Current affairs | Evening News Marathi
Current affairs 1 AproA 2019 Marathi |
1 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
न्या. डी. के. जैन: BCCIचे तात्पुरते इथिक्स अधिकारी
28 मार्चला निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन ह्यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) इथिक्स अधिकारी (नीतीमत्ता अधिकारी) पदी तात्पुरत्या आधारावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती नवी निवड होतपर्यंत केली गेली आहे.
भारतीय क्रिकेटच्या हितार्थ उद्भवलेल्या वादांशी संबंधित मुद्दे शोधण्यासाठी आणि ठरविण्यासाठी इथिक्स अधिकारी नियुक्त केले जाते.
डी. के. जैन हे सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले BCCIचे पहिले लोकपाल आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासंदर्भात तक्रारींच्या निवारणाची जबाबदारी नव्या लोकपालाकडे दिली गेली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) याची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे. भारतातल्या क्रिकेटसाठी असलेली राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. हा राज्य क्रिकेट संघांचा एक संघ आहे.
PNB जनरल अटलांटिक समूहाला PNBHFL मधील त्याचा भाग विकणार
पंजाब नॅशनल बँक (PNB) पीएनबी हाऊसिंग फायनान्स (PNBHFL) या वित्तीय कंपनीमधील एकूण 1,851.60 कोटी रुपये इतके मूल्य असलेला त्याचा 13% हिस्सा जनरल अटलांटिक समूह आणि वार्दे पार्टनर्स या जागतिक इक्विटी संदर्भातल्या कंपन्यांना विकण्याची योजना तयार करीत आहे.
त्यासंबंधीच्या करारानुसार जनरल अटलांटिक समूहाला PNBHFL मधील 1,08,91,733 समभाग विकले जाणार तर वार्दे पार्टनर्सला 1,08,91,733 समभाग विकले जातील.
पंजाब नॅशनल बँक
ही एक भारतीय आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. याची मुख्य शाखा नवी दिल्लीत आहे. या सार्वजनिक बँकेची स्थापना 1894 साली झाली. लाला लाजपत राय आणि दयाल सिंग माजिठीया हे बँकेच्या संस्थापकांपैकी एक आहेत.
आरोग्य मंत्रालयाकडून औषधे व वैद्यकीय चाचण्यांच्या संदर्भात नवे नियम अधिसूचित
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘औषधे व वैद्यकीय चाचण्या संदर्भात नियम-2019’ अधिसूचित केले आहे.
सर्व नवी औषधे तसेच मानवी वापरासाठी व वैद्यकीय चाचण्यांसाठी अन्वेषनार्थ नवी औषधे, केला जाणारा अभ्यास आणि धोरणात्मक समित्यांना हे नियम लागू होतील.
नवीन नियमांनुसार,
- परवानगीचा अर्ज मंजूर करण्यासाठी लागणारा कालावधी कमी करीत तो भारतातल्या औषधांकरिता 30 दिवसांपर्यंत आणि देशाबाहेर विकसित होणार्या औषधांकरिता 90 दिवसांपर्यंत करण्यात आला आहे.
- भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरल कडून कोणताही संपर्क न झाल्यास, अर्ज मंजूर केला जाईल असे मानले जाईल.
- जर ड्रग्स कंट्रोलर जनरल कडून निर्दिष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही देशात (युरोपीय संघ, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका) जर एखाद्या औषधाला परवानगी मिळालेली असेल आणि त्याचे विपणन केले जात असेल तर भारतातल्या वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नवीन औषधांच्या मंजूरीसाठी माफ केली जाऊ शकते.
आज भारत जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि सर्वात जास्त रोगाचा भार वाहणारा देश आहे, परंतु जागतिक वैद्यकीय चाचण्यांच्या केवळ 1.2% पेक्षा कमी भाग देशात दिसून येतो.
भारतीय लष्करात चार ‘धनुष्य’ होव्हित्झर तोफा समाविष्ट करण्यात आल्या
देशातच विकसित करण्यात आलेल्या चार ‘धनुष्य’ तोफा भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
स्वदेशी धनुष्य तोफ
देशातच विकसित करण्यात आलेली ‘धनुष्य’ तोफ प्रणाली (artillery gun) ही 1980च्या दशकात भारताने खरेदी केलेल्या स्वीडिश बोफोर्स होव्हित्झर तोफेची एक अद्ययावत आवृत्ती आहे. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि खाजगी क्षेत्राने एकत्रितपणे विकसित केलेल्या अॅडव्हान्स टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS) म्हणजेच ‘धनुष्य’ तोफेने 48 किलोमीटर अंतरावरचे लक्ष्य भेदून नवा विक्रम केलेला आहे.
155 मि.मी. x 45 मि.मी. कॅलिबर या आकाराचा तोफेचा गोळा ही तोफ वापरते. ही तोफ अत्याधिक पाऊस असो वा बर्फवृष्टी, कोणत्याही परिस्थितीत अचूक वेध घेऊ शकते. ही कोणत्याही प्रदेशात (सपाट मैदान, वाळवंट वा डोंगराळ भागात) हाताळण्यास सहज आहे.
भारतीय कॉफीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ई-बाजारपेठ तयार
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून भारतात उत्पन्न घेतल्या जाणार्या कॉफीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
भारतीय कॉफीच्या व्यापारासाठी त्यासंबंधी अॅप व्यापारात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. हा प्रायोगिक प्रकल्प शेतकर्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी राबवविला जात आहे आणि त्यामुळे कॉफी उत्पादकांना वाजवी किंमतीविषयी जाणीव होईल. हे उत्पादन व पुरवठा शृंखलेत कॉफी उत्पादक आणि खरेदीदार यांच्यातल्या स्तरांची संख्या देखील कमी करेल आणि शेतकर्यांची मिळकत दुप्पट करण्यास मदत करेल.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेली इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ विकसित करण्यासाठी कृषीविषयक डिजिटल शेतमाल व्यवस्थापन व्यासपीठाच्या संदर्भातली बेंगळुरू येथील ‘एका प्लस’ ही जागतिक कंपनी कॉफी बोर्डशी सहकार्य करीत आहे.
भारतीय कॉफी व्यापार
भारत हा जगातला एकमेव देश आहे, जिथे संपूर्ण कॉफी सावलीमध्ये वाढविली जाते, हातानी तोडले जाते आणि सूर्यप्रकाशात वाळवली जाते. भारतात जगात उगवल्या जाणार्या सर्वोत्कृष्ट कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
पाश्चात्य आणि पूर्व घाटाच्या प्रदेशात राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यालगत राहणार्या आदिवासी लोकांकडून कॉफीची लागवड केली जाते. भारतीय कॉफीचे जागतिक बाजारपेठेत अधिक महत्त्व आहे आणि ती प्रिमियम कॉफी म्हणून विकली जाते.
No comments:
Post a Comment