Current affairs | Evening News Marathi
Current affairs 28 March 2019 Marathi |
28 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
अंतराळातला उपग्रह पाडणार्या देशांमध्ये भारत सामील
27 मार्च 2019 रोजी भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी 'मिशन शक्ती' या मोहिमेच्या अंतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले आहे. ही मोहीम फक्त 3 मिनिटांत फत्ते झाली.
अशी कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, चीन, रशियानंतर जगातला चौथा देश ठरला आहे.
मोहिमेविषयी
अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाला लक्ष्य करून तो पाडण्याच्या या मोहिमेला भारताने 'मिशन शक्ती' असे नाव दिले. उपग्रह भारतातच तयार करण्यात आलेल्या ‘ए-सॅट’ (अॅंटी-सॅटलाइट) क्षेपणास्त्राद्वारे नष्ट करण्यात आला.
मोहिमेसाठी भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) उच्चकोटीची तांत्रिक प्रणाली विकसित केली. प्रामुख्याने DRDO आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) या दोन प्रमुख संस्थांनी या प्रकल्पावर गेली काही वर्षे काम केले आहे.
RBIने पंजाब नॅशनल बँकेला 2 कोटी रूपयांचा दंड ठोठावला
SWIFT प्रणालीच्या निर्दिष्ट नियामक दिशानिर्देशांचे पालन न करण्याप्रकरणी 27 मार्चला भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) पंजाब नॅशनल बँकेला (PNB) 2 कोटी रूपयांचा दंड ठोठावला.
SWIFT प्रणाली
सन 1973 मध्ये प्रस्तुत SWIFT (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनॅनष्यल टेलीकम्युनीकेशन) प्रणाली एक आंतरराष्ट्रीय जाळे आहे, ज्याचा वापर जगभरातल्या बँका आणि वित्तीय सेवा प्रदान करणार्या अन्य संस्था करतात. सर्व बँकांकडे एक SWIFT कोड असतो आणि या कोडच्या माध्यमाने परदेशी आर्थिक व्यवहारांमधून पैसे हस्तांतरीत केले जातात आणि व्यवहारांवर लक्ष ठेवण्याकरिता त्यासंबंधी माहितीचे आदानप्रदान केले जाते.
स्विफ्ट इंडिया हा SWIFT (सोसाइटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनॅनष्यल टेलीकम्युनिकेशन) ग्लोबल आणि भारतीय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या बँका यांच्यामधील संयुक्त उपक्रम आहे. याची स्थापना मार्च 2014 मध्ये करण्यात आली. कंपनीला भारतीय वित्तीय समुदायाला उच्च गुणवत्ता असलेली स्थानिक वित्तीय संदेश सेवा प्रदान करण्यासाठी बनविण्यात आले होते.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांना क्रोएशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला गेला
दिनांक 27 मार्च 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांनी क्रोएशिया या देशाला भेट दिली. ते क्रोएशिया, बोलिव्हिया आणि चिली या तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यावर आहेत.
या भेटीदरम्यान क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष कोलिंदा ग्रबर-कित्रोव्हिक ह्यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांना क्रोएशियाचा ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द किंग ऑफ टॉमस्लाव्ह’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले.
याशिवाय, संस्कृती, पर्यटन, क्रिडा या क्षेत्रांमध्ये तसेच संस्कृत आणि हिंदी या भाषेसाठी जागा तयार करण्यासाठी भारताने क्रोएशियासोबत चार सामंजस्य करार केले.
क्रोएशिया हा पूर्व युरोपीय देश आहे, ज्याला एड्रियाटिक समुद्राची दीर्घ किनारपट्टी लाभलेली आहे. झगरेब ही देशाची राजधानी आहे आणि क्रोएशियाई कुना हे राष्ट्रीय चलन आहे.
निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह सामग्रीसाठी फेसबुक कंपनी एक प्रतिसादात्मक चमू तयार करणार
फेसबुक ही डिजिटल प्रसारमाध्यम कंपनी लोकसभा निवडणुकीदरम्यान व्यासपीठावर टाकल्या जाणार्या आक्षेपार्ह सामग्रीवर देखरेख करण्यासाठी एक ‘प्रतिसादात्मक चमू’ तयार करणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाची आचारसंहिता सामाजिक माध्यमांवर देखील लागू होईल. त्यावरील राजकीय जाहिरातींसाठी मार्गदर्शके तत्त्वे देखील तयार केली जात आहेत.
भारतीय निवडणूक आयोग (ECI)
ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली. आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.
UNDPचा “जागतिक बहुआयामी दारिद्य निर्देशांक 2018”
वित्त वर्ष 2005-06 ते वित्त वर्ष 2015-16 या काळात भारतात 27.1 कोटी (271 दशलक्ष) लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत, असे 'जागतिक बहु-आयामी दारिद्य निर्देशांक 2018' यामध्ये दिसून आले आहे.
'जागतिक बहुआयामी दारिद्य निर्देशांक 2018' (Global MPI 2018) या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) आणि ऑक्सफोर्ड पॉव्हर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (OPHI) यांनी संयुक्तपणे तयार केला.
ठळक बाबी
भारत
- भारतात दरिद्री लोकांची संख्या घटून अर्धी राहिली आहे, जी 55% वरून घटून 28% झाली आहे.
- भारतात वर्ष 2015-16 मध्ये 364 दशलक्ष लोक अजूनही दरिद्री आहेत, जे कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
- भारतात सर्वाधिक प्रमाणात दारिद्र्य चार राज्यांमध्ये आहे. बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये दरिद्री लोकांची संख्या (जवळपास 19.6 कोटी) जास्त आहे, जेथे अर्ध्याहून अधिक दरिद्री लोक राहतात.
- याबाबतीत झारखंड राज्याने सर्वाधिक सुधारणा केली आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि नागालँड यांचा क्रम लागतो आहे.
जागतिक
- 105 देशांमध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या 77% (5.7 अब्ज) लोक राहतात. त्यातले 1.3 अब्ज लोक (म्हणजेच जागतिक लोकसंख्येच्या एक चतुर्थांश भाग) बहु-आयामी दारिद्यात जगत आहेत. त्यातले 46% लोक अत्याधिक दारिद्यात जगत आहेत.
- जगातले 83% दरिद्री लोक उप-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये राहतात.
- बहु-आयामी दरिद्रींमध्ये अर्धे 0-17 या वयोगटातली मुलं आहेत.
- सन 1900 नंतर भारतासहित दक्षिण आशियाच्या इतर देशांमध्ये लोकांची अपेक्षित आयुमर्यादा 4 वर्षाने वाढली आहे आणि भारतात लोकांची अपेक्षित आयुमर्यादा 11 वर्षाने वाढली आहे.

No comments:
Post a Comment