Current affairs | Evening News Marathi
Current affairs 30 April 2020 Marathi |
30 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
संचारबंदीच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी धान्याच्या मालवाहतुकीत मोठी वाढ
Large increase in private grain shipments compared to last year during the curfew
संचारबंदी जाहीर झाल्यापासून 25 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत 7.75 लक्ष टनांहून अधिक खासगी धान्याची मालवाहतूक भारतीय रेल्वेनी देशभरात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 6.62 लक्ष टन धान्याची मालवाहतूक झाली होती.
रेल्वेद्वारे खासगी धान्याची मालवाहतूक करण्यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू ही आघाडीची राज्ये आहेत.
आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीला HCARD रोबोटची साथ
Accompanying HCARD robots to help leading healthcare workers
दुर्गापूर येथील CSIR-सेंट्रल मेकेनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या प्रयोगशाळेनी HCARD (हॉस्पिटल केअर असिस्टिव्ह रोबोटिक डिव्हाइस) रोबोटिक उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि नेव्हिगेशनच्या स्वयंचलित तसेच मानवचलित अशा दोन्ही पद्धतीने कार्य करते.
संसर्ग झालेल्या लोकांची काळजी घेताना रुग्णालयातल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोविड-19 विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे HCARD रोबोट आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचार्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांपासून शारीरिक अंतर राखण्यास मदत करू शकते.
No comments:
Post a Comment