Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, March 12, 2019

    Current affairs 12 March 2019 Marathi | 12 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 March 2019 Marathi |   12 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    मोहम्मद शताएह: पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान

    पॅलेस्टाईन अथॉरिटीचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी पॅलेस्टाईनच्या पंतप्रधान पदी मोहम्मद शताएह यांची नियुक्ती केली आहे.
    ही नियुक्ती निवृत्त झालेल्या रामी हमदल्लाह यांच्या जागी झाली आहे.
    पॅलेस्टाईन हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्र व जॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. देशाच्या सीमेवरून या प्रदेशाचा इस्राएलसोबत दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.
    1993 सालाच्या ओस्लो कराराच्या परिणामस्वरूप, पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटीगाझा-जेरिको कराराच्या आधी 1994 सालीच स्थापन करण्यात आलेले अंतरिम स्वयं-सरकारी मंडळ आहे. वेस्ट बॅंकेच्या क्षेत्र-ए आणि क्षेत्र-बी तसेच गाझा पट्टी या प्रदेशांचे प्रशासन सांभाळण्यासाठी 1994 साली गाझा-जेरिको करार (कैरो करार) केला गेला.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 March 2019 Marathi |   12 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    भारत: शस्त्रास्त्रांचा जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार देश

    स्टॉकहोम (स्वीडन) येथील 'स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' (SIPRI) या जागतिक शस्त्रास्त्रे व्यापाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वैचारिक संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, सन "2014-18” या काळात भारत हा शस्त्रास्त्रांचा जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आणि जागतिक पातळीवर त्याचा 9.5% वाटा होता.
    'ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर-2018' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सौदी अरब हा आता सर्वात मोठा आयातदार देश बनला आहे.
    शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणे यांची आयात कमी केल्यानंतर भारत याबाबतीत मागे पडला आहे. भारत दशकापासून पाच प्रमुख आयातदारांपैकी एक आहे.
    ताज्या अहवालानुसार, सन 2011-2015 या कालावधीत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन हे पाच शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे निर्यातदार होते. अमेरिका आणि रशिया यांचा निर्यातीत अनुक्रमे 36% आणि 21% वाटा होता.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 March 2019 Marathi |   12 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    ‘वर्ल्ड वाइड वेब’ला 30 वर्ष पूर्ण झाली

    दिनांक 12 मार्च 2019 रोजी संगणक जगतातल्या सर्वाधिक महत्त्वाच्या ‘वर्ल्ड वाइड वेब’ (WWW) या मंचाला 30 वर्ष पूर्ण झाली.
    WWW चा इतिहास
    ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ टिम बर्नेर्स-ली यांनी ‘वर्ल्ड वाइड वेब’ (WWW) याची रचना केली. 1989 साली WWWची स्थापना झाली. हा आधुनिक मानवजातीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा एक महान विकास आहे.
    1989 साली 33 वर्षांच्या बर्नर्स-ली यांनी ENQUIRE या यंत्रणेचा संदर्भ घेऊन "मेष (Mesh)" नावाच्या प्रणालीसाठी स्वित्झर्लंडमधील CERN (युरोपियन ऑर्गनाइझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च) येथे व्यवस्थापनासाठी ‘इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट: ए प्रोपोजल’ या शीर्षकाखाली एक प्रस्ताव दिला होता.
    सुरुवातीला, CERN येथील एकाधिक संगणकांमध्ये माहिती सामायिक करण्यासाठी बर्नर्स-ली यांनी मेष नावाने टाइप्ड लिंक्ससह एक मोठ्या हायपरटेक्स्ट डेटाबेसची कल्पना मांडली. त्यांनी HTML, HTTP आणि वर्ल्ड वाइड वेब या प्रोग्रामिंग लॅंगवेजवर आधारित एक मॉडेल विकसित केले. पुढे 1991 सालापर्यंत ही यंत्रणा बाह्य वेब सर्व्हरच्या माध्यमातून प्रसारित झाली.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 March 2019 Marathi |   12 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    नैरोबीत संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) कार्यक्रमाची वार्षिक सभा आयोजित

    11 मार्च ते 15 मार्च 2019 या काळात नैरोबी (केनिया) येथे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) कार्यक्रमाची चौथी वार्षिक सभा आयोजित करण्यात आली आहे.
    दिनांक 11 मार्च 2019 रोजी “इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स फॉर एन्विरोंमेंटल चॅलेंजेस अँड सस्टेनेबल कंझ्मप्शन अँड प्रॉडक्शन” या संकल्पनेखाली या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
    नैरोबीमधील संयुक्त राष्ट्रसंघ कार्यालयाचे प्रभारी महासंचालक आणि संयुक्त राष्ट्रसंघ-अधिवास (UN-Habitat) याचे कार्यकारी संचालक असलेल्या मैमुनाह मोहम्मद शरीफ यांच्या अध्यक्षतेत चाललेल्या या कार्यक्रमात 193 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला आहे.
    संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) हा दिनांक 5 जून 1972 रोजी स्थापना करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे, जे जागतिक पर्यावरणविषयक मुद्द्यांच्या संदर्भात धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करते. त्याचे मुख्यालय नैरोबी (केनियाची राजधानी) येथे आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 March 2019 Marathi |   12 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    29 मार्चला प्रथमच सर्व महिला अंतराळवीरांचा ‘स्पेसवॉक’ होणार

    इतिहासात पहिल्यांदाच, दिनांक 29 मार्च 2019 रोजी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेनी आपल्या दोन महिला अंतराळवीरांचा ‘स्पेसवॉक’ (अंतराळात यानाशिवाय भ्रमण करणे) आयोजित करण्याचे ठरविले आहे.
    या मोहिमेदरम्यान अॅनी मॅक्लेन आणि क्रिस्टीना कोच या अंतराळात भ्रमण करणार आहेत. ही मोहीम कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) याच्या फ्लाइट कंट्रोलर क्रिस्टन फॅसिओल यांच्याकडून व्यवस्थापित केली जाणार आहे. या मोहिमेत निक हेग देखील सामील होतील.
    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे आधीपासूनच नियोजित असलेल्या तीन स्पेसवॉकच्या शृंखलेतली ही द्वितीय मोहीम आहे. 29 मार्चला आयोजित करण्यात आलेला हा स्पेसवॉक सात तास चालणार आहे.
    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS)
    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला. ISS वर सध्या अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपान या देशांचे अंतराळवीर कार्यरत आहेत.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 March 2019 Marathi |   12 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    नवी दिल्लीत भारत-आफ्रिका प्रकल्प भागीदारींच्या संदर्भात ‘CCI-EXIM बँक परिषद’ आयोजित

    दिनांक 17 मार्च ते 19 मार्च 2019 या काळात नवी दिल्लीत भारत-आफ्रिका प्रकल्प भागीदारींच्या संदर्भातली चौदावी ‘CCI-EXIM बँक परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. आफ्रिका खंडातल्या 21 देशांमधून प्रतिनिधी परिषदेत सहभाग घेतील.
    भारतीय उद्योग परिषद आणि भारताची EXIM बँक यांच्या सहकार्याने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
    2005 साली स्थापना झाल्यापासून वार्षिक परिषदेमधून भारत आणि आफ्रिका येथील मंत्री, धोरण निर्माते, अधिकारी, व्यवसायिक, बँक, तंत्रज्ञानी, स्टार्टअप उद्योजक आणि इतर भागीदारांना एक सामान्य मंच उपलब्ध होतो. भारत-आफ्रिका आर्थिक आणि व्यवसायिक संबंधांना बळकटी आणण्यासाठी हा कार्यक्रम आखला गेला आहे. 'दक्षिण-दक्षिण सहकार्य' पुढाकाराच्या अंतर्गत भारत-आफ्रिका प्रकल्प भागीदारी हा कार्यक्रम चालवला जात आहे.
    भारत आणि आफ्रिका संबंध
    भारत आणि आफ्रिका यांच्यातला द्वैपक्षीय व्यापार 2017-18 या वर्षाच्या तुलनेत 22.6 टक्क्यांनी वाढून 62.66 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचला आहे. पुढील काही वर्षांत भारत-अफ्रिका द्वैपक्षीय व्यापार 150 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
    आफ्रिका खंड
    आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.
    आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत. आग्नेयेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध प्रदेशांना सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 March 2019 Marathi |   12 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    मार्गदर्शित ‘पिनाका’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

    दिनांक 11 मार्च 2019 रोजी भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) पोखरणच्या चाचणी क्षेत्रात स्वदेशी विकसित केल्या गेलेल्या मार्गदर्शित ‘पिनाका’ (PINAKA) क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली.
    70 किलोमीटर दूरवरचे लक्ष्य भेदू शकणारे पिनाका (PINAKA) क्षेपणास्त्र मार्गदर्शित आहे. पुण्यातले शस्त्रनिर्मिती संशोधन व विकास आस्थापना (ARDE), हैदराबाद येथील DRDOचे रिसर्च सेंटर इमारत (RCI) आणि संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा (DRDL) यांनी संयुक्तपणे याचा विकास केला. पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर (MBRL) मधून सोडण्यात येते. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक मार्गदर्शक आणि नियंत्रण प्रणालीने सुसज्जित आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 12 March 2019 Marathi |   12 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment