Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, March 30, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 30 March 2019 Marathi | 30 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 30 March 2019 Marathi |   
    30  मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    भारतीय लष्करात चार ‘धनुष्य’ होव्हित्झर तोफा समाविष्ट करण्यात आल्या

    देशाच्या संरक्षण क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी, 26 मार्चला चार ‘धनुष्य’ या स्वदेशी अद्ययावत होव्हित्झर तोफा भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आल्या.
    धनुष्य होव्हित्झर तोफ प्रणाली
    देशातच विकसित करण्यात आलेली ‘धनुष्य’ तोफ प्रणाली (artillery gun) ही 1980 च्या दशकात भारताने खरेदी केलेल्या स्वीडिश बोफोर्स होव्हित्झर तोफेची एक अद्ययावत आवृत्ती आहे. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि खाजगी क्षेत्राने एकत्रितपणे विकसित केलेल्या अॅडव्हान्स टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS) म्हणजेच ‘धनुष्य’ तोफेने 48 किलोमीटर अंतरावरचे लक्ष्य भेदून नवा विक्रम केलेला आहे.
    155 मि.मी. x 45 मि.मी. कॅलिबर या आकाराचा तोफेचा गोळा ही तोफ वापरते. ही तोफ अत्याधिक पाऊस असो वा बर्फवृष्टी, कोणत्याही परिस्थितीत अचूक वेध घेऊ शकते. ही कोणत्याही प्रदेशात (सपाट मैदान, वाळवंट वा डोंगराळ भागात) हाताळण्यास सहज आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 30 March 2019 Marathi |   
    30  मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    सन 2011-12 मध्ये भारतात स्त्री-पुरुष वेतनातली तफावत 34% एवढी होती: ऑक्सफॅम इंडिया

    ऑक्सफॅम इंडिया या आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्थेनी "माइंड द गॅप - स्टेट ऑफ एम्प्लॉयमेंट इन इंडिया" या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाला भारतातल्या स्त्री श्रमशक्तीविषयीचा आहे.
    हा अहवाल राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण संघटना (NSSO) आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) यांच्याकडून केल्या गेलेल्या ‘रोजगार बेरोजगारी सर्वेक्षण (EUS) 2011-12’ या सर्वेक्षणाचा आधार घेवून तयार करण्यात आला आहे.
    अहवालानुसार,
    • रोजगाराचा प्रकार (प्रासंगिक आणि नियमित/पगारदार), संघटित वा असंघटित क्षेत्र आणि ठिकाण (शहरी व ग्रामीण) अश्या कोणत्याही घटकाला गृहीत न धरता, भारतात स्त्री कामगारांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिले जाते.
    • भारतात स्त्री-पुरुष वेतनातली तफावत 34% एवढी होती. याचा अर्थ असा होतो की स्त्रियांना समान पात्रतेसह समान कामासाठी पुरुषांपेक्षा 34% एवढे कमी वेतन मिळते.
    • 75% ग्रामीण स्त्रिया कृषीकामात गुंतलेल्या आहेत.
    • ग्रामीण रोजगारात झालेली घट, शहरी भागातले बदल, असमान वेतन, निगा संबंधी फुकटच्या कामाचा भार आणि प्रतिकूल सामाजिक परिस्थिती अश्या विविध समस्यांमुळे रोजगारात स्त्रियांचा सहभाग कमी असल्याचे दिसून येते.
    • निगा संबंधी फुकटची कामे आणि घरगुती कामांना गृहीत धरल्यास, सन 2011-12 मध्ये फीमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट (FLFPR) हा दर पुरुषांच्या तुलनेत 20.5% वरून 81.7% पर्यंत पोहचतो.
    ऑक्सफॅमने केलेल्या शिफारसी
    • अधिक नोकर्‍या तयार करण्यासाठी रोजगाराभिमुख क्षेत्रांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे.
    • नोकर्‍यामध्ये सर्वसमावेशक वाढ करणे आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसह सुरक्षित आणि सोयीचे कामाचे ठिकाण असणे आवश्यक आहे.
    • उत्पादकता सुधारण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे. हे दोन्ही असे क्षेत्र आहेत जे भविष्यात मोठे रोजगार निर्माण करू शकतात.
    • चांगल्या आणि संबंधित कौशल्य संधींवर अधिक लक्ष केंद्रित करणे.
    • भ्रष्टाचार रोखण्यास प्राधान्य देणे आणि असमानता, बेरोजगार व भांडवलशाहीसारख्या प्रवृत्तीला आळा घालणे आवश्यक आहे.
    • कर आणि सवलती यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 30 March 2019 Marathi |   
    30  मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    मनू भाकरला 12व्या आशियाई एअरगन स्पर्धेतले वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले

    तैपेईतील ताओयुआन येथे सुरू असलेल्या ‘आशियाई एअरगन अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत भारताच्या मनू भाकर हिने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. भाकरने अंतिम लढतीत हाँगकाँगच्या शिंग हो चिंगचा पराभव केला.
    तर सौरभ चौधरी ह्याने पुरुषांच्या 10 मे. एअर पिस्तुल प्रकारात सांघिक विभागात सुवर्णपदक कमाविले. याशिवाय अभिषेक वर्माने पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत रौप्यपदक मिळविले. स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी भारताने कामाविलेली पदकसंख्या एकूण 9 झाली आहे, त्यात 5 सुवर्ण, 3 रौप्य व एक कास्यपदकाचा समावेश आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 30 March 2019 Marathi |   
    30  मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    'हिकिकोमोरी': 6,13,000 वृद्ध जपानी लोक अलिप्तपणे राहतात

    जपानच्या सरकारने दिनांक 29 मार्च 2019 रोजी प्रकाशित केलेल्या त्याच्या अहवालानुसार, देशात 40 ते 64 या वयोगटातले 6,13,000 'हिकिकोमोरी' आहेत आणि त्यात सुमारे तीन चतुर्थांश पुरुष आहेत.
    'हिकिकोमोरी' याचा अर्थ काय?
    जपानमध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक आहे. वयोवृद्ध होत चाललेल्या जपान देशात एकलकोंडेपणा बळावत चालला आहे. एकलकोंडेपणा या शब्दाला जपानी भाषेत “हिकिकोमोरी” हा शब्द दिला गेला आहे.
    या शब्दाचा असा अर्थ होतो की “अशी व्यक्ती जी कुठल्याही शाळेत जात नाही किंवा सहा महिने किंवा अधिक कोणतेही काम करीत नाही आणि त्या काळात ती व्यक्ती कुटुंबाच्या बाहेर कोणाशीही कुठल्याहीप्रकारे संवाद साधत नाही”.
    जपान प्रशांत महासागर प्रदेशातला एक बेट राष्ट्र आहे. या देशाची राजधानी टोकियो हे शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 30 March 2019 Marathi |   
    30  मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    मद्रास उच्च न्यायालयाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पद्धतींबाबत विचारणा केली

    दिनांक 29 मार्च 2019 रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठाने केंद्र सरकार आणि तामिळनाडू राज्य सरकारांना हा प्रश्न विचारला की, पाणीटंचाई दूर करण्याच्या उद्देशाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 'क्लाऊड सिडिंग' (ढगांचे रेतन) यासारख्या आधुनिक कृत्रिम पद्धतींना उपयोगात का आणू शकत नाही आहेत.
    शिवाय पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, वेगवेगळ्या किनारपट्टीलगतच्या भागात कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकीच्या पुढाकाराने खारे पाणी बदलण्याचे प्रकल्प का उभारत नाही आहेत, असा देखील न्यायालयाने प्रश्न उभा केला.
    न्यायमूर्ती एन. किरुबाकरन आणि एस. एस. सुंदर यांच्या पीठाने एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान हे प्रश्न विचारले.
    'क्लाऊड सिडिंग' म्हणजे काय?
    क्लाउड सिडिंग (ढगांचे रेतन) म्हणजे पर्यावरणातला सुधारणेचा एक प्रकार आहे, ज्यात ढगांपासून होणार्‍या पावसाचे प्रमाण सुधारण्यासाठी ढगांमध्ये एक विशेष पदार्थ सोडला जातो. या प्रक्रियेसाठी सामान्यपणे सिल्वर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड आणि ड्राय आइस (सॉलिड कार्बन डाइऑक्साइड), शिवाय वायू रूपातले लिक्विड प्रोपेन वापरले जाते. क्लाऊड-सिडिंग प्रकल्पासाठी सामान्यपणे दुपारचा 1-4 वाजेपर्यंतचा काळ चांगला असतो. भारतात 2003 साली जलस्त्रोत मंत्रालयाने ‘प्रोजेक्ट वरुण’ या नावाने पहिला क्लाउड सिडिंग प्रकल्प राबवला होता.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 30 March 2019 Marathi |   
    30  मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    RBI कडून पंजाबसाठी रब्बी विपणन हंगामासाठी 19,240 कोटी रुपयांची रोख पत मर्यादा मंजूर

    दिनांक 29 मार्च 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) यावर्षीच्या रब्बी विपणन हंगामामध्ये गव्हाच्या खरेदीसाठी पंजाब राज्यासाठी 19,240.91 कोटी रुपयांची रोख पत मर्यादा (Cash Credit Limit -CCL) मान्य केली.
    धान्य खरेदीची रक्कम शेतकर्‍यांना वेळेत देण्यासाठी हा निधी उपयोगात आणला जाणार आहे. हा हंगाम 1 एप्रिल ते 25 मे या काळासाठी निश्चित केला आहे.
    यावेळी पंजाब राज्य सरकारकडून 130 लक्ष टन गव्हाची खरेदी केली जाणार आहे. केंद्र सरकारने रु. 1,840 प्रति क्विंटल ही गव्हाची किमान आधार किंमत (MSP) निश्चित केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 105 रुपयांनी अधिक आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 30 March 2019 Marathi |   
    30  मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    तिसर्‍या तिमाहीत भारताची चालू खात्यातली वित्तीय तूट GDPच्या 2.5%

    29 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर 2018 मध्ये संपणार्‍या तिसर्‍या तिमाहीत (Q3) भारताची चालू खात्यातली वित्तीय तूट (current account deficit -CAD) ही सकल स्थानिक उत्पन्नाच्या (GDP) 2.5% एवढी झाली आहे.
    तेलाच्या किंमतीट घट झाल्यामुळे, तसेच अपेक्षेपेक्षा कमी कर संकलन आणि सातत्याने होणारा सरकारी खर्च हे घटक या तूटीसाठी जबाबदार आहेत.
    प्राप्त महितीनुसार,
    • वित्त वर्ष 2018-19 साठी सकल स्थानिक उत्पन्न (GDP) वृद्धीदर 7% एवढा अंदाजित केला आहे.
    • 2019-20 या वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, केंद्र सरकार त्याच्या पूर्ण वर्षासाठी निश्चित केलेल्या 4.42 अब्ज डॉलर्स (जवळपास 306.7 अब्ज रुपये) एवढ्या मर्यादेच्या 62.3% कर्ज घेणार.
    • 2019-20 या वित्त वर्षात केंद्र सरकारने निर्गुंतवणूकीचे 80,000 कोटी रुपयांचे ठरविलेले लक्ष्य गाठले. 23 मार्च 2019 रोजी 85,000 कोटी रुपयांच्या निर्गुंतवणूकीचा टप्पा गाठला गेला.
    • एप्रिल-डिसेंबर 2018 दरम्यान भारताची व्यापार तूट 145.3 अब्ज डॉलर्स (जवळपास 10089.632 अब्ज रुपये) पर्यंत वाढली.
    • एप्रिल-डिसेंबर 2018 दरम्यान भारतात 24.8 अब्ज डॉलर्स (जवळपास 1722.112 अब्ज रुपये) एवढी निव्वळ थेट परकीय गुंतवणूक (FDI) झाली.
    सकल स्थानिक उत्पन्न (GDPम्हणजे काय?
    सकल स्थानिक उत्पन्न (Gross domestic product -GDP) हे सर्वसाधारणपणे वर्षभरात उत्पादित केल्या गेलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाचे आर्थिक मोजमाप आहे. GDPला "राष्ट्रीय विकास आणि प्रगतीसाठीचे जगातले सर्वात शक्तिशाली सांख्यिकीय निर्देशक" मानले जाते.
    विलियम पेटी या ब्रिटिश अर्थशास्त्रीने सन 1654-1676 या काळात पहिल्यांदा GDP ची मूलभूत संकल्पना मांडली. पुढे 1695 साली चार्ल्स डेव्हनंट ह्यांनी त्यासंबंधी पद्धती विकसित केली. सन 1934 मध्ये अमेरिकेच्या सायमन कुझनेट्स ह्यांनी GDPची आधुनिक संकल्पना प्रथमताः विकसित केली. नंतर ब्रेटन वुड्स परिषद-1944 मध्ये देशाची अर्थव्यवस्था मोजण्यासाठी GDP ला मुख्य साधन बनविले गेले.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 30 March 2019 Marathi |   
    30  मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    AIIPMR संस्था 1 ते 15 एप्रिल या काळात स्वच्छता पंधरवाडा पाळणार

    अखिल भारतीय शारीरिक औषधे व पुनर्वसन संस्था (AIIPMR) 1 एप्रिल ते 15 एप्रिल या काळात ‘स्वच्छता पंधरवाडा’ पाळणार आहे.
    या काळात शरीराच्या स्वच्छतेसंबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, ज्यात परिसंवाद, स्पर्धा आणि कचर्‍यापासून खत निर्मिती अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
    AIIMPR, मुंबई
    1955 साली स्थापना करण्यात आलेली अखिल भारतीय शारीरिक औषधे व पुनर्वसन संस्था (All India Institute of Physical Medicine and Rehabilitation - AIIPMR) हे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी शारीरिक वैद्यकीय पुनर्वसन क्षेत्रातली सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था पुनर्वसन क्षेत्रात सेवा, प्रशिक्षण देण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी समर्पित आहे. संस्थेचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे.

    WEF ग्लोबल एनर्जी ट्रांझिशन इंडेक्समध्ये भारत 76 व्या स्थानावर

    जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) च्या ग्लोबल एनर्जी ट्रांझिशन इंडेक्समध्ये भारत 76 व्या स्थानावर आहे. तथापि, मागील निर्देशांकाच्या तुलनेत भारताने दोन स्थानांची उडी घेतली आहे.
    वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF), ने जाहीर केलेल्या वार्षिक निर्देशांकच्या नवीन आवृत्तीत स्वीडन देखील यावर्षी आघाडीवर राहिले आहेत. जेनेव्हा-आधारित जागतिक आर्थिक मंचाने संकलित केलेल्या या वार्षिक यादीमध्ये ऊर्जा सुरक्षितता आणि पर्यावरणीय स्थिरता आणि क्षमतेसह प्रवेश संतुलित करण्यास ते किती सक्षम आहेत यावर 115 अर्थव्यवस्थांना जागा देण्यात आली आहे.
    भारत
    अहवालात असे म्हटले आहे की भारत उच्च प्रदूषण पातळी असलेल्या देशांमध्ये आहे आणि त्याच्या ऊर्जा व्यवस्थेत तुलनेने उच्च कार्बन डाय ऑक्साईड तीव्रता आहे.
    यात असेही म्हटले आहे की, अलिकडच्या वर्षांत भारताने ऊर्जा प्रवेश सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे आणि सध्या नियमन आणि ऊर्जा संक्रमणासंदर्भात राजकीय वचनबद्धतेच्या बाबतीत चांगले गुण आहेत.
    ग्लोबल रँकिंग
    स्वीडननंतर स्विट्जरर्लंड अनुक्रमे दुसरा आणि नॉर्वे तिसऱ्या क्रमांकावर आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या ब्रिक्स ब्लॉकमध्ये भारत दुसरा क्रमांक आहे, ब्राझील जागतिक स्तरावर 46 व्या क्रमांकावर आहे.
    याशिवाय, भारत निवडक पाच अर्थव्यवस्था पैकी एक आहे, ज्याने मागील वर्षाच्या निर्देशांकापेक्षा चांगले कार्य केले आहे.
    चीन भारतापेक्षाही खालच्या 82 व्या स्थानावर स्थान आहे. नियमन आणि राजकीय वचनबद्धतेसाठी चीन जगात सातव्या स्थानावर आहे.
    मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये यूके 7 व्या क्रमांकावर आहे, सिंगापूर 13 व्या, जर्मनी 17 व्या, जपान 18 व्या आणि 27 व्या क्रमांकावर आहे.
    आशियामध्ये मलेशिया 31 व्या स्थानावर आहे, श्रीलंका 60 व्या, बांग्लादेश 90 व्या आणि नेपाळ 93 व्या स्थानावर आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 30 March 2019 Marathi |   
    30  मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    No comments:

    Post a Comment