Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) 

                                स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

    Vi.Da. Savarkar




                               त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६[१]) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें )जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली.
                             त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.
                             जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे 
    1. वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर}
    2. व्यवसायबंदी 
    3. स्पर्शबंदी 
    4. सिंधूबंदी 
    5. शुद्धीबंदी 
    6. रोटीबंदी 
    7. बेटीबंदी. 
    आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले


    • हिंदू महासभेचे कार्य
                                         रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
    एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
    सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतqला.१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न ,पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.
    • ग्रंथ आणि पुस्तके



                                          वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्याच कमलाया काव्यसंग्रहातील खालील ओळी त्यांचा कडवा राष्ट्रवाद दर्शवितात -
    अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जातीत्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?परी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,फूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची.






    • स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनक्रम (महत्वाच्या घटनांचे दिनांक)



    1. (जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६) १८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि. नाशिक).
    2. १८९२ मातृ निधन.
    3. १८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ.
    4. १८९९ सप्टें ५ पितृनिधन.
    5. १९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना.
    6. १९०१ मार्च विवाह.
    7. १९०१ डिसे.१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
    8. १९०१ जाने.२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.
    9. १९०४ मे. अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.
    10. १९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी.
    11. १९०५ डिसे.२१ बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
    12. १९०६ जून ९ लंडनला प्रयाण.
    13. १९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.
    14. १९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.
    15. १९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.
    16. १९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.
    17. १९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.
    18. १९०९ जून वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.
    19. १९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध.
    20. १९०९ आक्टो.२४ लंडनमधे दसर्याचा उत्सव, अध्यक्ष— बॅ.गांधी.
    21. १९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक.
    22. १९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी.
    23. १९१० डिसे.२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.
    24. १९११ जाने.३१ दुसर्या जन्मठेपेची शिक्षा.
    25. १९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.
    26. १९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.
    27. १९२० नोव्हें. धाकचे बंधु डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.
    28. १९२१ मे.२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.
    29. १९२१ नि १९२२ अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास.
    30. १९२३ मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा.
    31. १९२४ जाने.६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.
    32. १९२५ जाने.७ कन्या “प्रभात” हिचा जन्म.
    33. १९२६ जाने.१० हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
    34. १९२७ मार्च १ रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट नि चर्चा.
    35. १९२७ मार्च १७ पुत्र “विश्वास” याचा जन्म.
    36. १९३० नोव्हें १६ रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन
    37. १९३१ फेब्रु.२२ पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
    38. १९३१ फेब्रु २५ मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष.
    39. १९३१ एप्रिल २६ सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा.
    40. १९३१ सप्टें २२ नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली.
    41. १९३१ सप्टें १७ श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापाठ
    42. नि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.
    43. १९३७ मे १० रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता.
    44. १९३७ डिसे.३० हिंदु महासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.
    45. १९३८ एप्रिल १५ ‘महाराष्ट्र-साहित्य-संमेलन’ २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष.
    46. १९३९ फेब्रु १ निजाम विरोधी ‘भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार’ प्रारंभ.
    47. १९४१ जून २२ सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.
    48. १९४१ डिसे.२५ भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.
    49. १९४३ मे २८ ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण.
    50. १९४३ आगस्ट १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली.
    51. १९४३ नोव्हें ५ अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष.
    52. १९४५ मार्च १६ वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.
    53. १९४५ एप्रिल १९ अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.
    54. १९४५ मे ८ कन्या ‘प्रभात’ चा विवाह, पुणे.
    55. १९४६ एप्रिल मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली.
    56. १९४७ आगस्ट १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले.
    57. १९४८ फेब्रु. ५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.
    58. १९४९ फेब्रु १० गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका.
    59. १९४९ आक्टो १९ धाकटे बंधु डा. नारायणराव यांचे निधन.
    60. १९४९ डिसे. अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.
    61. १९५० एप्रिल ४ पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास.
    62. १९५२ मे १०-१२ ‘अभिनव-भारत’ संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे.
    63. १९५५ फेब्रु. रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.
    64. १९५६ जुलै २३ लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.
    65. १९५६ नोव्हें १० अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.
    66. १९५७ मे १० दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण.
    67. १९५८ मे २८ ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार.
    68. १९५९ आक्टो ८ पुणे विद्यापीठाने ‘डी-लिट’ सन्मान्य पदवी(घरी येऊ




    No comments:

    Post a Comment