Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, September 9, 2019

    Current affairs | Evening News Marathi | Current affairs 9 September Marathi |   9 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 9 September Marathi | 
      9 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    मालदीवमध्ये चौथी ‘हिंद महासागर परिषद’ संपन्न

    मालदीव या देशाची राजधानी माले या शहरात 3 आणि 4 सप्टेंबर 2019 रोजी ‘हिंद महासागर परिषद 2019’ पार पडली. "हिंद महासागर प्रदेश सुरक्षित करणे: पारंपारिक आणि पारंपारिक आव्हाने" या विषयाखाली ही परिषद भरविण्यात आली होती.

    मालदीव सरकार आणि सिंगापूरचे एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत भारताच्यावतीने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.

    तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क निझामाबाद जिल्ह्यात उभारले

    तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क निझामाबाद जिल्ह्यात लक्कमपल्ली (नंदिपेठ मंडल) येथे उभारण्यात आले असून त्याचे 7 सप्टेंबर 2019 रोजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

    ‘स्मार्ट अ‍ॅग्रो फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेड’ नावाचा हा मेगा फूड पार्क उभारल्यामुळे निजामाबाद, निर्मल, जगतील, राजन्ना सिर्सीला कामारेड्डी तसेच महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना फायदा होईल.

    No comments:

    Post a Comment