चालू घडामोडी - 1 फेब्रुवारी
Wed, 1 Feb 2017 : Govind Padviमहाराष्ट्र
उपेंद्र भट यांना ''कंठ संगीत'' पुरस्कार
# सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या "राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2016'ची यादी नुकतीच जाहीर झाली. "कंठ संगीत' पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उपेंद्र भट यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, प्रमाणपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्य, तमाशा, नृत्य, कंठ संगीत, कीर्तन, कलादान, वाद्यसंगीत, शाहिरी, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट, लोककला व आदिवासी गिरिजन कला या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.
योगेश बोंबाळेला 'महान भारत केसरी' चा बहुमान
# कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील हल्ल्याळ येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या योगेश बोंबाळे याने ‘महान भारत केसरी’ पुरस्कार पटकाविला, तर मुरगूडच्या स्वाती शिंदे हिने ‘वीरमाता कित्तूर राणी चन्नम्मा केसरी’ पुरस्कार पटकाविला. पै. योगेश बोंबाळेला २ लाख रुपये व मानाची गदा प्रदान करण्यात आली. स्वाती शिंदेला २५ हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली.
राष्ट्रीय
BUDGET 2017 - पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या 10 महत्वाच्या घोषणा
अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा
# मोदी सरकारनं पहिल्यांदाच ब्रिटिशांच्या परंपरेला बगल देत केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र सादर केला आहे. जेटलींनी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 21 लाख 47 हजार कोटींच्या जवळपास असणा-या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना बळकटी देणारे महत्त्वपूर्ण अशा 10 घोषणा केल्या आहेत.आंतरराष्ट्रीय
1. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 3,96,135 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार
2. ग्रामीण, कृषी आणि त्यासंबंधित क्षेत्रासाठी 2017-18च्या अर्थसंकल्पात 1,87,223 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद गेल्या वर्षापेक्षा 24 टक्क्यांनी अधिक आहे
3. रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यातील 55 हजार कोटी रुपये सरकार रेल्वे मंत्रालयाला देणार आहे.
4. राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी 64 हजार कोटींची तरतूद करण्यात आली
5. डेअरी पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या निधीमुळे ग्रामीण भागात अधिकचे 2017-18 वर्षांत 50000 कोटी रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळणार आहे.
6. मोदी सरकार 2019पर्यंत 1 कोटी घरं बनवणार असून, त्यामुळे घर नसलेल्या आणि कच्च्या घरात राहणा-या लोकांना त्याचा फायदा होणार आहे.
7. वाहतूक क्षेत्रासाठी 2.41 लाख कोटी रुपये आणि भारत नेट प्रोजेक्टसाठी 10000 कोटींची तरतूद
8. रेल्वेच्या 3500 किलोमीटर रेल्वे रुळ 2017-18 पर्यंत सुरू करणार
9. मेट्रो रेल्वेच्या नव्या पॉलिसीची लवकरच घोषणा करणार
10. व्यापार इन्फ्रास्ट्रक्चर निर्यात योजना 2017-18 मध्ये सुरू करणार
सात मुस्लीम देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी
# सात
मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली
आहे. सिरियातील निर्वासितांनाही अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली
आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी
केली आहे. ‘विदेशी अतिरेक्यांच्या अमेरिकेतील प्रवेशापासून देशाची सुरक्षा’
असे या आदेशाचे नाव आहे. या आदेशानुसार इराण, इराक, सुदान, सिरिया,
लिबिया, सोमालिया आणि येमेन या देशांतील नागरिकांना ३0 दिवसांपर्यंत
अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही.






No comments:
Post a Comment