Current affairs | Evening News Marathi
Current affairs 30 November Marathi |
30 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
नवीदिल्लीत ‘UNDP अॅक्स्सेलेरेटर लॅब’ उघडण्यात आली
संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्यावतीने (UNDP) नवी दिल्लीत ‘अॅक्स्सेलेरेटर लॅब’ उघडण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदूषणासारख्या देशाला भेडसावणार्या गंभीर समस्यांवर कल्पक उपाययोजना शोधल्या जाण्यास मदत मिळणार आहे.
नवकल्पनेच्या माध्यमातून उद्दिष्टे साध्य करण्यासाठी UNDP याने NITI आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सोबतही भागीदारी केली आहे.
उपक्रमाविषयी
- संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्यावतीने (UNDP) जगभरात त्याचा संशोधनात्मक ‘अॅक्स्सेलेरेटर लॅब’ नावाचा उपक्रम राबवविला जातो.
- या उपक्रमाच्या माध्यमातून देशाला भेडसावणार्या समस्यांवर कल्पक उपाययोजना सुचविण्यासाठी तांत्रिक मदत पुरवली जाते.
- जगभरात आज अश्या 60 प्रयोगशाळा कार्यरत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)
हा संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (UN) राबवविण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे. 1965 साली त्याची स्थापना करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात आहे. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या सहा विशेष मंडळांपैकी एक असून तो आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अखत्यारीत येतो.
ह्या कार्यक्रमद्वारे जगातील 177 देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते. दारिद्र्य निर्मुलन, HIV/एड्स इत्यादी रोगांचे उच्चाटन, लोकशाहीचा प्रसार तसेच मानवी हक्कांसाठी लढा इत्यादी अनेक लोकोपयोगी उपक्रम यामार्फत चालवले जातात.
भारतीय नौदलामध्ये डोर्नियर विमानांची सहावी तुकडी सेवेत
भारतीय नौदलामध्ये डॉर्नियर विमानांची सहावी तुकडी सेवेत रुजू झाली आहे. “इंडियन नेव्हल एयर स्क्वॉड्रॉन 314” असे या तुकडीचे नाव आहे, ज्याला ‘रॅप्टर्स’ देखील म्हणतात. नौदल प्रमुख व्हाईस अॅडमिरल एम. एस. पवार यांनी या तुकडीला सेवेत नेमले आहे.
ठळक मुद्दे
- ही तुकडी गुजरातच्या पोरबंदर शहरात तळ ठोकणार आहे.
- डोर्नियर विमानांमुळे पाकिस्तानालगतच्या सागरी सीमेजवळच्या किनारपट्टीच्या भागात पाळत ठेवली जाणार आहे.
- या तुकडीमुळे उत्तर अरबी समुद्रामध्ये पाळत ठेवणे सोपे होणार आहे.
भारतीय नौदलाविषयी
भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते. ‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली. त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.
1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment