Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, September 10, 2019

    Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 10 September Marathi |   10 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 10 September  Marathi | 
      10 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    अंध लोकांच्या उपयोगासाठी नोटा आणि नाणी ओळखण्यासाठी RBI मोबाईल अॅप तयार करीत आहे

    अंध तसेच दृष्टिहीन लोकांना चलनातली नोटा आणि नाणी ओळखता यावीत म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) एक मोबाईल अॅप तयार करण्यात येत आहे.

    सध्या RBIने अनेक नवीन आकाराच्या नोटा आणि नाणी चलनात आणली आहेत मात्र ती ओळखण्यात अंध लोकांना समस्या उद्भवत आहेत. यावर उपाय म्हणून RBI कडून हे अॅप तयार केले जात आहे. अॅप तयार करण्यासाठी डॅफ्फोडील प्राय. लिमिटेड या तंत्रज्ञान संस्थेची निवड केली गेली.

    अंध व्यक्तींना चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्यावतीने उदय वारूंजीकर यांनी नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे RBIला आदेश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला अॅप बनवण्याचे आदेश दिले होते.

    भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सध्या 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या चलनी नोटा बाजारात आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून 1 रुपयांची नोटही प्रस्तुत करण्यात आली आहे. नोट कोणत्या रकमेची आहे, हे अंध व्यक्तींना ओळखता यावे यासाठी 100 रुपयांपासून पुढच्या रकमेच्या नोटा छापताना ठराविक खूणांचा वापर केलेला असतो, जेणेकरून अंध व्यक्तीला ती नोट ओळखता यावी. आता त्यासोबतच अ‍ॅप आणण्याचे RBIने ठरविले आहे.

    अ‍ॅपचे स्वरूप

    मोबाईल कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचे छायाचित्र असलेल्या जुन्या आणि नव्या आकारातल्या नोटा कोणत्या रकमेच्या आहेत हे ओळखणार

    वापरकर्त्याने तोंडाने संबंधित अ‍ॅपचे नाव उच्चारल्यावर ते उघडणार

    मोबाईल कॅमेऱ्याच्या सहाय्याने बँकेची नोट स्कॅन केल्यावर दोन सेकंदाच्या आत ती नोट किती रुपयांची आहे हे अ‍ॅप सांगणार

    अ‍ॅपने आवाजी स्वरुपात वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये वापरकर्त्याला माहिती देणार



    यूएस ओपन 2019 (टेनिस): राफे नदाल, बियांका आंद्रेस्कू विजेते

    2019 यूएस ओपन (किंवा अमेरिकन ओपन) ही टेनिस स्पर्धा न्यूयॉर्क शहरात बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर येथे आऊटडोर हार्ड कोर्टवर नुकतीच खेळली गेली. ही या स्पर्धेची 139 वी आवृत्ती होती आणि या वर्षाची चौथी आणि अंतिम ग्रँड स्लॅम स्पर्धा होती.
    स्पर्धेचे विजेते
    • महिला एकेरी - बियांका आंद्रेस्कू (कॅनडा)
    • पुरुष एकेरी - राफेल नदाल (स्पेन)
    • महिला दुहेरी - एलिस मर्टेन्स (बल्गेरिया) व एरिना साबालेन्का (बेल्जियम)
    • पुरुष दुहेरी – जुआन सेबॅस्टियन कॅबल व रॉबर्ट फराह (कोलंबियाची जोडी)
    • मिश्र दुहेरी - बेथनी मॅटेक-सँड्स (अमेरिका) व जेमी मरे (ब्रिटन)
    स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविणारी बियांका आंद्रेस्कू कॅनडाची पहिलीच टेनिसपटू ठरली. तसेच, ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकावणारी बियांका कॅनडाची पहिलीच टेनिसपटू ठरली.
    स्पेनच्या राफेल नदालचे हे 19 वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. त्याने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हला पराभूत केले. त्याने चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. सर्वाधिक 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविण्याचा विक्रम रॉजर फेडररने केला असून त्याची बरोबरी करण्यासाठी नदालला आणखी एका जेतेपदाची गरज आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. याआधी 1970 मध्ये केन रोजवालने वयाच्या 35 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती.

    No comments:

    Post a Comment