Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, July 4, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 4 July 2019 Marathi | 4 जुलै 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 4 July  2019 Marathi | 
      4 जुलै 2019 करेंट अफेयर्स मराठी


    शाकिब अल हसनक्रिकेट विश्वचषकात 500 धावा आणि 10 बळी घेणारा पहिला खेळाडू

    ब्रिटनमध्ये चालू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषक 2019 या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बांग्लादेशाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने 2 जुलैला अर्धशतक केले. त्याने आतापर्यंत 4 अर्धशतके आणि दोन शतके केली आहेत.
    यासोबतच विश्वचषक स्पर्धेत त्याने 500 धावा पूर्ण केल्या असून यासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच त्याने विश्वचषक स्पर्धेत 500 धावा आणि 10 गडी बाद करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट जगतातला एकमेव खेळाडू आहे.
    शाकिब अल हसन हा जगातला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात आहे. मॉर्गन, रूट किंवा अॅरॉन फिंच, रोहित शर्मा, वॉर्नर यांना शाकिब अल हसनने मागे टाकले आहे. सध्या त्याने आतापर्यंत 542 धावा केल्या आहेत. तो याबाबतीत दुसऱ्या स्थानावर असून भारताचा रोहित शर्मा 544 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.
    शाकिब अल हसनने विश्वचषक स्पर्धेत शतक आणि एकाच सामन्यात 5 बळी घेण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी आतापर्यंत फक्त दोन खेळाडूंनी केली आहे, ते म्हणजे भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि युवराज सिंग. त्यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा शाकिब तिसरा खेळाडू ठरला आहे.


    2025 सालापर्यंत वैद्यकीय खर्चात GDPच्या 2.5% पर्यंत वाढ केली जाणार: केंद्र सरकार

    संसदेत यावर्षीचा अर्थसंकल्प चर्चेसाठी मांडण्यापूर्वी सरकारच्या प्रगतीचा आढावा घेतला जात आहे.
    आजतोवर आरोग्यविषयक सेवांवर होणार्‍या सरकारी खर्चात सतत वाढ झाली आहे आणि 2025 सालापर्यंत हा खर्च देशाच्या GDPच्या 2.5 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे आणि ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण-2017’ मध्ये तशी कल्पना दिली आहे, असे यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
    धोरणामध्ये दिलेले प्रस्ताव आणि प्रगती
    • राज्य सरकारांनी 2020 सालापर्यंत राज्याच्या अर्थसंकल्पाच्या 8 टक्क्यांहून अधिक खर्च वैद्यकीय क्षेत्रावर खर्च करावा.
    • आयुषमान भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत 2022 सालापर्यंत 1.5 लक्ष आरोग्य व कल्याणकारी केंद्रांची स्थापना करण्याची योजना आहे. त्यापैकी 18-19 हजार आधीच तयार केले गेले आहेत. हे केंद्र ग्रामीण आणि शहरी भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार.
    • सरकारने वैयक्तिक आयकर आणि पालिका कर यावर 3% शिक्षण उपकर आकारण्याऐवजी 4% आरोग्य आणि शिक्षण उपकर सादर केला आहे.
    • हायर एज्युकेशन फंडींग एजन्सी (HEFA) वैद्यकीय संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या संदर्भात कामांना समर्थन पुरविण्यास सुरुवात केली आहे.

    No comments:

    Post a Comment