Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, October 20, 2017

    चालु घडामोडी 19 ऑक्टोबर 2017 (text)

    Views

    🔹सरकार पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर बंदी घालणार

    कापूस आणि सोयाबीन यावर फवारणीसाठी वापरणाऱ्या पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 60 दिवसांसाठी बंदी आणण्याचे कृषी विभागाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी विभागाने सूचना व हरकती दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

    प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% इसी, फीप्रोनील 40% + इमिडाक्‍लोप्रीड 40% इसी, सीफेट 75% एसी, डायफेन्थ्रेऑन 50% डब्ल्यूपी, मोनोक्रोटोफोस 36% एसएल या 5 कीटकनाशकांच्या वापरामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

    यासंदर्भात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक, तसेच अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या कुलगुरुंकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

    ही कीटकनाशके मनुष्यजिवितास हानीकारक असल्याने कीटकनाशक अधिनियम 1968 च्या कलम 27 मधील अधिकारांचा वापर करुन यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यांमध्ये या 5 किटकनाशकांच्या विक्री, वितरण व वापरावर, विषबाधा प्रकरणाचा तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत, 60 दिवसांसाठी बंदी घालण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.


    🔹जॉर्ज साँडर्स यांना ‘बुकर पुरस्कार’


    अमेरिकी लेखक जॉर्ज साँडर्स (५८) यांना आपल्या ‘लिंकन इन द बार्को’ कादंबरीसाठी प्रख्यात ‘मॅन बुकर पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार मिळविणारे ते दुसरे अमेरिकी लेखक आहेत. पुरस्कार प्रदान सोहळा लंडनमध्ये पार पडला.

    या पुस्तकामध्ये अब्राहम लिंकन यांच्या अकरा वर्षीय मुलाच्या मृत्यूची कहाणी आहे. ‘हे सर्जनशील लेखन असून, ही कादंबरी विनोदी, बुद्धीवादी आणि हेलावून टाकणारीही आहे’, असे मत परीक्षकांच्या समितीमधील लोला यंग यांनी व्यक्त केले. साँडर्स म्हणाले, ‘हा पुरस्कार म्हणजे बहुमान आहे. आयुष्यभर आपल्या कामातून त्याचा सन्मान करण्याचा मी प्रयत्न करीन.’ आपल्या छोटेखानी भाषणामध्ये साँडर्स यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त धोरणांचाही उल्लेख केला.

    या पुरस्कारासाठी साँडर्स यांच्यासह तीन अमेरिकी आणि तीन ब्रिटिश लेखकांना नामांकन मिळाले होते. त्यामध्ये साँडर्स यांनी बाजी मारली. साँडर्स यांनी आतापर्यंत विविध लेखनप्रकार हाताळले आहेत. लघुकथा, निबंध, विस्तृत दंतकथा आणि मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. २००९ मध्ये त्यांना ‘अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट् स अँड लेटर्स’चे अॅकॅडमी अॅवॉर्ड मिळाले आहे.

    हा पुरस्कार १९६९ पासून देण्यात येतो. मात्र, केवळ कॉमनवेल्थ स्टेट्समधील लेखकांसाठीच तो खुला होता. २०१४ मध्ये मात्र इतर इंग्रजीभाषक देशांतील लेखकांसाठी तो खुला करण्यात आला. गेल्या वर्षी हा पुरस्कार मिळविणारे पॉल बीटी हे पहिले अमेरिकी लेखक ठरले. त्यांना ‘द सेलआउट’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला.


    🔹भारतीय नौदलाला अमेरिकी तंत्रज्ञान


    भारतीय नौदलांच्या विमानवाहू जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉँच सिस्टीम (इमल्स) पुरवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टीलरसन लवकरच भारतभेटीवर येणार असून त्यापूर्वी भारत आणि अमेरिकेतील सामरिक भागीदारी दृढ असल्याचा संदेश देण्यासाठी हे तंत्रज्ञान देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. ओबामा अध्यक्ष असताना भारताने इमल्स तंत्रज्ञान पुरवण्याबाबत अमेरिकेकडे विनंती केली होती.

    भारतीय नौदल भविष्यातील विमानवाहू नौका निर्मितीची योजना आखत आहे. याकरता भारताने ईएमएएलएस तंत्रज्ञान पुरविण्याची मागणी ओबामा प्रशासनाकडे केली होती. तत्कालीन ओबामा प्रशासनाने भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार ठरविले आणि आता ट्रम्प प्रशासनाने तंत्रज्ञान हस्तांतरणाला मंजुरी देत द्विपक्षीय संबंधांना नवा आयाम मिळवून दिला. मागील एक वर्षात अमेरिकेने भारताला अनेक प्रकारचे संरक्षण तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. यात प्रिडेटर ड्रोन्सचा देखील समावेश असल्याने भारताच्या संरक्षण सामग्रीत मोठी भर पडणार आहे.


    तंत्रज्ञानाचे लाभ


    भारतीय नौदल भविष्यातील विमानवाहू नौकांना ईएमएएलएस तंत्रज्ञानाने सज्ज करू इच्छिते. या तंत्रज्ञानाद्वारे वेगवेगळ्या प्रकारची, विविध वजने असलेल्या विमानांच्या उड्डाणास मदत होते. जनरल ऍटोमिक्सचे यूएस अँड इंटरनॅशनल स्ट्रटजिक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक लाल यांनी कंपनी नवी दिल्लीत कार्यालय उघडण्याची तयारी करत असल्याचे सांगितले. या कार्यालयाद्वारे भारत सरकारच्या सैन्य गरजांना तत्काळ सहाय्य पुरविता येईल असे वक्तव्य त्यांनी केले.


    🔹नवे भासमान चलन बाजारात


    मनी ट्रेड कॉइन हे नवे भासमान चलन बुधवारी भारतीय बाजारात दाखल झाले. सध्या जगभरात १०८८ भासमान चलने व्यवहारात असून त्यात आता मनी ट्रेड कॉइनची भर पडली आहे. याची घोषणा दि वर्ल्ड ऑफ क्रिप्टोकरन्सी या पुस्तकाचे लेखक व फ्लिनस्टोन समूहाचे प्रमुख अमित लखनपाल यांनी केली.

    भासमान चलनाची खरेदी-विक्री करणे भारतात बेकायदा आहे. हे चलन देशात अवेध चलन मानले जात असल्याने यामध्ये व्यवहार करताना ती सर्वस्वी गुंतवणूकदाराने वैयक्तिक जबाबदारीवर करावी, याकडे लखनपाल यांनी लक्ष वेधले. जगभरात अशा प्रकारचे व्यवहार करण्यासाठी ७२९ मंच उपलब्ध असून यांवर दर आठवड्याला सुमारे ३२ अब्ज व्यवहार होतात.

    भासमान चलन कायदेशीर करण्याला विविध स्तरांतून सध्या विरोध होतो आहे. याविषयी रिझर्व्ह बँकेकडून चाचपणी केली जात आहे. बिटकॉइन या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भासमान चलनाची देशातील वाढ झपाट्याने होत असल्याने सरकार या सर्वच व्यवहारांविषयी गंभीर आहे.


    🔹वारसास्थळांच्या दिनदर्शिकेत ताजमहालचा समावेश


    2018 वर्षासाठी योगी सरकारने ऐतिहासिक वारसास्थळांचा उल्लेख असणारी दिनदर्शिका प्रसिद्ध केली. यात ताजमहालला स्थान देण्यात आले. दिनदर्शिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र छापण्यात आले. दिनदर्शिकेवर भाजपची ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा नमूद आहे. या अगोदर राज्याच्या पर्यटन विभागाने काढलेल्या पुस्तिकेत ताजमहालला स्थान न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. ऐतिहासिक वारसास्थळांच्या दिनदर्शिकेत गोरखनाथ मंदिराला देखील स्थान मिळाले. काशी विश्वनाथ मंदिर, विंध्याचल, मथुरा येथील होळी, कृष्ण जन्मस्थान, झाशीतील किल्ला, सारनाथ, अयोध्येची राम की पैडी, त्रिवेणी संगम आणि पीलीभीत येथील गुरुद्वारा यांचा दिनदर्शिकेत समावेश करण्यात आला. संगीत सोम यांच्या ताजमहाल विषयक वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. सोम यांच्या वक्तव्याला खोडून काढत मुख्यमंत्री योगींनी ताजमहालवर भारतीयांना गर्व असल्याचे म्हटले होते.


    🔹पर्यायी खाणी शोधण्यासाठी रिलायन्स-बीपीमध्ये भागीदारी


    2022 पर्यंत वायुचे उत्पादन देण्यासाठी रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि बीपी पीएलसी (अगोदरची ब्रिटीश पेट्रोलियम) या कंपन्यांमध्ये भागीदारी झाली. केजी-डी6 क्षेत्रातून उत्पादन घेण्यासाठी दोन्ही कंपन्या 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. कृष्णा गोदावरी क्षेत्रात पर्यायी उत्पादन घेण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे डिरेक्टरेट जनरल ऑफ हायड्रोकार्बनकडे अहवाल सादर केला आहे.

    कृष्णा गोदावरी खोऱया उत्पादन घेण्यासाठी डी-2,6,19 आणि 22 क्षेत्रांव्यतिरिक्त डी-29 आणि डी30 क्षेत्रांचा शोध घेण्यात आला आहे. या क्षेत्रातून वायुचे उत्पादन घेण्यासाठी नव्याने विहीरी खोदाव्या लागणार आहेत. या ठिकाणहून 10 ते 12 दशलक्ष स्टॅण्डर्ड चौरस मीटर वायुचे प्रतिदिनी उत्पादन घेण्यात येईल. यापूर्वी जूनमध्ये या क्षेत्रात 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. या क्षेत्रात पर्यायी खाणीचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी कंपन्यांकडून अलग योजना तयार करण्यात येईल. मात्र सध्या वायुची किंमत अपेक्षेप्रमाणे नसल्याने कंपन्यांनी ही मोहीम पुढे ढकलली आहे.


    🔹व्यवसाय सुलभीकरणाला दणका


    भारतात व्यवसाय सुलभीकरणाच्या निर्देशांकांत (ईज ऑफ डुईंग बिझनेस) मोदी सरकारला झटका बसला आहे. जागतिक बँक आणि डीआयपीपी यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या यादीत देशातील 11 राज्यांना कोणताही गुण पटकाविता आला नाही. यातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश असून तेथे भाजपचे सरकार आहे. मानांकन बनविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निर्देशांनुसार कोणतेही काम न केल्याने त्यांना गुण देण्यात आले नाहीत.

    या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, लक्षद्धीप आणि अंदमान व निकोबार बेटे यांचा समावेश आहे. डीआयपीपी आणि जागतिक बँकेने मिळत एप्रिल 2017 मध्ये व्यवसाय सुलभीकरणासाठी एक योजना तयार केली होती. या योजनेमध्ये राज्यांना 405 शिफारसी सांगण्यात आल्या होत्या. यानुसार राज्य सरकारे आपल्या योजना तयार करतात आणि त्या दिशेने सुधारणा करतात. राज्यांना मानांकन या बदलानुसार देण्यात येते. राज्यांनी केलेल्या प्रमाणात त्यांना गुण देण्यात येतात. शून्य गुण म्हणजे त्या राज्याने कोणतीही चांगली कामगिरी न करत पावले उचलली नसल्याचे स्पष्ट होते.

    या मानांकनामुळे राज्यांत गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांना सोपे जाते. ज्या राज्यांत चांगले मानांकन आहे, अशा राज्यांत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येते, आणि कमी मानांकन असल्यास गुंतवणूकदार त्या राज्याकडे पाठ फिरवितात.


    🔹दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे निधन


    गडकिल्ल्यांचे अभ्यासक दुर्गमहर्षी प्रमोद ऊर्फ भाऊ मांडे यांचेवयाच्या ६३ व्या वर्षी दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. मांडे यांनी तब्बल ४० वर्षे सह्याद्रीच्या रांगामध्ये पायी भ्रमण करून २००० किल्ले पाहिले. त्याबाबत लेखन केले. त्याचे छायाचित्रण केले.

    टाटा मोटर्समध्ये २२ वर्षे नोकरी केल्यानंतर केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठीमांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आत्मसात करायचा असेल तर गड किल्ल्यांलाच भेटी दिल्या पाहिजेत असे ठाम मत मांडे यांचे होते.

    मांडे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यामध्ये गड किल्ले महाराष्ट्राचे, सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्य संग्रामातील समिधा, १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र अशी काही निवडक पुस्तकांची नावे सांगता येतील. मांडे हे भाऊ म्हणूनच सर्वांना परिचित होते. भाऊंना 'दुर्ग महर्षी' व 'सह्याद्री पूत्र' म्हणूनही उपाधी दिली गेली.


    🔹हेमा मालिनींच्या आत्मचरित्राचे अनावरण!


    बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्राचे अनावरण केले. या क्षण त्यांच्यासाठी काही खास आहे. या आत्मचरित्राचे अनावरण बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली.

    हेमा यांच्या आत्मचरित्राचे लेखन 'स्टारडस्ट' चमाजी संपादक आणि निर्माते राम कमल मुखर्जी यांनी केले आहे. पुस्तकात हेमा यांचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्य या सगळ्याचा उल्लेख आहे. याची प्रस्तावना खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आत्मचरित्र लिहिले आहे.

    आत्मचरित्राचे अनावरण हेमा यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. १९६८ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या 'ड्रीम गर्ल'ने चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण केली. 'सपनों के सौदागर' या पहिल्या चित्रपटात हेमा, राज कपूर यांच्यासोबत झळकल्या होत्या. त्यानंतर 'जॉनी मेरा नाम' यात त्या देवानंद यांच्यासोबत दिसल्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि तेव्हापासूनच त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.

    No comments:

    Post a Comment