Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, October 21, 2017

    चालू घडामोडी 20 ऑक्टोबर2017 (text)

    Views
    🔹युनेस्कोच्या महासंचालकपदी ऑड्री आझूले यांची नियुक्ती

    संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या युनेस्कोच्या महासंचालक पदावर फ्रान्सच्या माजी सांस्कृतिक ऑड्री आझूले यांची नियुक्ती झाली आहे. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत आझूले यांनी अंतिम टप्प्यात कतारचे उमेदवार हमाद बिन अब्दुल अझीझ अल कवारी यांचा ३० विरुद्ध २८ अशा केवळ दोन मतांनी पराभव केला.

    युनेस्कोच्या विदयमान महासंचालक आयरिना बोकोव्हा बल्गेरिया यांच्याकडून ऑड्री अझूले यांनी पदभार स्वीकारला. तसेच युनेस्कोने इस्त्राईलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत अमेरिकेने १३ ऑक्टोबर २०१७ रोजी युनेस्कोतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.

    पॅरिसमध्ये जन्मलेल्या आणि डाव्या विचारांची पार्श्वभूमी कुटुंबात वाढलेल्या ऑड्री आझूले या युनेस्कोने प्रमुखपद भूषविणाऱ्या पहिल्या ज्यू आहेत. तसेच रेने महेरू [युनेस्को महासंचालक १९६१-७४] युनेस्कोच्या महासंचालक पदावर नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या फ्रेंच नागरिक आहेत. त्यांचे वडील अँड्रे हे मोरोक्कोचे राजे मोहम्मद यांचे सल्लागार होते. त्यांच्या आई कटिया बरामी या लेखिका असून मोरक्कन आहेत. फ्रान्समधील प्रसिद्ध अशा ईएनए विद्यापीठातून त्या विशेष प्रावीण्याने पदवीधर झाल्या. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विविध विभागामध्ये त्यांनी काम केले आहे.

    फ्रान्सच्या चित्रपट उद्योगातील प्रमुख अशा सीएनजी नॅशनल सेंटर फॉर सिनेमा अँड द मुविंग इमेजच्या अर्थविषयक संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अशा अनेक महत्वाच्या पदावर ऑड्री आझूले यांनी याआधी कार्य केले आहे. त्यामुळे या महत्वाच्या पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.

    🔹भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिका यांच्यात ‘IBSA ट्रस्टकोष’ करार

    अन्य विकसनशील देशांमधील दारिद्र्याच्या समस्येला तोंड देण्याच्या उद्देशाने भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिका यांच्यात ‘IBSA ट्रस्टकोष’ करार साक्षांकीत करण्यात आला आहे.

    दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहरामध्ये आयोजित 8 व्या IBSA त्रिपक्षीय मंत्रिस्तरीय आयोगाच्या बैठकीत या करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.

    अन्य विकसनशील देशांसाठीच्या या IBSA ट्रस्ट कोषमध्ये तीनही देशांकडूनदरवर्षी एक दशलक्ष डॉलर्सचे योगदान येणार आणि हा निधी दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) च्याविशेष दलाकडून व्यवस्थापित केला जाणार आहे.

    🔹संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद (UNHRC) मध्ये 15 सदस्य देशांची निवड

    संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद (UNHRC) सेवा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने गुप्त मतदानातून 15 सदस्य देशांची निवड केली आहे. यात भारताची शेजारी राष्ट्रे पाकिस्तान, अफगानिस्तान आणि नेपाळ या देशांचाही समावेश आहे.

    इतर 12 देशांमध्ये अंगोला, ऑस्ट्रेलिया, चिली, कांगो प्रजासत्ताक, मेक्सिको, नायजेरिया, पेरु, कतार, सेनेगल, स्लोवाकिया, स्पेन आणि यूक्रेन यांचा समावेश आहे. यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2018 पासून सुरू होणार आणि ते तीन वर्षांसाठी सेवा देतील.

    No comments:

    Post a Comment