Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 26 August Marathi | 26 ऑगस्ट 2019 करेंट अफेयर्स मराठी
पी. व्ही. सिंधू: BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय
बासेल (स्वीत्झर्लंड) येथे भारताच्या पी. व्ही. सिंधू ह्या बॅडमिंटनपटूने ऐतिहासिक कामगिरी करताना ‘जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह, 24 वर्षीय पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय ठरली आहे.
25 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या स्पर्धेच्या महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात सिंधूने जापानच्या नोझोमी ओकुहाराचा एकतर्फी धुव्वा उडवला. तसेच या स्पर्धेत तिने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्यपदकासह एकूण पाच पदकांची कमाई करताना चीनची बॅडमिंटनपटू झांग नींग यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
‘जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे अन्य विजेते -
- भारताच्या बी. साई प्रणीत ह्याने पुरुष एकेरी गटात कास्यपदक जिंकले. बी. साई प्रणीत गेल्या 36 वर्षांत जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळविणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला.
- पुरुष एकेरी गटाचा विजेता - केंटा मोमोटा (जापान)
- पुरुष दुहेरी (सुवर्ण) - मोहम्मद अहसान व हेंद्रा सेतीवन (इंडोनेशियाची जोडी)
- महिला दुहेरी (सुवर्ण) - मायू मत्सुमोटो आणि वाकाना नागाहारा (जापानी जोडी)
- मिश्र दुहेरी (सुवर्ण) - झेंग सिवेई आणि हुआंग याकियांग (चिनी जोडी)
जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) ही बॅडमिंटन खेळासाठीची आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीद्वारे मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. ही संघटना 1934 साली ‘आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघ (IBF)’ या नावाने स्थापन करण्यात आली होती. त्याचे मुख्यालय क्वाला लंपुर (मलेशिया) येथे आहे. BWF चे 176 सदस्य आहेत.
"कलवी तोलाईकाच्ची" TV: तामिळनाडू सरकारची विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी
राज्यातल्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने, 26 ऑगस्ट 2019 रोजी तामिळनाडू राज्य सरकारने एक विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी (टीव्ही चॅनेल) सुरू केले. "कलवी तोलाईकाच्ची" (एज्युकेशन टीव्ही) असे या वाहिनीचे नाव आहे.

No comments:
Post a Comment