Views
राष्ट्रीय
- नव्या निर्णयानुसार, ‘शस्त्रास्त्रे अधिनियम-1959’ अंतर्गत या क्षेत्रातल्या वस्तूंचे उत्पादन घेण्याकरिता कोणताही परवाना घेण्याची आवश्यकता नसणार - संरक्षण, उड्डाणशास्त्र (aerospace) आणि युद्धनौका.
- या राज्याने मोकाट गायीढोरांकरिता 'गौवांश आश्रय स्थळ' उभारण्याची योजना तयार केली - उत्तरप्रदेश.
आंतरराष्ट्रीय
- भारताने या देशाच्या राष्ट्रीय तेल कंपनीला भारतीय रुपयातून रक्कम देय केली आणि त्यावरील ‘विथहोल्डिंग कर’ माफ केला - इराण.
- या दोन देशांनी 1 जानेवारीरोजी अधिकृतपणे UNESCOचे सभासदत्व सोडले - अमेरिका आणि इस्राएल.
- हा आखाती देश 1 जानेवारीरोजी ‘पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना’ (OPEC) मधून बाहेर पडला - कतार.
क्रिडा
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) या देशाला क्रिकेटमधील जगातला सर्वात भ्रष्टाचारी देश असे घोषित केले - श्रीलंका.
व्यक्ती विशेष
- तेलंगणा उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश – न्या. टी.बी.एन. राधाकृष्णन.
- आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे नवे कार्यवाह मुख्य न्यायाधीश - न्या. प्रवीण कुमार.
- ब्राझीलचे नवे राष्ट्रपती - जॅर बोल्सनारो.
- भारतीय स्पर्धा आयोगाचे (CCI) नवे सचिव - प्रमोद कुमार सिंग.
- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘2018 सालच्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराचे विजेते - बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर).
सामान्य ज्ञान
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही या साली केंद्र सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे – सन 1952.
- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे स्थापना वर्ष – सन 1934 (1 एप्रिल 1935 पासून कार्यरत).
- भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय - मुंबई.
- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (1943-1949).
- केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले औद्योगिक धोरण व जाहिरात विभाग (DIPP) याचे स्थापना वर्ष - सन 1995.
- संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याचे मुख्यालय – पॅरिस (फ्रांस).
- संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याचे स्थापना वर्ष – सन 1945.
- पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना (OPEC) याचे स्थापना वर्ष – सन 1960.
- पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना (OPEC) याचे मुख्यालय – व्हिएन्ना (ऑस्ट्रीया).
No comments:
Post a Comment