जागतिक दिवस
बाल दिवस-भारत
ठळक घटना, घडामोडी
१९१८ : चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताक झाले.
१९२२ : बी.बी.सी.चे रेडियो प्रसारण सुरू झाले.
१९४० : दुसरे महायुद्ध - इंग्लंडच्या कोव्हेंट्री शहरावर लुफ्तवाफेने तुफान बॉम्बफेक करून शहर जवळजवळ नष्ट केले.
१९४१ : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या पाणबुडीने युनायटेड किंग्डमची एच.एम.एस. आर्क रॉयल ही विमावाहू नौका बुडवली.
१९६९ : अपोलो १२चे प्रक्षेपण.
१९७० : सदर्न एरवेझ फ्लाइट ९३२ हे विमान हंटिंग्टन, वेस्ट व्हर्जिनिया शहराजवळ कोसळले. मार्शल युनिव्हर्सिटीच्या फुटबॉल संघासह ७५ ठार.
१९७१ : मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले.
१९७५ : रॉयल ओक, मिशिगन शहरात कामावरून काढून टाकलेल्या पोस्टमनने चार व्यक्तींना ठार केले व पाच इतरांना जखमी करून आत्महत्या केली.
२००१ : उत्तरेतील सैन्याने काबूल जिंकले.
२००२ : आर्जेन्टिनाने जागतिक बँकेचे ८०.५ कोटी अमेरिकन डॉलरचे देणे परत करण्यास असमर्थता दर्शवली.
२०१३ : सचिन तेंडुलकर याची क्रिकेट निवृत्ती.
जयंती/जन्मदिवस
१६५० : विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.
१८४० : क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
१८४३ : ऍलन हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८८९ : जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान
१८९१ : बिरबल साहनी, पुरावनस्पती शास्त्रज्ञ.
१९०४ : हॅरोल्ड लारवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९०८ : जोसेफ मॅककार्थी, अमेरिकन साम्यवाद-द्वेष्टा.
१९२२ : बुट्रोस बुट्रोस-घाली, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
१९२४ : रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.
१९३० : ऍलन मॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९३५ : हुसेन, जॉर्डनचा राजा.
१९४२ : इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.
१९४२ : जॅकी दु प्रीझ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९४७ : सिंधुताई सपकाळ, सामाजिक कार्यकर्त्या.
१९४८ : चार्ल्स, वेल्सचा राजकुमार.
१९५३ : दॉमिनक दि व्हियेपाँ, फ्रांसचा पंतप्रधान.
१९५४ : यानी, ग्रीक संगीतकार.
१९७१ : ऍडम गिलक्रिस्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९७४ : ह्रषिकेश कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७६ : हेमांग बदाणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७७ : ब्रिजल पटेल, केन्याचा क्रिकेट खेळाडू.
No comments:
Post a Comment