आहे.
क्रीडा
संदीपचा पुन्हा राष्ट्रीय विक्रम # हरयाणाच्या संदीप कुमारने राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीतील ५० किलोमीटर प्रकारात स्वत:च्याच नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम शनिवारी मोडला. संदीपने तीन तास ५५ मिनिटे आणि ५९.०५ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली आणि ऑगस्ट महिन्यात लंडनमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेची पात्रता मिळवली. याआधी संदीपने मे २०१४ रोजी चीनमध्ये झालेल्या आयएएएफ विश्व चालण्याच्या शर्यतीत ३ तास ५६ मिनिटे २२ सेकंदांची वेळ नोंदवली होती.
अर्थसत्ता
स्टेट बँकांचे विलीनीकरण # एसबीआयसह पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणास सरकारने बुधवारी मंजुरी दिली आहे. जागतिक स्तरावर आकाराच्या दृष्टीने मोठी बँक बनविण्याच्या मागणीला या निमित्ताने मूर्त स्वरूप देण्यात येत आहे. तथापि, भारतीय महिला बँकेच्या बाबतीत मात्र कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ज्या सहयोगी बँकांचे स्टेट बँक आॅफ इंडियात (एसबीआय) विलीनीकरण करण्यात येणार आहे त्यात स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर (एसबीबीजे), स्टेट बँक आॅफ म्हैसूर (एमबीएम), स्टेट बँक आॅफ त्रावणकोर (एसबीटी), स्टेट बँक आॅफ पटियाला (एसबीपी) आणि स्टेट बँक आॅफ हैदराबाद (एसबीएच) यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment