- चाबहार बंदराचा पहिला टप्पा 2 डिसेंबर 2017 पासून उघडण्यात आला आहे. यामुळे भारताला अफगाणिस्तान मार्गे इराणशी जुडण्यास सुलभता झाली आहे.
- चाबहार बंदराच्या प्रथम टप्प्याला दिले गेलेले नाव इराणी संविधानाचे प्रमुख निर्माता शाहिद बहिश्ती यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या बंदरामुळे इराण आणि भारत यांच्यात परस्पर संबंध आणि क्षेत्रीय सहकार्य वाढविण्यास मदत होणार.
- चाबहार बंदर इराणमध्ये पर्शियन आखाती प्रदेशाच्या बाहेर स्थित आहे आणि प्रदेश मध्ये सागरी व्यापार विस्तार करण्यामध्ये मदत करेल. भारताच्या जलवाहतुक मंत्रालयाने चाबहार बंदर विकास प्रकल्प आणि अनुषंगिक कामे यांच्या अंमलबजावणीसाठी इराणमध्ये एक कंपनी तयार केली आहे.
स्त्रोत: डीडी न्यूज
दीया मिर्झा - UNEP ची सद्भावना दूत
- भारतीय अभिनेत्री दीया मिर्झा हिला भारतासाठी संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ची सद्भावना दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- दीया या नव्या भूमिकेत पर्यावरणसंबंधी मुद्द्यांवर जागृती निर्माण करणार. याशिवाय दीया मिर्झा वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) ची सुद्धा ब्रॅंड अँबेसडर आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) हा 5 जून 1972 रोजी स्थापन करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे, जे पर्यावरणविषयक धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करते. याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.
स्त्रोत: NDTV
स्वस्त वैद्यकीय उपकरणे विकसित करण्यासाठी जैव-संरचना कार्यक्रमाची अंमलबजावणी
- जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT) देशातील वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण व स्वस्त वैद्यकीय उपकरणे विकसित करण्याच्या उद्देशाने आपला ‘जैव-संरचना कार्यक्रम (बायो-डिजाइन)’ अंमलात आणला आहे.
- आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने AIIMS आणि IIT दिल्ली येथे जैवतंत्रज्ञान विभागाने देशामधील नवसंशोधकांना वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम तयार केला आहे.
- जैवतंत्रज्ञान विभागाने त्यांच्या बौद्धिक संपदेचे व्यवस्थापन आणि इतर तांत्रिक-कायदेशीर कार्यांच्या व्यवस्थापनासाठी बायोटेक कंसोर्टियमला इंडियन लिमिटेड कंपनीला अधिकृत केले आहे. कार्यक्रमांतर्गत, नवी दिल्लीत 2 डिसेंबर 2017 रोजी 11 वे वार्षिक मेडटेक समिट आयोजित करण्यात आले होते.
स्त्रोत: बिजनेस स्टँडर्ड
देशात मत्स व मत्स्यालयासंबंधी बाजारपेठांच्या नियमनासाठी नियम लागू
- भारत सरकारने मे 2017 मध्ये सादर केलेल्या मत्स व मत्स्यालयासंबंधी बाजारपेठांचे नियमन करणार्या विनियमाला रद्द केले आहे.
- या नियमांतर्गत, मत्स्यपालनाचा मालक आणि त्याची संस्था अश्या दोन्हीला स्वत:ची नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र आता प्राणी क्रूरता प्रतिबंध (मत्स्यालय व फिश टॅंक जीव दुकान) विनियम 2017 मागे घेतले आहे.
स्त्रोत: आऊटलुक
UN ला 2018 सालासाठी मानवतावादी मदतीसाठी $22.5 अब्जची गरज
- संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष 2018 मध्ये संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेल्या 91 दशलक्ष लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी $22.5 अब्ज एवढी रक्कम संकलित करण्याचे आव्हान केले आहे.
- या निधीमधून जगातील प्रभावित झालेल्या लोकांना अन्नधान्य, निवारा, आरोग्य सेवा, आणीबाणीच्या परिस्थितीत शिक्षण, संरक्षण आणि इतर आवश्यक सवलती दिल्या जाणार.
स्त्रोत: ANS
आंध्रप्रदेश विधानसभेत ‘कापू’ जातीला 5% आरक्षण देणारे विधेयक पारित
- आंध्रप्रदेश विधानसभाने राज्य शासनाच्या अखत्यारीत नोकरीमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये ‘कापू’ जातीला 5% आरक्षण प्रदान करणारा विधेयक मंजूर केला आहे.
- शासनाने एक अलग श्रेणी ‘फ’ बनवून वंचित वर्गांमध्ये जातीला समाविष्ट केले आहे. मात्र केंद्र शासनाने आरक्षणाची 50% मर्यादा या आरक्षणाने पार केली आहे.
स्त्रोत: इंडियन एक्सप्रेस
तेलंगणा शासन दिव्यांगांसाठी जगातले पहिले माहिती तंत्रज्ञान परिसर स्थापन करणार
- तेलंगणा शासनाने दिव्यांगांसाठी समर्पित असे जगातले पहिले माहिती तंत्रज्ञान परिसर उघडण्याची घोषणा केली आहे.
- त्यासाठी राज्य शासनाचा विंध्या ई-इन्फोमिडिया प्रायव्हेट लिमिटेड बरोबर एक करार झाला आहे. या परिसरात तंत्रज्ञान क्षेत्रात दिव्यांगांसाठी रोजगार संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल.
- प्रशिक्षण, निवासी सुविधा आणि वितरण केंद्रे अशा सर्व सोयीसुविधा असलेला आयटी पार्क हैद्राबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 10 एकराच्या क्षेत्रात उभारण्यात येणार आहे.
स्त्रोत: UNI
सलील एस. पारेख - इन्फोसिसचे नवे CEO आणि MD
- इन्फोसिस या देशातल्या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीने सलील एस. पारेख यांची व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्याधिकारी (CEO) या पदांवर नियुक्ती केली आहे. पारेख 2 जानेवारी 2017 पासून पुढील पाच वर्षांसाठी आपला पदभार स्वीकारणार आहेत.
- पारेख सध्या 'कॅपजेमिनी' या फ्रेंच कंपनीत ग्रुप कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांचे कॉर्नल विद्यापीठ आणि IIT मुंबईतून शिक्षण झाले आहे.
- याशिवाय, नंदन नीलेकणी हे इन्फोसिसचे गैर-कार्यकारी अध्यक्ष पदावर कायम आहेत. तर, यापूर्वीचे CEO प्रवीण राव यांची मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (COO) पदावर नियुक्ती केली जाणार आहे.
स्त्रोत: NDTV
अनुक आरुदपरागसाम यांना दक्षिण आशियाई साहित्यिकांचा DSC पुरस्कार 2017
- अनुक आरुदपरागसाम लिखित ‘द स्टोरी ऑफ ब्रीफ मॅरेज’ या कादंबरीला प्रतिष्ठित DSC पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- बांग्लादेशचे अनुक आरुदपरागसाम यांना त्यांच्या या कादंबरीसाठी दक्षिण आशियाई साहित्यिकांचा DSC पुरस्कार 2017 प्रदान करण्यात आला आहे आणि यासोबतच ते $25,000 रोख बक्षीसाचे मानकरी ठरलेत.
- दक्षिण आशियाई साहित्यिकांचा DSC पुरस्कार हा प्रत्येक वर्षी दक्षिण आशिया प्रदेशातील कल्पनारम्य लेखनात सर्वोत्कृष्ट योगदानाला पुरस्कृत करणारा एक आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार आहे. 2010 साली सुरीना नरुला आणि मन्नाद नरुला यांनी या पुरस्काराची स्थापना केली होती.
स्त्रोत: DSC प्राइज
शिव केशवन याने एशियन ल्यूज चॅम्पियनशिप जिंकली
- भारताचा जेष्ठ शीतकालीन ऑलंपिक खेळाडू शिवा केशवन याने जर्मनीच्या एल्टेनबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या ‘एशियन ल्यूज चॅम्पियनशिप 2017’ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
- एशियन ल्यूज स्पर्धा 1998 सालापासून आयोजित केली जाणारी आशियाई देशांसाठी वार्षिक ल्यूज स्पर्धा आहे. दरवर्षी ही स्पर्धा नागानो, जपान येथे खेळली जाते, मात्र या वर्षी प्रथमच काही तांत्रिक कारणांनी जर्मनीमध्ये आयोजित केली गेली. ल्यूज हा बर्फापासून बनलेल्या ट्रॅकवर एका विशिष्ट पद्धतीने स्किंईग करण्याचा एक क्रीडाप्रकार आहे.
स्त्रोत: न्यूज 18
No comments:
Post a Comment