Current affairs | Evening News Marathi
Current affairs 5 December 2019 Marathi |
5 डिसेंबर 2019 मराठी करेंट अफेयर्स
जागतिक मृदा दिन: 5 डिसेंबर
संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (UN FAO) यांच्या नेतृत्वात दरवर्षी 5 डिसेंबर या दिवशी जगभरात जागतिक मृदा दिन (World Soil Day) पाळला जातो. अन्न सुरक्षा, निरोगी पर्यावरण आणि मानव कल्याणासाठी मृदेच्या गुणधर्मांचे महत्त्व पटवून देणारे संदेश पसरवणे हे या दिनाचे उद्दीष्ट आहे.
या वर्षी या दिनाची "स्टॉप सॉइल एरोजन, सेव्ह अवर फ्युचर" ही संकल्पना आहे.
पार्श्वभूमी
हवामानातले बदल, दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकास यादृष्टीने कार्य करण्यासह अन्नसुरक्षा, कृषी यासाठी मृदेचे महत्त्व याच्यासंबंधी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो.
जून 2013 मध्ये ‘वैश्विक मृदा भागीदारी’ च्या चौकटीत FAO परिषदेच्या प्रस्तावादाखल, डिसेंबर 2013 मध्ये 68व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत दि. 5 डिसेंबर 2014 रोजी प्रथम अधिकृत ‘जागतिक मृदा दिन’ पाळण्याचे मान्य केले गेले. मुळात मृदा दिनाची कल्पना 2002 साली इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायंसेस (IUSS) द्वारा प्रस्तावित केली गेली होती.
मृदा / जमीन / माती
मृदा हा एक मर्यादित नैसर्गिक स्त्रोत आहे. मानवी कालखंडात मृदा पुनर्निर्मित केली जाऊ शकत नाही. तथापि, मानवी जीवनामध्ये मृदेची भूमिका महत्त्वाची असूनही, अनुचित व्यवस्थापन पद्धतीमुळे मृदेचा कस कमी होण्यामध्ये जागतिक पातळीवर वाढ होत आहे.
काही तथ्ये -
- मृदेमध्ये वातावरणाच्या तुलनेत तीन पटीने अधिक कार्बन असते आणि ते बदलणार्या वातावरणासंबंधीच्या आव्हानांना तोंड देण्यास मदत करू शकते.
- 815 दशलक्ष लोक अन्न मिळण्याबाबत असुरक्षित आहेत आणि 2 अब्ज लोक पोषणाच्या बाबतीत असुरक्षित आहेत, परंतु हे प्रमाण मृदेच्या सहाय्याने कमी केले जाऊ शकते.
- आपल्याला लागणारे 95 टक्के अन्न मृदेमधून येते.
- जागतिक पातळीवर 33 टक्के मृदा आधीच नापीक झालेली आहे.
मृदा संवर्धनाच्या पद्धती
- जमिनीचे अधिक प्रमाणात शोषण (शेतीसाठी वापर) न करणे.
- जमिनीची धूप थांबवणे. जमिनीमध्ये क्षारचे प्रमाण कमी करण्यास प्रयत्न करणे.
- रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि त्याऐवजी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.
- जमिनीमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी नैसर्गिक जीवसृष्टीला उपयोगात आणणे, जसे की गांडूळ, कीटक.
- छतावर शेती करणे. पिकात फेरबदल करणे.
मासात्सुगू असाकावा: आशियाई विकास बँकेचे (ADB) नवे अध्यक्ष
जापानचे मासात्सुगू असाकावा ह्यांची आशियाई विकास बँक (ADB) याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. ताकेहिको नाकाओ ह्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मासात्सुगू असाकावा हे आशियाई विकास बँकेचे 10 वे अध्यक्ष असणार. ते 17 जानेवारी 2020 रोजी पदभार सांभाळतील. सध्या ते जापानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करीत आहेत.
आशियाई विकास बँक (ADB)
आशियाई विकास बँक (ADB) ही एक प्रादेशिक विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधल्या आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या हेतूने केली गेली. मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे.
“फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. त्याचे 68 देश सभासद आहेत.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment