Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, February 28, 2019

    Current affairs 28 February2019 Marathi | 28 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 28 February2019 Marathi |     28 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी


    महाराष्ट्र राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 2019-20

    दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने 2019-20 या वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 3,14,489 कोटी रुपये महसुली जमा असलेला व 3,34,273 कोटी रुपये अंदाजित महसुली खर्च असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत चर्चेसाठी मांडला. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने कृषी, रस्ते, ऊर्जा आणि आदिवासी विभागासाठी भरीव अशा तरतुदी केल्या आहेत.
    99,000 कोटी रुपये एवढ्या नियोजित खर्चाच्या या अर्थसंकल्पामध्ये 9208 कोटी रुपयांची तरतूद अनुसूचित जाती म्हणजेच विशेष घटकांसाठी, आदिवासी घटकांसाठी 8431 कोटी रुपये, तर जिल्हा नियोजन आराखड्यासाठी 9000 कोटी रुपयांची तरतूद आहे.
    सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होत असल्याने राज्याच्या तिजोरीत 19,784 कोटी रुपये इतकी अपेक्षित महसुली तूट असल्याचे स्पष्ट केले गेले, जे अनावश्यक खर्चात बचत व महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जाईल. 
    शेतकरी व ग्रामीण कल्याण
    • कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 3498 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला.
    • शेतकऱ्यांना व विशेषतः दुष्काळी भागांमधील शेतकऱ्यांना विजेच्या बिलदरात जी सूट देण्यात येते, त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 5210 कोटी रुपयांची खास तरतूद करण्यात आली आहे.
    • शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्यातला शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध करून देणार.
    • कोरडवाहू शेतीला स्थैर्य, पायाभूत सुविधांचा गतीमान विकास, वाढत्या शहरीकरणानुरूप सुविधा, शेतकरी व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य असणार. 
    • शेती व शेतीपूरक व्यवसायाला प्राथमिकता देण्यासाठी शेततळे, सिंचन विहिरींवर भर दिला जाणार. 
    • अपुऱ्या पावसामुळे बाधित 151 दुष्काळग्रस्त तालुके व 268 महसूल मंडळे व 5449 दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावात मदत पाहोचवणार.
    • क्रांतिकारी ठरलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा 1500 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    • ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत आजवर 1 लक्ष 30 हजार शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यंदा 5 हजार 187 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला.
    • राज्यातील दूध, कांदा, तूर, हरभरा, धान उत्पादकांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार.
    • ग्रामीण विकासात सहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी 500 कोटींच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली.
    ऊर्जा
    • 100 टक्के गावांच्या विदयुतीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाले. ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी यंदा 6306 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    • महाराष्ट्र ऊर्जासंपन्न करणार. वीजनिर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्यासाठी वीजनिर्मिती व वितरण प्रणाली आराखडा तयार केला जाणार.
    • दुष्काळग्रस्त भागात थकीत वीज देयकांच्या अभावी बंद असलेल्या ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी वीज बिलाची 5% रक्कम राज्य सरकार देणार.
    • अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीजनिर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. यंदा 1087 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    • शेतकरी, उदयोजक, यंत्रमागधारकांना दयावयाच्या वीजदर सवलतीसाठी यंदा 5210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    आरोग्य
    • दारिद्रय रेषेखालील नागरिकांच्या आरोग्य उपचारासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 1021 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या योजनेसाठी 2098 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    • महिला व बालविकासाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी 2921 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    • एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत बालक, गरोदर व स्तनदा माता यांना पोषण आहार देण्यासाठी 1097 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    परिवहन (रस्ते, रेल्वे व हवाई)
    • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 2164 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    • राज्यातील रस्त्यांचा लक्षणीय विकास केला जाणार. गेल्या साडे चार वर्षात 12,984 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती केली गेली आहे.
    • राज्यातील रस्ते विकासासाठी यंदा 8500 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला. नाबार्डकडून सहाय्यित रस्ते विकास योजनेसाठी 350 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला.
    • ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत यंदा 2164 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    • सुमारे 67 लक्ष प्रवासी रोज प्रवास करतात त्या राज्य रस्ते परिवहन (ST) विभागाच्या विकासामधून 96 बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.
    • हायब्रीड ॲन्युईटी तत्वावर रस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यंदा 3700 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला.
    • मुंबई मेट्रोची व्याप्ती 276 कि.मी. पर्यंत विस्तारणार. नागपूर व पुणे मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देणार.
    • अहमदनगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड, वडसा-देसाईगंज, इंदौर-मनमाड रेल्वे कामे प्रगती पथावर आहेत. मुंबई उपनगरीय लोकल रेल्वे वाहतूक व्यवस्थेच्या परिवहन प्रकल्प टप्पा-3 साठी मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन मार्फत 55 हजार कोटी रुपये खर्चाची कामे पूर्ण करण्यात आली.
    • अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगांव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विमानतळ विकास मोहिम प्रगतिपथावर आहेत.
    पर्यटन
    • राज्यातील किल्यांचे जतन व संवर्धन उपक्रमासाठी निधीची तरतूद करण्यात आली. रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार. प्रत्येकी 14 किल्यांचा दोन टप्प्यात विकास केला जाणार.
    ग्रामीण प्रशासन
    • बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या अंतर्गत 2 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    वित्त
    • अटल अर्थसहाय्य योजना राबविण्यासाठी रूपये 500 कोटी रूपयांचे अनुदान दिले जाणार.
    • सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची महाराष्ट्रात 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीधारकांनाही याचा लाभ मिळणार.
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन आदी उपक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली.
    शहरी व गृह
    • स्मार्ट सिटी अभियानात पुणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड या 8 शहरांसाठी यंदा 2400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    • प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत राज्यातील 385 शहरांतील नागरिकांकरिता 6895 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    अन्य
    • राज्यावरील एकूण कर्जाची रक्कम 4,14,411 कोटी रुपये एवढी झाली आहे.
    • जलसंपदा विभागासाठी सन 2019-20 मध्ये 8733 कोटी रुपये एवढा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला.
    • पोलीसांसाठी राज्यात 1 लक्ष निवासस्थाने बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यासाठी यंदा 375 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
    • मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून 12 लक्ष कोटी रूपयांचे सामंजस्य करार केले गेलेत.
    स्त्रोत: MT 

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 28 February2019 Marathi |     28 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    2016, 2017, 2018 या वर्षांसाठी शांतीस्वरूप भटनागर परितोषिकांचे वाटप

    2016, 2017, 2018 या वर्षांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ‘शांती स्वरूप भटनागर’ परितोषिकांचे वाटप करण्यात आले आहे.
    2018 सालासाठी पुरस्कार विजेत्यांची नावे –
    विभाग
    विजेते
    जैवशास्त्रथॉमस जे. पुकाडील, गणेश नागाराजू
    रसायन शास्त्रराहुल बनर्जी, स्वाधीन कुमार मंडल
    पृथ्वी, वातावरण-विषयक महासागर आणि ग्रहशास्त्रपार्थसारथी चक्रवर्ती, मदिनेनी वेंकट रत्नम
    अभियांत्रिकी शास्त्रअमित अग्रवाल, अश्विन गमस्ते
    गणित शास्त्रअमित कुमार, नितीन सक्सेना
    वैद्यकीय शास्त्रगणेश वेंकट सुब्रमण्यम
    शरीर-शास्त्रअदिती डे, अंबरिश घोष
    पुरस्काराविषयी
    वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक डॉ. शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या भारतीय व्यक्तींना दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. 1958 साली पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला.
    वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिला जाणारा हा पुरस्कार जैवशास्त्र, रसायन शास्त्र, पृथ्वी, वातावरण-विषयक महासागर आणि ग्रहशास्त्र, अभियांत्रिकी शास्त्र, गणित शास्त्र, वैद्यकीय शास्त्र, शरीर-शास्त्र या विभागांमध्ये दिला जातो.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 28 February2019 Marathi |     28 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी


    इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी (ISL) याच्या द्वितीय आवृत्तीचे अनावरण

    इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी (ISL) या सांकेतिक भाषा शब्दकोशाच्या द्वितीय आवृत्तीचे अनावरण करण्यात आले आहे.
    2011 सालाच्या जनगणनेनुसार, भारतात 50.71 लक्ष कर्णबधिर व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी दिव्यांग सबलीकरण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने (Indian Sign Language Research and Training Centre -ISLRTC) हा शब्दकोश तयार केला आहे. पहिल्या आवृत्तीत या शब्दकोशात 3000 शब्द होते.
    शब्दकोशाच्या द्वितीय आवृत्तीमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेत शैक्षणिक, विधी, वैद्यकीय, तंत्रविषयक आणि दैनंदिन वापरातल्या अशा एकूण 6000 शब्दांचा समावेश आहे. ISL शिक्षक, कर्णबधीरांसाठीचे शिक्षक, कर्णबधीर मुलांचे पालक यांना हा शब्दकोश उपयुक्त ठरणार आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 28 February2019 Marathi |     28 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार-2019

    नवी दिल्लीत 2019 सालाच्या राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कारांचे वाटप केले गेले. यंदा माहिती तंत्रज्ञानासंबंधी 14 प्रकल्पांना हा पुरस्कार दिला गेला आहे.
    पुरस्कार विजेत्यांची नावे -
    • महाराष्ट्र बांधकाम उद्योग नियामक प्राधिकरणाचे 'महारेरा' (MahaRERA)
    • भारतीय रेल्वेचे ‘IRCTC रेल कनेक्ट’ मोबाइल अॅप
    • छत्तीसगड राज्य सरकारचे ‘खंजी ऑनलाइन' पोर्टल
    • हरियाणाचे भिवानी जिल्हा प्रशासन (अल्ट्रा-रिझोल्यूशन अन-मॅन्ड एरियल व्हेइकल (UAE) / ड्रोन आधारित जिओ ICT-एनेबल्ड मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणाली)
    • उत्तरप्रदेशाच्या लखनऊच्या महसूल मंडळाचा ‘डिजिटल लँड’ प्रकल्प
    • इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाचे ‘उमंग’ पोर्टल
    • NICचे ‘राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल 2.0’
    • मसुरी देहरादून विकास प्राधिकरणाची (देहरादून) ऑनलाइन मॅप प्रणाली
    • उत्तराखंड टेहरी गढवाल जिल्हा कार्यालयाचे ‘हॅलो डॉक्टर 555’ पोर्टल
    • तामिळनाडूसाठीचे पवन ऊर्जा अंदाज सेवा
    • नवकल्पना विभागामध्ये गुजरातची गिरिबाला क्रिएटिव्ह व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
    • उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी राजस्थान सरकारचा 'आयस्टार्ट राजस्थान' प्रकल्प
    पुरस्काराविषयी
    ई-प्रशासन संदर्भात पुढाकारांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार सहा विभागांमध्ये दिला जातो. हा शाश्वत ई-प्रशासन संदर्भात पुढाकारांची संरचना आणि अंमलबजावणी करण्याच्या प्रभावी पद्धतींना प्रोत्साहन देणारा पुढाकार आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 28 February2019 Marathi |     28 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी


    “श्रेयस”: पदवीधरांना उद्योगांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाची योजना

    केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून “स्किम फॉर हायर एज्युकेशन युथ इन अप्रेंटीसशीप अँड स्किल (SHREYAS / श्रेयस)” नावाची नवी योजना चालू करण्यात आली आहेत, ज्यामार्फत नव्या पदवीधारकांना संबंधित उद्योगांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
    मनुष्यबळ मंत्रालय, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि कामगार व रोजगार मंत्रालय या तीन केंद्रीय मंत्रालयांच्या पुढाकारामधून चालवला जाणारा हा कार्यक्रम आहे. पदवीधर विद्यार्थ्यांना अधिक कुशल, सक्षम बनविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
    श्रेयस पोर्टलवर शैक्षणिक संस्था आणि उद्योग लॉग-इन करू शकतात आणि त्यांच्या संबंधित मागण्या आणि प्रशिक्षणाची पूर्तता करेल.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 28 February2019 Marathi |     28 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    4G/LTE, 5G NR मोडेमसाठी नवी देशी इलेक्ट्रॉनिक चीप तयार करण्यात आली

    बेंगळुरूच्या सिग्नलचीप या फॅब-लेस सेमीकंडक्टर कंपनीकडून 4G / LTE आणि 5G NR मोडेमसाठी भारतात प्रथमच संरचित केलेल्या सेमीकंडक्टर चीपचे अनावरण करण्यात आले आहे.
    'अगुम्बे' हे गुप्तनाव देण्यात आलेल्या चीपच्या SCBM34XX आणि SCRF34XX/45XX शृंखलेच्या चार चीप प्रसिद्ध करण्यात आल्या, त्या आहेत - SCBM3412, SCBM3404, SCRF3402, SCRF4502. ही चीप कंबाइंड मल्टी-स्टँडर्ड सिस्टम-ऑन-चिप (SoC) पद्धतीची आहे.
    'अगुम्बे' शृंखला SCRF1401 चीपच्या आधारावर तयार करण्यात आली. SCRF1401 ही 3G/4G आणि वाय-फाय संबंधी उच्च कार्यक्षमता संदर्भात वायरलेस मानकांसाठी भारतात तयार केलेली पहिली RF ट्रान्सरिसीव्हर चीप आहे, जी सिग्नलचिप कंपनीने तयार केली.
    या इलेक्ट्रॉनिक चीपने भारताला मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या मूलभूत तंत्रज्ञानाचा मालक असलेल्या एका विशिष्ट देशांच्या गटात सामील होण्यास मदत केली आहे. या इलेक्ट्रॉनिक चीप संरक्षण क्षेत्रासारख्या विविध महत्त्वाच्या क्षेत्रात उपयोगात येणार्‍या उपकरणांमध्ये वापरल्या जाऊ शकतात.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 28 February2019 Marathi |     28 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    2019 सालाच्या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव’ पारितोषिकांचे वाटप

    नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019’ या वार्षिक कार्यक्रमाच्या समारोपी समारंभात शेवटी ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव पारितोषिक 2019’ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
    श्वेता उमरे, महाराष्ट्र (प्रथम); अंजनाक्षी महेंद्रसिंग, कर्नाटक (द्वितीय); आणि ममता कुमारी, बिहार (तृतीय) यांना हे पुरस्कार मिळालेत.
    राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019
    नवी दिल्लीत ‘नव भारताचा आवाज बना, तोडगा शोधा आणि धोरणामध्ये योगदान द्या’ (“Be The Voice of New India” and “Find solutions and contribute to policy”) या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    केंद्रीय युवा व क्रिडा मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि नेहरु युवा केंद्र संघटना (NYKS) यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले होते.
    विजेत्यांना पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय युवा संसद महोत्सव पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली. याप्रसंगी भारतीय क्रिडा प्राधिकरणाने विकसित केलेले ‘खेलो इंडिया’ या मोबाइल ॲपचेही उद्‌घाटन केले गेले.
    राष्ट्रीय सेवा योजना (NSS) 
    हा केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाकडून चालवला जाणारा एक उपक्रम आहे. या योजनेचा शुभारंभ 1969 साली केला गेला आणि याचे मुख्‍य उद्देश्‍य म्हणजे स्‍वयंसेवी सामुदायिक सेवेच्या माध्यमातून तरुण विद्या‍र्थ्यांचे व्‍यक्तित्‍व व चारित्र्याचा विकास करणे. NSS ला वरिष्ठ माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंमलात आणले जाते. त्यानुसार प्रत्‍येक शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यक्रम अधिकारीच्या (PO/शिक्षक) नेतृत्वात सामान्‍यत: 100 विद्यार्थ्यांसह एक स्‍वयंसेवी गट असतो.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 28 February2019 Marathi |     28 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment