Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, September 14, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 14 September Marathi | 14 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 September  Marathi | 
      14 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    चंद्रमोहीमेच्यासंदर्भात ISRO इस्राएलच्या SpaceIL सोबत करार करणार.


    भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) जाहीर केले आहे की संस्था चंद्रमोहीमेच्या संदर्भात इस्राएल देशाच्या SpaceIL या खासगी अंतराळ केंद्रासोबत करार करणार आहे. दोन्ही देशांच्या संस्था संयुक्तपणे चंद्रमोहीमेच्या अपयशाचा तपास करून त्याची कारणे शोधण्यासाठी हा करार करणार आहे.
    भारताच्या चंद्रयान-2 प्रमाणेच इस्राएलच्या चंद्रमोहीमेतही अखेरच्या क्षणी अडथळे आले होते. इस्राएलचे चंद्रयान अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले होते. या यानाला अपघात झाला होता.

    इस्त्राची बेरेशीट चंद्रमोहीम

    इस्त्राएलच्या SpaceIL या खासगी कंपनीचे ‘बेरेशीट’ नावाचे अंतराळयान 21 फेब्रुवारी 2019 रोजी चंद्रावर सोडण्यात आले होते. इस्राएलचे हे यान याच वर्षी 11 एप्रिलला चंद्रावर उतरणार होते. लँडिंगच्या आधी काही क्षण इंजिनचे काम बंद पडले. हे इंजिन सुरू करण्याचा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला पण मग त्यांचा लँडरशी संपर्क तुटला आणि पुढील काही सेंकदातच इस्त्राएलचे हे अंतराळयान कोसळले.
    दरम्यान चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांमध्ये इस्त्राएल या देशाचा 7 वा क्रमांक आहे. आतापर्यंत चंद्रावर जाणाऱ्या देशांमध्ये रशिया, अमेरिका आणि चीनचा समावेश आहे. इस्त्राएलच्या या मोहिमेसाठी तब्बल दहा कोटी डॉलर खर्च झाले आहेत.



    NBFC कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी IFC आणि FIDC यांच्यात सामंजस्य करार

    जागतिक बँक समूहाचा भाग असलेले आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाने (IFC) देशातल्या बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांच्या प्रशिक्षणात सहकार्य करण्यासाठी भारताच्या भांडवल व कर्जासाठी वित्तपुरवठा करणार्‍या ‘वित्त उद्योग विकास परिषद (FIDC)’ या मंडळासोबत सामंजस्य करार केला आहे.
    या कराराच्या अंतर्गत NBFC कंपन्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम "कमर्शियल क्रेडिट रिपोर्टिंग" या घटकावर आयोजित केले जातील, ज्याचा कंपन्यांची क्षमता वाढविणे आणि पट विभागांमधील कमर्शियल क्रेडिट इन्फॉर्मेशन डेटाचा तपास करणे हा उद्देश आहे.
    हा प्रशिक्षण कार्यक्रम IFCच्या मार्गदर्शनाखाली भारतातल्या विविध केंद्रांवर आयोजित केला जाणार आहे. कार्यक्रमात मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या सदस्यांना ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या पत गरजा पूर्ण करण्याविषयी जागृती, कौशल्य आणि व्यवसायिकता यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
    IFC बाबत
    आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (International Finance Corporation -IFC) ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे, जी कमी विकसित देशांमध्ये खासगी क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक, सल्लागार आणि भांडवली व्यवस्थापन सेवा देते. ही संस्था जागतिक बँक समूहाचा भाग आहे. त्याची स्थापना 20 जुलै 1956 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. या शहरात आहे.

    No comments:

    Post a Comment