Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, October 16, 2017

    चालु घडामोडी 16 ऑक्टोबर 2017 (text)

    Views
    मुंबई : सगळ्यात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये टोकयोनं पहिला क्रमांक पटकावला आहे. द इकोनॉमिस्टनं २०१७ सालच्या सगळ्यात सुरक्षित शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये मुंबई ४५ व्या क्रमांकावर आहे तर दिल्ली ४३ व्या क्रमांकावर आहे.

    द इकोनॉमिस्टनं ४९ मापदंड घेऊन ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये डिजीटल, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि वैयक्तिक सुरक्षितता यांचा आधार घेऊन हा सर्व्हे करण्यात आला आहे.

    या सर्व्हेच्या शेवटच्या १० शहरांमध्ये ढाका, कराची, मनिला, हो ची मिन्ह आणि जकार्ता या आशियातल्या शहरांचा समावेश आहे तर कैरो आणि तेहरान ही मध्य पूर्व आणि आफ्रिकेतली शहरं आहेत.

    सगळ्यात सुरक्षित टॉप १० शहरांमध्ये अमेरिकेतल्या एकही शहराचा समावेश नाही. सॅन फ्रान्सिसको हे एकमेव शहर टॉप २० मध्ये आहे. टॉप १० शहरांमध्ये मॅड्रीड, बार्सीलोना, स्टॉकहोल्म, ऍम्सटरडॅम, झुरीक, सिंगापूर, वेलिंग्टन, हाँगकाँग, मेलबर्न आणि सिडनीचा समावेश आहे. 

    🔹‘आयटीबीपी’ला यांत्रिकी जोड

    चीनच्या सीमेवर त्वरित सैन्य नेता यावे, यासाठी ‘इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस’ने (आयटीबीपी) यांत्रिकी पलटण उभारली आहे. ‘आयटीबीपी’च्या स्थापनेपासून ५० वर्षांहून अधिकच्या काळात पहिल्यांदाच अशी पलटण उभारण्यात आली आहे. डोकलामसारखा तिढा पुन्हा उद्भवल्यास अथवा चीनच्या सैन्याने कुठली आगळीक केली, तर त्याला आता त्वरित तोंड देता येणे शक्य होणार आहे.

    उंचावरील सीमा चौक्यांसाठी ‘स्नो स्कूटर’ घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली होती. या निर्णयामुळे लष्कराप्रमाणे निमलष्करी दलातही यांत्रिकी दल आता राहणार आहे. गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की यांत्रिकी पलटणीमध्ये २५०हून अधिक ‘स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल’, सर्व भूभागांमध्ये उपयुक्त ठरतील अशी वाहने
    (ऑल टेरेन व्हेइकल, ‘एटीव्ही’), ‘स्नो स्कूटर’, एक्स्कव्हेटर, मध्यम वजन उचलू शकणारी चारचाकी वाहने यांचा समावेश आहे.

    लष्करामध्ये यांत्रिकी पायदळाचा समावेश आहे. यामध्ये जवानांना तातडीने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येते. याच धर्तीवर सीमेवरील चौक्यांवर तैनात असलेल्या निमलष्करी दलालाही यांत्रिकी विभागाची गरज होती. एखाद्या युद्धाच्या प्रसंगी सर्वप्रथम या दलालाच शत्रूला सामोरे जावे लागते. आतापर्यंत लष्कराखेरीज सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) तोफखाना विभाग असून, काही प्रमाणात यांत्रिकी दलाचा समावेश आहे. ‘आयटीबीपी’च्या मुख्यालयातून यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

    🔹
    जैविक घड्याळाविषयीच्या संशोधनाला नोबेल

    अमेरिकी अनुवंशशास्त्रज्ञ जेफ्री सी हॉल (७२), मायकेल रोसबाश(७३) आणि मायकेल डब्ल्यू यंग (६८) या तिघांना वैद्यकशास्त्राचे नोबल जाहीर झाले आहे. सजीवांमधील झोप आणि जागृतावस्था यासाठी कारणीभूत असलेल्या जैविक घड्याळाबद्दलच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हा सन्मान केला जात आहे. १.१ दशलक्ष डॉलरचे हे पारितोषिक या त्रयीमध्ये विभागून दिले जाणार आहे.

    वनस्पती, प्राणी आणि मानव एका विशिष्ट जैविक तालाशी अनुकूलन दर्शवतात आणि आणि तो पृथ्वीच्या उत्क्रांतीसोबत जुळवलेला असतो, याबद्दलचे महत्त्वपूर्ण संशोधन या संशोधक त्रयीने केल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिवलनाशी सजीवांनी स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवले आहेत.

    मानवासह अन्य सजीवांचे एक जैविक घड्याळ असते आणि ते सजीवांना दिवस आणि रात्रीच्या चक्राशी अनुकूलन राखण्यास मदत करते, याबाबत गेली अनेक वर्षे संशोधक या जैविक घड्याळाचे काम नक्की कशा प्रकारे चालते, यावर या तिघांच्या संशोधनातून महत्त्वपूर्ण प्रकाश टाकण्यात आला आहे.

    ▪️हार्मोन्स पातळीचा परिणाम

    हार्मोन्सची पातळी, झोप, शरीराचे तापमान आणि चयापचय क्रिया या जैविक क्रियांवर हार्मोनच्या पातळीचा परिणाम होतो. आपण टाइम झोन बदलतो तेव्हा जेटलॅगचा त्रास होतो, हे याचेच उदाहरण आहे. यावेळी शरीरांतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरणातील ताल बदलतो. फळमाशीचा अभ्यास करून दैनंदिन जैविक ताल नियंत्रित करणारे जनुक वेगळे करण्यात या संशोधक त्रयीला यश मिळाले. या जनुकांमध्ये असलेले विशिष्ट प्रकारचे प्रथिन रात्रीच्या वेळी साठून राहते आणि दिवसा त्या प्रथिनाचे विघटन होते, असे या संशोधनामधून समोर आले आहे. या यंत्रणेमध्ये असलेले अन्य एक प्रथिनही वेगळे करण्यात त्यांना यश आले आहे.

    🔹जैवरेणूंच्या संशोधनाला रसायनशास्त्राचे नोबेल

    जैवरेणूची प्रतिमा विकसित करण्याच्या प्रक्रियेवर मूलभूत संशोधन करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. या संशोधनामुळे ‘झिका’सारख्या आजारांच्या विषाणूंना मूळ आणि ‘थ्री-डी’ स्वरूपात पाहणे शक्य झाले असून, त्याचा भविष्यामध्ये मोठा फायदा होणार आहे.

    स्वित्झर्लंडचे जॅक्स ड्युबोच, अमेरिकेचे जोकीम फ्रँक आणि ब्रिटनचे रिचर्ड हेंडरसन अशी या पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांची नावे आहेत. ही प्रक्रिया ‘क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या नावाने ओळखली जाते. यामध्ये जैवरेणू गोठलेल्या अवस्थेत जातात. त्यामुळे हे विषाणू पहिल्यांदाच मूळ स्वरूपात पाहता येऊ शकतात, असे नोबेल पारितोषिकांच्या निवड समितीने निवडीच्या घोषणेवेळी म्हटले आहे. हे विषाणू मायक्रोस्कोपमधूनही पाहता येऊ शकतात. त्यातून जीवसृष्टीतील मूलभूत रसायनशास्त्राची माहिती मिळण्यास मदत मिळेल, असा विश्वास आहे.

    🔹कझुओ इशिगुरो यांना साहित्यातील नोबेल जाहीर

    'द रिमेन्स ऑफ द डे' या जगप्रसिद्ध कादंबरीचे जपानी वंशाचे प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार, साहित्यिक कझुओ इशिगुरो यांचा यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. इशिगुरो यांचे नोबेलसाठी नाव जाहीर करताना नोबेल समितीने म्हटले की, आपल्या भावनात्मक कादंबऱ्यांच्या माध्यमातून जगाशी असलेल्या आपल्या मायावी आकनाच्या खोली उघड करुन दाखवण्याचे काम अशिगुरो यांनी केले आहे. त्यांच्या याच कामगिरीसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येत असल्याचे समितीने जाहीर केले.

    नोबेल पुरस्काराच्या रुपात इशिगुरो यांना सुमारे ११ लाख डॉलर इतकी रक्कम प्राप्त होणार आहे. भारतीय चलनात याची किंमत सहा कोटी रुपयांहून अधिक आहे. गितांजलीसाठी रविंद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले रविद्रनाथ हे एकमेव भारतीय साहित्यिक आहेत.

    इशिगुरो यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९५४ ला जपानमधील नागासाकी येथे झाला. १९६० मध्ये त्यांचे कुटुंब ब्रिटनला स्थलांतरीत झाले. त्यानंतर १९८२ या वर्षी त्यांना ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले.

    १९७४ मध्ये इशिगुरो यांनी केंट विद्यापीठातून उच्च शिक्षणाला सुरूवात केली. इंग्रजी आणि तत्वज्ञान या विषयात त्यांनी बीएची पदवी संपादन केली. पुढे इस्ट विद्यापीठातून त्यांनी क्रिएटीव्ह रायटिंगमध्ये एमएची पदवी मिळवली.

    २००५ या वर्षी जगप्रसिद्ध टाईम या मासिकाने 'नेव्हर लेट मी गो' या कादंबरीसाठी सर्वोत्कृष्ट शंभर इंग्रजी लेखकांमध्ये इशिगुरो यांना स्थान दिले होते. शिवाय २००८मध्ये त्यांची १९९५ पासूनच्या सर्वोत्कृष्ट ५० ब्रिटिश लेखकांच्या यादीत समावेश केला होता.

    ▪️इशिगुरो यांच्या कादंबऱ्या :
    ● अ पेले व्ह्यू ऑफ हिल्स (१९८२)
    ● अॅन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड (१९८६)
    ● द रिमेन्स ऑफ द डे (१९८९)
    ● द अनकन्सोल्ड (१९९५)
    ● व्हेन वी वेअर ऑर्फन्स (२०००)
    ● नेव्हर लेट मी गो (२००५)
    ● द ब्युरिड जायंट (२०१५)

    🔹'आयकॅन'ला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार

    जगातील महासंहारक अण्वस्त्र नष्ट व्हावीत म्हणून आंतरराष्ट्रीय मोहीम चालवणाऱ्या इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स (ICAN) या स्वयंसेवी संस्थेला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन 'आयकॅन'ला हा सन्मान देण्यात आला आहे.

    ओस्लो इथं १० डिसेंबरला होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पोप फ्रान्सिस, सौदी अरेबियाचे ब्लॉगर रैफ बदावी, इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद जारीफ हेही पुरस्काराच्या स्पर्धेत होते. मात्र, 'आयकॅन'नं यात बाजी मारली. 'आयकॅन'ला शांततेचा नोबेल देऊन जगातील अण्वस्त्रसज्ज देशांना अण्वस्त्रांच्या भयावहतेची जाणीव करून देण्याचा आमचा हेतू आहे, असं नोबेल समितीनं पुरस्काराची घोषणा करताना म्हटलं आहे.

    🔹रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

    ‘वर्तनाधारित अर्थशास्त्र’ असा सिद्धांत मांडणारे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर (७२) यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. सुमारे ७२ कोटी रुपयांचे हे पारितोषिक ‘अंडरस्टँडिंग द सायकॉलॉजी ऑफ इकॉनॉमिक्स’ या प्रबंधासाठी देण्यात येणार आहे.

    मानवी स्वभावाचा व्यक्तीच्या आर्थिक निर्णयांवर आणि बाजाराच्या उलाढालीवर कसा परिणाम होतो, हे थेलर यांनी दाखवून दिले. थेलर हे वर्तनाधारित अर्थशास्त्राचे जनक आहेत. या शाखेत मानवी वर्तनाचा अर्थशास्त्रावर होणारा परिणाम अभ्यासला जातो. एखादी व्यक्ती आर्थिक निर्णय घेताना कसा विचार आणि वर्तन करते याचे विश्लेषण या शाखेत केले जाते. थेलर अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

    ‘अर्थमानसा’ला नोबेलचे अधिष्ठान
    अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर यांना सोमवारी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यांना त्यांनी या संशोधनातून एकत्र आणले आहे.

    ▪️थेलर कोण आहेत?

    रिचर्ड एच. थेलर (७२) हे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ असून वर्तन (बिहेवियरल) अर्थशास्त्रामध्ये त्यांची ख्याती आहे. वर्तन अर्थशास्त्रावर त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. शिकागो विद्यापीठात ते प्राध्यापक आहेत.

    ▪️थेलर यांचे संशोधन

    कुठलीही व्यक्ती आपल्याकडील पैशांसंबंधी कुठलाही निर्णय घेताना त्या व्यक्तीची मानसिक स्थिती अथवा त्यांचा पैसे खर्च करण्याचा कल हा एक विशिष्ट असतो. एखाद्या निर्णयाच्या दीर्घकाळाच्या परिणामापेक्षा तात्पुरत्या काळातील परिणामाकडेच बघण्याचा लोकांचा कल असतो. लोकांच्या या मानसिक स्थितीचा आणि त्यातून घेतलेल्या निर्णयाचा एकूण परिणाम एकूण बाजारपेठेवर आणि अंतिमतः त्यांच्या जीवनावर होतो. अशा पद्धतीने त्यांनी मानसशास्त्राचा परिणाम अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून कसा होतो, याचे संशोधन त्यांनी केले आहे.

    ▪️संशोधनाचा परिणाम

    थेलर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर ‘द डिक्टेटर गेम’ हे टूल विकसित केले आहे. जगभरातील लोकांचे वर्तन याद्वारे मोजता येणार आहे. संशोधनामुळे पेन्शन अथवा इतर ठिकाणी सेव्हिंग्ज करताना स्वनियंत्रण अधिक करता येणार आहे, असे नोबेल ज्युरींनी सांगितले. मानवी गुणधर्मांचा व्यक्तींच्या निर्णयावर आणि बाजारेपठेवर कसा परिणाम होतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. या संशोधनामुळे व्यक्तींना वित्तीय नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करण्याबरोबरच सरकारलाही धोरणे ठरवताना लोकांचे मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यांची सांगड घालणे सोपे जाणार आहे.

    🔹फेडररचे हार्ड कोर्ट वर ७०० विजय

    स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडरर याने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत फेडररने स्पेनच्या रफाएल नदालवर ६-४, ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात केली. फेडररचा हा हार्ड कोर्टवरील ७०० वा विजय ठरला. जागतिक क्रमवारीत ३६ वर्षीय फेडरर दुसऱ्या, तर ३१ वर्षीय नदाल अव्वल स्थानावर आहे. यापूर्वी हे दोघे ३७ वेळा आमनेसामने आले होते. त्यात नदालने २३, तर फेडररने चौदा वेळा बाजी मारली होती. या वेळी कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता होती. मात्र, या वेळीही फेडररने बाजी मारली. अर्थात, नदालला या स्पर्धेत पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २००९मध्ये रशियाच्या निकोलाय डेव्हिडेन्कोने नदालला हरवून या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

    🔹शांती स्वरूप भटनागर पूरस्कार 2017

    केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या ' शांती स्वरूप भटनागर ' पुरस्काराची घोषणा केली गेली आहे.

    ▪️पुरस्कार विजेत्यांची यादी

    ● जैव-विज्ञान क्षेत्र -
    डॉ. दीपक धन्यवादप्पन नायर आणि डॉ. संजीव दास

    ● रसायन विज्ञान क्षेत्र –
    डॉ. जी. नरेश पटवारी

    ● भूशास्त्र, पर्यावरण, सागरी व ग्रह विज्ञान क्षेत्र –
    डॉ. एस. सुरेश बाबू

    ● अभियांत्रिकी विज्ञान क्षेत्र –
    डॉ. आलोक पॉल आणि डॉ. नीलेश बी. मेहता

    ● वैद्यकीय विज्ञान क्षेत्र -
    डॉ. अमित दत्त आणि डॉ. दीपक गौर

    ● भौतिक विज्ञान क्षेत्र -
    डॉ. निस्सीम कानेकर आणि डॉ. विनय गुप्ता

    ▪️ पुरस्कारासंबंधी माहिती

    प्रत्येक दिले जाणारे शांती स्वरूप भटनागर विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) द्वारा उल्लेखनीय व असाधारण संशोधन, अप्लाइड वा मूलभूत श्रेणीत जैवविज्ञान, रसायनशास्त्र, भूशास्त्र, पर्यावरण, सागरी व ग्रह, अभियांत्रिकी, गणिती, वैद्यकीय व भौतिक विज्ञान या क्षेत्रांमध्ये दिले जातात.

    हा पुरस्कार CSIR चे संस्थापक व प्रथम संचालक शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मरणार्थ दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात सन 1957 पासून केली गेली. 5 लाख रूपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

    🔹 जपानमध्ये भारत-जपान संयुक्त सागरी ‘पॅसेज’ सरावाला सुरुवात

    12 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2017 दरम्यान जपानच्या ससेबो येथे ‘पॅसेज (PASSEX)’ हा भारत-जपान संयुक्त सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे. या सरावात भारताकडून भारतीय नौदलाच्या ‘INS सातपुडा’ आणि ‘INS कादमाट’ या जहाजांनी भाग घेतलेला आहे.

    🔹व्यवसाय सुलभीकरणाला दणका

    भारतात व्यवसाय सुलभीकरणाच्या निर्देशांकांत (ईज ऑफ डुईंग बिझनेस) मोदी सरकारला झटका बसला आहे. जागतिक बँक आणि डीआयपीपी यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या यादीत देशातील 11 राज्यांना कोणताही गुण पटकाविता आला नाही. यातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश असून तेथे भाजपचे सरकार आहे. मानांकन बनविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निर्देशांनुसार कोणतेही काम न केल्याने त्यांना गुण देण्यात आले नाहीत.

    या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, लक्षद्धीप आणि अंदमान व निकोबार बेटे यांचा समावेश आहे. डीआयपीपी आणि जागतिक बँकेने मिळत एप्रिल 2017 मध्ये व्यवसाय सुलभीकरणासाठी एक योजना तयार केली होती. या योजनेमध्ये राज्यांना 405 शिफारसी सांगण्यात आल्या होत्या. यानुसार राज्य सरकारे आपल्या योजना तयार करतात आणि त्या दिशेने सुधारणा करतात. राज्यांना मानांकन या बदलानुसार देण्यात येते. राज्यांनी केलेल्या प्रमाणात त्यांना गुण देण्यात येतात. शून्य गुण म्हणजे त्या राज्याने कोणतीही चांगली कामगिरी न करत पावले उचलली नसल्याचे स्पष्ट होते.

    या मानांकनामुळे राज्यांत गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांना सोपे जाते. ज्या राज्यांत चांगले मानांकन आहे, अशा राज्यांत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येते, आणि कमी मानांकन असल्यास गुंतवणूकदार त्या राज्याकडे पाठ फिरवितात.

    🔹ईलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन धोरण

    देशात ईलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार व्हावा यासाठी सरकारकडून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी या गाडय़ांचा वापर करावा आणि स्थानिक उत्पादन घेण्यासाठी सरकार धोरण निर्धारित करत आहे. डिसेंबरपर्यंत यासाठी कायदा करण्याचा आणि धोरण लागू करण्याचा प्रयत्न आहे.

    या वाहनांची नोंदणी तत्काळ करणे आणि नोंदणी शुल्क हटविण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. देशात राष्ट्रीय वाहतूक सुधारणा लागू करण्यात येणार आहे. यानुसार एखाद्या ग्राहकाने ईलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यानंतर तत्काळ मोफत नोंदणी करता येईल. नेंदणी शुल्क हे राज्याच्या अंतर्गत येते. जीएसटीमध्ये नसल्याने राज्यांनी संमती देणे आवश्यक आहे. देशात स्थानिक उत्पादन मेक इन इंडियातर्गत घेण्यासाठी भारतीय कंपन्यांना सवलत देण्यात येईल. सध्या कंपन्यांना तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी आर्थिक सवलत देण्यात येते. मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. या नवीन धोरणासाठी नीति आयोग आणि वाहतूक मंत्रालय संयुक्तपणे कार्यरत आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱयाने म्हटले.

    🔹पवनहंसमधील संपूर्ण हिस्सेदारी सरकार विकणार

    पवनहंस लिमिटेड या हेलिकॉप्टर सेवा पुरविणाऱया कंपनीतील सर्व हिस्सेदारी सरकारकडून विक्री करण्यात येणार आहे. सरकारने यासाठी खासगी कंपन्यांना बोली लावण्यासाठी आमंत्रित केले आहे. यामध्ये विदेशी कंपनीचाही समावेश आहे. पवनहंसमध्ये सरकारचा 51 टक्के हिस्सा आहे. उर्वरित 49 टक्के ओएनजीसी या सरकारी कंपनीकडे आहे.

    आंतरराष्ट्रीय पातळीवरील या बोलीत सहभागी होण्यासाठी कंपन्यांना 8 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. सरकारकडे या कंपनीच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आहे. बोली जिंकणाऱया कंपनीला व्यवस्थापनावरील नियंत्रण हाती येणार आहे. सरकारने आपल्याकडील संपूर्ण 51 टक्के हिस्सा विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात सांगण्यात आले. रणनितीक निर्गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या दिपम (गुंतवणूक आणि सार्वजनि संपत्ती व्यवस्थापन विभाग)ने पुढाकार घेतला आहे.

    केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कंपन्यांतील निर्गुंतवणूक करण्याचा धडाका लावला आहे. याव्यतिरिक्त हॉस्पिटल सर्व्हिस कन्सल्टन्सी कॉर्पोरेशन, इंजीनियरिंग प्रोजेक्ट्स, नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या कंपन्यांतील निर्गुंतवणूक करण्यात येणार आहे. ब्रिज ऍण्ड रुपमधील हिस्सा खासगी कंपनीने खरेदी केला आहे. चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 72,509 कोटी रुपये उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

    🔹मुगलसराय रेल्वे स्थानकाला दीनदयाळांचे नाव

    मुगलसराय रेल्वेस्थानकाचे नाव बदलून आता पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वेस्थानक करण्यात आले. मुगलसराय स्थानकाचे नाव बदलण्याची शिफारस करणारा उत्तर प्रदेश सरकारचा प्रस्ताव केंद्राने मंजूर केला. या निर्णयामुळे आता दिल्ली-हावडा रेल्वेमार्गातील प्रमुख स्थानक दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने ओळखले जाईल. या रेल्वेस्थानकाच्या नजीकच जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा 1968 मध्ये गूढ मृत्यू झाला होता.

    6 जून रोजी योगी सरकारने रेल्वेस्थानकाच्या नामांतराचा निर्णय घेतला. यानंतर हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला.

    एप्रिल महिन्यात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आगरा विमानतळाला दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिले होते. परंतु स्थानकाचे नाव बदलण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला. स्थानकाला माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्राr यांचे नाव दिले जावे अशी काँग्रेसची मागणी होती. मागील आठवडय़ात उत्तरप्रदेशातील नक्षलप्रभावित चंदौली जिह्याच्या मुगलसराय रेल्वेस्थानकाला उपाध्याय यांचे नाव दिल्यास हिंसक विरोध करण्याची धमकी पोस्टरद्वारे देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या जिह्यात 8 ऑक्टोबर रोजी ही पोस्टर्स दिसून आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी पोस्टर्स फाडून टाकत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला.

    🔹संपूर्ण विमा ग्राम योजना सादर

    लोकांना किफायतशीर जीवन विमा उपलब्ध करविण्यासाठी मोदी सरकारने शनिवारी संपूर्ण विमा ग्राम योजनेचा शुभारंभ केला. ही योजना ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱयांना जीवन विमा उपलब्ध करण्यासाठी आखण्यात आली. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी या योजनेचे अनावरण केले. आता सरकारी कर्मचाऱयांसह पोस्टल जीवन विमा व्यावसायिकांना देखील सामावून घेईल.देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱयांना किफायतशील जीवन विमा उपलब्ध करण्यासाठी पोस्टल नेटवर्कचा वापर केला जावा. पोस्टल नेटवर्कद्वारे बँकिंग सेवा उपलब्ध करविल्या जाव्यात अशी योजना पंतप्रधान मोदींची आहे. खासदार आदर्श ग्रामयोजनेंतर्गत येणाऱया सर्व गावांना या योजनेच्या कक्षेत आणले जाईल. संपूर्ण विमा ग्राम योजनेंर्तगत देशाच्या प्रत्येक जिल्हय़ातील कमीतकमी एक गाव निवडून सर्व कुटुंबांना विमासेवेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती सिन्हा यांनी दिली.पोस्टल जीवन विमाचा लाभ आता सरकारी आणि निमसरकारी क्षेत्राच्या कर्मचाऱयांपुरता मर्यादित नसेल. आता व्यवसायिक म्हणजेच डॉक्टर्स, अभियंते, व्यवस्थापकीय सल्लागार, सनदी लेखापाल, आर्किटेक्ट, वकील, बँकर्ससह बीएसआय आणि एनएसईमध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे कर्मचारी देखील योजनेचा लाभ घेऊ शकतील.

    देशात अधिकाधिक सामाजिक सुरक्षा उपलब्ध करविणे आणि अधिकाधिक लोकांना पोस्टल जीवन विमांतर्गत सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    ▪️कमी हप्ता, अधिक लाभांश

    पोस्टल जीवन विमा योजना 1984 रोजी सादर करण्यात आली. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱयांसाठी सादर करण्यात आलेल्या सर्वात जुन्या जीवन विमा योजनांपैकी ही एक आहे. तर ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना 1995 रोजी सुरू करण्यात आली. ही योजना ग्रामीण भागात राहणाऱयांना विमासुरक्षा उपलब्ध करण्यासाठी सादर करण्यात आली. कमी हप्ता आणि अधिक लाभांश पोस्टल जीवन विमा आणि ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.

    🔹ऑनलाईन प्रस्ताव : राजस्थान विधानसभेचा विक्रम

    आमदारांकडून ऑनलाईन प्रस्ताव स्वीकारणारी देशातील पहिली विधानसभा होण्याचा मान राजस्थान विधानसभने पटकाविला. 14 व्या विधानसभेच्या 9 व्या अधिवेशनापासून राजस्थान विधानसभेची प्रक्रिया आणि कार्यविषयक नियमावलीचा नियम 131 अंतर्गत लक्षवेधी प्रस्ताव, नियम 50 अंतर्गत स्थगन अहवाल ऑनलाईन स्वीकारले जातील अशी माहिती विधानसभा सचिव पृथ्वीराज यांनी दिली. विधानसभा सभापती कैलास मेघवाल यांनी आपल्या कक्षात प्रस्ताव ऑनलाईन पाठविण्याच्या सुविधेचा शुभारंभ लॅपटॉपच्या माध्यमातून केला. नियम 295 अंतर्गत विशेष उल्लेखाच्या सूचना आणि नियम 119 आणि 127 अंतर्गत तातडीच्या प्रस्तावांना ऑनलाईन सादर करण्याची प्रकिया राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या मदतीने विकसित करण्यात आली. ऑनलाईन प्रक्रियेमुळे वेळ, कागदाची बचत होईल. जवळपास सर्व कामकाज ऑनलाईन होत असलेल्या विधानसभांमध्ये राजस्थानचा समावेश आहे.

    🔹स्वदेशी बनावटीचे पाणबुडीभेदी जहाज किल्तान नौदलात दाखल

    भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज (सोमवार) "आयएनएस किल्तान' या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीभेदी लढाऊ जहाजाचा औपचारिकरित्या भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. यावेळी नौदलप्रमुख सुनील लांबा, नौदलाच्या पूर्व मुख्यालयाचे (ईस्टर्न कमांड) मुख्याधिकारी एच एस बिश्त आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

    "प्रोजेक्ट 28' या नौदलाच्या प्रकल्पांतर्गत बांधणी करण्यात आलेल्या कार्मोता प्रकारातील (क्लास) चार लढाऊ जहाजांपैकी "आयएनएस किल्तान' हे तिसरे लढाऊ जहाज आहे. या जहाजावर स्वदेशी बनावटीचे शस्त्रास्त्रे बसविण्यात आली असून; हवाई व "सोनार' सर्वेक्षण प्रणालींचाही या जहाजावर अंतर्भाव करण्यात आला आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय या बेटसमूहांमध्ये वसलेल्या व व्यूहात्मकदृष्टया महत्त्वपूर्ण असलेल्या आमिनिदिवी बेटांमधील एका बेटावरुन या जहाजाचे नाव ठेवण्यात आले आहे.

    No comments:

    Post a Comment