Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, December 13, 2018

    Evening News : 13 December 2018 Marathi-Current Affairs | इवनिंग न्यूज़ 13 डिसेंबर 2018 मराठी_करंट अफेयर्स

    Views

    'आपत्ती' या शब्दाच्या वर्णाकृतीला जपानने 2018 सालचे चिन्ह म्हणून निवडले


    चीनी भाषेत लिहिल्या जाणार्‍या 'आपत्ती' (disaster) या शब्दाच्या वर्णाकृतीची निवड जपानने 2018 सालचे ‘परिभाषित चिन्ह’ (defining symbol) म्हणून केले आहे.


    क्योटो शहरात प्राचीन कायोमिझू मंदिराच्या परिसरात जपान सरकारतर्फे आयोजित एका कार्यक्रमात सीहान मोरी यांनी कॅलिग्राफी ब्रशने एका मोठ्या पांढर्‍या पडद्यावर हा शब्द काढला. हा कार्यक्रम जपान कांजी अॅप्टीट्यूड टेस्टिंग फाउंडेशनने आयोजित केला होता.


    यावर्षी जपानला भयानक पूर परिस्थिती, भूकंप, उष्णलहरी आणि वादळ अश्या नैसर्गिक धोक्यांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे यावर्षी 1,93,214 लोकांपैकी एकूण 20,858 लोकांनी "आपत्ती" हा शब्द निवडला आहे.


    जपानी दरवर्षी गेल्या 12 महिन्यांत घडलेल्या घटनांना प्रदर्शित करणार्‍या चिनी वर्णाकृतीमधील एका शब्दाची निवड करतात. इतर प्रकारांच्या वर्णाक्षरासह चीनी वर्ण (किंवा कांजी) जपानी भाषेत मोठ्या प्रमाणात वापरले जातात.



    13-14 डिसेंबरला ‘जेमिनिड’ उल्कावर्षावाचे दर्शन

    दि. 13 आणि 14 डिसेंबर 2018 रोजी मध्यरात्री आकाशात उल्कावर्षाव दिसणार आहे. याला ‘जेमिनिड’ उल्कावर्षाव (Geminid meteors) म्हटले जाते. उल्कावर्षाव ‘फाएथोन (Phaethon) मधील मोठ्या उल्कामुळे होतो.

    किमान दहा ते बारा उल्का दरवर्षी पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात. पृथ्वीवर आजपर्यंत सुमारे 150 उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत. पृथ्वीच्या सभोवती अजूनही काही उल्का प्रदक्षिणा घालत आहेत. त्यातील काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात.

    उल्कावर्षावाविषयी -

    अवकाशात फिरणाऱ्या छोट्या-छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी संबोधले जाते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात.

    पृथ्वीची कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित आहेत. त्यामुळे ज्या नक्षत्रातून उल्कावर्षाव झाल्यासारखे वाटते त्या नक्षत्राला त्या उल्कावर्षावाचे उगमस्थान असे म्हणतात. हे पुढीलप्रमाणे आहेत -

    • ययाती (Pereus) नक्षत्रातून होणाऱ्या उल्कावर्षावाला पर्सीड्‌जम्हणतात. (दरवर्षी 1-20 ऑगस्ट दरम्यान)
    • सिंह राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला लिओनिड्‌ज म्हणतात. (दरवर्षी 11-20 नोव्हेंबर)
    • स्वरमंडळ (Lyra) तारकापुंजातून होणाऱ्या उल्कावर्षावाला लिरिड्ज म्हणतात. (दरवर्षी 16-26 एप्रिल)
    • देवयानी (Andromeda) यातून होणाऱ्या उल्कावर्षावाला ॲन्ड्रोमीडस म्हणतात. (दरवर्षी 24-27 नोव्हेंबर)
    • मिथुन (Gemini) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला जेमिनिड्ज म्हणतात. (दरवर्षी 9-14 डिसेंबर)
    • मेष (Aries) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला एरिड्‌जम्हणतात. (दरवर्षी 30 मे ते 14 जून)
    • डेल्टा ॲक्वेरी या ताऱ्याच्या जवळून होणाऱ्या उल्कावर्षावाला डेल्टा ॲक्वेरिड्‌ज म्हणतात.


    भारतीय नौदलात अपघातात सापडलेल्या पाणबुडीसाठी बचाव प्रणाली समाविष्ट

    खोल समुद्रात दुर्घटनेदरम्यान पाणबुड्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणारी मदत आणि बचाव प्रणाली दि. 11 डिसेंबर 2018 रोजी मुंबईत नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते नौदल गोदीत समाविष्ट करण्यात आली.

    नौदलात प्रथमच दोन खोल सागरी बचाव वाहने (Deep Submergence Rescue Vehicles -DSRVs) समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रणालीमुळे खोल समुद्रात पाणबुडी बचाव कार्यात नौदलाची क्षमता वाढली आहे. भारतीय नौदलाच्या या नवीन क्षमतेचे संचालन आणि तैनात करण्याचे काम नौदलाच्या पाणबुडी बचाव गटाच्या चालक दलाकडून मुंबईतून केले जाणार आहे.

    या सुविधेमुळे भारत अपघातात सापडलेल्या पाणबुडीतून लोकांचे जीव वाचविण्यासाठी शोध आणि बचाव कार्य चालविण्यास सक्षमता असणार्‍या नौदलांच्या श्रेणीत सामील झाले आहे. सध्या भारतीय नौदलाकडे सिंधुघोष, शिशुमार, कलवारी श्रेणीच्या पारंपरिक पाणबुड्या तसेच अणुशक्तीवर चालणार्‍या पाणबुड्या आहेत.

    हे वाहन जेम्स फिशर अँड सन्स कंपनीच्या स्कॉटलंड येथील JFD उप-कंपनीकडून विकसित करण्यात आले आहे. हे वाहन पाण्याखाली 650 मीटर खोलीपर्यंत पाणबुडीतून बचाव करण्यास सक्षम आहे आणि एकाच वेळी 14 लोकांना वाचवू शकते.


    के. चंद्रशेखर राव: तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री

    तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी दि. 12 डिसेंबरला राज्य मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहा यांनी ही शपथ दिली.

    विधानसभा निवडणुकीचा निकाल -

    तेलंगणा (एकूण 119 जागा)

    तेलंगणा राष्ट्र समिती (TRS)

    88

    काँग्रेस

    21

    भाजप

    1

    अन्य

    9


    झोरमथंगा: मिझोरमचे नवे मुख्यमंत्री

    मिझोरमचे राज्यपाल कुमानम राजशेखरन यांनी औपचारिकपणे मिझो नॅशनल फ्रंट (MNF) पक्षाचे अध्यक्ष झोरमथंगा यांना राज्य सरकार बनवण्यास आमंत्रित केले आहे. ते दि. 15 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

    विधानसभा निवडणुकीचा निकाल -

    राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल दि. 11 डिसेंबर 2018 रोजी जाहीर झालेत.

    मिझोरम (एकूण 40 जागा)

    भाजप

    1

    काँग्रेस

    5

    मिझो नॅशनल फ्रंट (MNF)

    26

    अन्य

    8

    भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो. ही निवडणुक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते. विधानसभा निवडणुका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.



    कुंभ मेळाव्यासाठी रेल्वे विभागातर्फे 700 कोटी रुपयांची 41 प्रकल्पे कार्यरत

    आगामी कुंभ मेळाव्याच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे विभागातर्फे विकसित करण्यात आलेली 41 प्रकल्पे दि. 12 डिसेंबर 2018 रोजी कार्यरत करण्यात आली आहेत. या प्रकल्पांना एकूण 700 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे.

    कुंभ मेळावा 2019 साली जानेवारी महिन्यात उत्तरप्रदेश राज्याच्या अलाहाबाद शहरामध्ये भरणार आहे. यात्रेकरूंसाठी सार्वजनिक निवासस्थान, स्टॉल, वॉटर बूथ, तिकीटघर, दूरदर्शन संच, CCTV व शौचालये अश्याप्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. मेळाव्यादरम्यान सुमारे 800 विशेष रेलगाड्या धावणार आहेत.

    कुंभ मेळावा विषयी -

    जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारताच्या ‘कुंभ मेळावा’ उत्सवाला संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’ असल्याचे जाहीर करत गेल्यावर्षीच यादीत समाविष्ट केले आहे.

    भारतात नाशिकसह अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभ मेळावा भरतो. कुंभ मेळावा हा धार्मिक यात्रेकरूंचा जगातील सर्वांत मोठा आणि शांततेत पार पडणारा मेळावा आहे. आता कुंभ मेळाव्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. UNESCO कुंभ मेळाव्याची दखल घेणार असून आता त्यासाठी आवश्यक उपाययोजना व संवर्धन संघटनेतर्फे केले जाणार आहे.



    CBICच्या विनिमय दरांसाठी चलनांच्या यादीत कोरियन वॉन, तुर्की लिरा यांचा समावेश

    दि. 12 डिसेंबर 2018 रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) याने आयात आणि निर्यात संदर्भात मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने विनिमय दरांसाठीच्या चलनांच्या यादीत कोरियन वॉन (WON) आणि तुर्की लिरा (TKY) या दक्षिण कोरिया आणि टर्की देशाच्या चलनांचा समावेश केला आहे.

    ‘सीमाशुल्क अधिनियम-1962’ च्या कलम 14 अन्वये वस्तूंचे मूल्यमापन करण्यासाठी परकीय चलनाला भारतीय रुपयामध्ये रूपांतरित करण्याकरिता (किंवा याउलट) करण्यासाठी विनिमय दर अधिसूचित केले जातात. या नव्या निर्णयासह आता या यादीत एकूण 22 चलनांचा समावेश आहे. अश्या सरावामुळे व्यवहारामधील किंमतीत घट येते आणि व्यवसाय करणे सुलभ होते.

    वित्त वर्ष 2017-18 मध्ये भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील द्वैपक्षीय व्यापार वाढून USD 16.36 अब्ज एवढा झाला. तर टर्कीसोबतचा द्वैपक्षीय व्यापार USD 7.2 अब्ज एवढा राहिला.

    CBIC विषयी -

    1855 साली भारतातले ब्रिटिश गव्हर्नर जनरल यांनी भारतामध्ये सीमाशुल्क कायदा व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आयात शुल्क / भूमी महसूल जमा करण्यासाठी ‘कस्टम्स अँड सेंट्रल एक्साईज / CGST डिपार्टमेंट’ स्थापन केली. त्यानंतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) याची स्थापना 26 जानेवारी 1944 रोजी अबकारी कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBEC) या नावाने करण्यात आली. ही संस्था भारतात सीमा शुल्क, GST, केंद्रीय उत्पादन कर, सेवा कर आणि अंमली पदार्थाचे प्रशासन करण्यासाठी जबाबदार असलेली केंद्रीय राष्ट्रीय संस्था आहे.


    No comments:

    Post a Comment