Current affairs | Evening News Marathi
Current affairs 27 March 2019 Marathi |
27 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
भारतीय नौदलाचा ‘अभेद्य’ कार्यक्रम
लोणावळा येथे भारतीय नौदलाच्या ‘INS शिवाजी’ या जहाजावर उभारलेल्या ‘अणू, जैविक आणि रासायनिक प्रशिक्षण सुविधा’ (NBCTF) याचे उद्घाटन केले गेले.
याप्रसंगी, नौदलाने ‘अभेद्य’ कार्यक्रमाचा आरंभ केला. या कार्यक्रमामधून जहाजावरील कर्मचार्यांना अणू, जैविक व रासायनिक पदार्थांचा शोध व संरक्षण प्रणालीविषयी प्रशिक्षण दिले जाईल.
2019-20 हे ‘INS शिवाजी’ जहाजाचे प्लॅटिनम ज्युब्ली वर्ष आहे. त्यानिमित्ताने "प्रोपेलिंग द इंडियन नेव्ही सीन्स 1945” या विषयाखाली एक बोधचिन्ह (logo) प्रसिद्ध करण्यात आले.
भारतीय नौदल
भारतीय नौदलाच्या स्थापनेची सुरूवात 1934 साली ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलापासून झाली. 1971 सालाच्या भारत-पाकिस्तान युद्धामधील नौदलाच्या कामगिरीला स्मरणात ठेवत दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय नौदल हे जगातले पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची ‘INS अरिहंत’ ही पहिली अणू पाणबुडी सामील करण्यात आली.
UAEचा ‘लूज टू विन’ कार्यक्रम
24 मार्च 2019 रोजी देशातल्या लठ्ठ लोकांना वजन घटविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी संयुक्त अरब अमिरात (UAE) सरकार ‘लूज टू विन’ कार्यक्रम राबववित आहे.
कार्यक्रमाच्या यावर्षीच्या आवृत्तीत पायाभूत विकास मंत्रालयाच्या कर्मचार्यांना वजन घटविण्यास मार्गदर्शन दिले जात आहे. आठ आठवड्यांच्या काळात त्यांना पोषक आहाराचा अवलंब करण्यास आणि शारीरिक व्यायाम करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार.
संयुक्त अरब अमिरात (UAE) हा एक अरबी द्वीपकल्प देश आहे जो प्रामुख्याने पारशी (अरब) आखाती प्रदेश आहे. हा देश 7 अमिरातीचा महासंघ आहे. अबू धाबी ही या देशाची राजधानी आहे आणि ‘यूएई दिरहम’ हे राष्ट्रीय चलन आहे.
एमिसॅट: DRDOचा नवा प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रह
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 1 एप्रिल 2019 रोजी संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) तयार केलेला 'एमिसॅट' (EMISAT) नावाचा प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रह अंतराळात पाठवविणार आहे.
‘एमिसॅट’ उपग्रहाचे वजन 436 किलोग्राम आहे. PSLV-C 45 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने श्रीहरिकोटातल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून उपग्रह पाठवला जाणार आहे.
उपग्रहामुळे भागात मोबाईल फोनसह अन्य किती संकाद उपकरणे सक्रिय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे. इलेक्ट्रॉनिक सॅटेलाइट अत्यंत अत्याधुनिक असणार आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा उपग्रह महत्वपूर्ण ठरणार असून उपग्रहामुळे शत्रूच्या रडारची, प्रदेशातील संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळविणे शक्य होणार आहे.
मकालू पर्वतावर भारताची प्रथम लष्करी पर्वतारोहण मोहिम
26 मार्च 2019 रोजी ‘मकालू’ (8,485 मी.) पर्वतावर भारतीय लष्कराने पहिल्या पर्वतारोहण मोहिमेला सुरुवात झाली.
8 हजार मीटर उंचीवरील सर्व आव्हानात्मक शिखरे सर करण्याचे उद्दिष्ट भारतीय लष्कराने ठेवले असून, त्याची सुरुवात मकालू पर्वतापासून होत आहे.
मकालू हे हिमालयातले एक शिखर आहे. त्याची उंची 8,485 मीटर असून ते जगातले पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे पर्वत नेपाळ-तिब्बत (चीन) याच्या सीमेवर आहे. हे शिखर एव्हरेस्टच्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे. 15 मे 1955 रोजी लिओनेल टेरे व जिन कुझी यांची फ्रेंच मोहीम सर्वप्रथम या शिखरावर दाखल झाली.
नदीच्या पृष्ठभागावर वीज निर्मिती करण्याचा IIT रुडकीचा प्रयोग यशस्वी
नदीच्या पृष्ठभागावर वीज निर्मिती करण्याचा भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रुडकीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
संशोधकांनी वाहत्या पाण्यावर तरंगणारे एक असे उपकरण तयार केले आहे, जे प्रवाहाच्या शक्तीचा वापर करून वीज निर्मिती करते. हा अक्षय ऊर्जेसाठी एक पर्यायी स्रोत ठरत आहे.
या उपकरणासाठी ‘हायड्रो-कायनेटिक’ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. पाण्याचा प्रवाह वाहत्या वार्यापेक्षा शंभर पटीने अधिक ऊर्जा उत्पन्न करू शकते, असे संशोधनात आढळून आले आहे.
पारंपारिक जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर धरणाची बांधणी करावी लागते, ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. या समस्येला एक पर्याय म्हणून नवे तंत्र विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांचे निधन
ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका कृ्ष्णा सोबती यांचे 26 मार्चला निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या.
स्त्रियांचे भावविश्व, वेदना, स्वाभिमान आपल्या साहित्यांतून सशक्तपणे मांडणाऱ्या साहित्यिका म्हणून ओळखल्या जात होत्या.
कृष्णा सोबती यांचा जन्म पाकिस्तानमधील एका गावात झाला. 1950 साली 'कहानी लामा' पासून त्यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली. 'मित्रो मरजानी', 'जिंदगीनामा', 'सूरजमुखी अंधेरे के', 'दिलो दानिश', 'समय सरगम' आदी साहित्यकृतींसाठी ओळखल्या जातात. 'जिंदगीनामा'साठी 1980 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर, 2017 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. देशभरातल्या असहिष्णूतेच्या विरोधात 2015 साली आपला साहित्य अकादमी पुरस्कारदेखील परत केला होता. याशिवाय त्यांना पद्मभूषण, व्यास सम्मान, शलाका सम्मान या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment