Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, August 13, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 13 August Marathi |    13 ऑगस्ट 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 13 August Marathi |   
    13 ऑगस्ट 2019 करेंट अफेयर्स मराठी

    ऐश्वर्या पिसे: मोटारस्पोर्ट्स प्रकारामध्ये विश्वजेतेपद जिंकणारी प्रथम भारतीय


    बेंगळुरूच्या ऐश्वर्या पिसे हिने 'FIM विश्वचषक’ या स्पर्धेमधील महिलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. मोटरस्पोर्ट्स म्हणजेच दुचाकी मोटारगाड्यांच्या शर्यतीमध्ये विश्वचषक उंचावणारी ऐश्वर्या पिसे ही पहिलीच भारतीय ठरली.


    23 वर्षीय ऐश्वर्या पिसे कनिष्ठ गटात दुसऱ्या स्थानावर राहिली. पिसे हिने दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत बाजी मारली होती, तर पोर्तुगालमध्ये झालेल्या फेरीत तिसऱ्या स्थानी राहिली होती. तसेच, ती स्पेनमधील फेरीत पाचव्या, तर हंगेरीत चौथ्या क्रमांकावर राहिली. तिच्या खात्यात एकूण 65 गुण झाले आणि तिचे जेतेपद निश्चित झाले.


    भारतभर क्लाऊड डेटा सेंटर उभारण्यासाठी जियो आणि मायक्रोसॉफ्ट एकत्र


    डिजिटलीकरणाला गती देण्याच्या हेतूने, रिलायन्स जियो या भारतीय दूरसंचार कंपनीने भारतात क्लाऊड डेटा सेंटर उभारण्यासाठी मायक्रोसॉफ्टबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीमधून मायक्रोसॉफ्टच्या अझ्यूर क्लाउड प्लॅटफॉर्मची मदत घेत जियो संपूर्ण भारतभर डेटा सेंटरचे जागतिक दर्जाचे एक मोठे जाळे तयार करणार आहे. जियो हजारो नोडसह संपूर्ण भारतभर ‘एज कंप्यूटिंग अँड कंटेंट डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क’ याची स्थापना करीत आहे.



    No comments:

    Post a Comment