Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, July 23, 2017

    चालू घडामोडी : २३ जुलै

    Views


    दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी

    • युएस स्टेट डिपार्टमेंटद्वारे केलेल्या दहशतवाद्यांशी संबंधीत सर्वेक्षणानुसार दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
    • जगभरात इराक आणि अफगाणिस्तान या दोन देशानंतर सर्वाधिक दहशतवादी हल्ले भारतात झाले आहेत. याआधी तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान होता.
    • युएस स्टेट डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात मरणाऱ्यांची आणि जखमींची संख्या पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त आहे. 
    • २०१६ या वर्षासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले असून, या वर्षभरात जगभरात ११,०७२ दहशतवादी हल्ले घडविण्यात आले.
    • यामध्ये भारतात ९२७ (१६ टक्के) दहशतवादी हल्ले झाले. २०१५मध्ये भारतात हीच संख्या ७९८ होती.
    • २०१५मध्ये दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या ५००च्या आसपास होती. तर २०१६मध्ये वाढ होऊन जखमींची संख्या ६३६ इतकी झाली.
    • २०१६मध्ये भारतात सर्वाधिक दहशतवादी हल्ले जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर आणि झारखंडमध्ये झाले आहेत. 
    • या सर्वेक्षणानुसार, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. २०१५मध्ये पाकिस्तानमध्ये १०१० दहशतवादी हल्ले झाले होते, तर २०१६मध्ये ७३४ हल्ले झाल्याची नोंद आहे. 
    • या सर्वेक्षणानुसार, जगभरातील सर्वाधिक घातक संघटनांच्या यादीत इसिस, तालिबान आणि नक्षलवादी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

    नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी टी आर झेलियांग

    • अनेक नाट्यमय घडामोडीनंतर नागालँडच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले टी आर झेलियांग यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करत विश्वासदर्शक ठराव जिंकला.
    • ६० सदस्यीय विधानसभेत त्यांनी ४७ मते मिळवली. माजी मुख्यमंत्री शुऱ्होझेली लिझेत्सु यांच्या बाजूने ११ जणांनी मतदान केले.
    • झेलिआंग यांच्या बाजूने एनपीएफच्या ३६ जणांनी, भाजपच्या ४ जणांनी आणि ७ अपक्षांनी मतदान केले.
    • यापूर्वी १९ जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री शुरहोजेली लीजित्सू यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपाल पी बी आचार्य यांनी दिला होता.
    • परंतु लीजित्सू आणि त्यांचे सहकारी सभागृहात अनुपस्थित राहिल्यामुळे झेलियांग यांना नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले होते.

    हॉलीवूड अभिनेते जॉन हर्ड यांचे निधन

    • ‘होम अलोन’ या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेले हॉलीवूड अभिनेते जॉन हर्ड यांचे २१ जुलै रोजी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
    • ‘होम अलोन’ या सिनेमात जॉन यांनी केविन मॅककॅलिस्टर या मुख्य पात्राच्या वडिलांची भूमिका वठवली होती.
    • १९७० पासून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीला सुरूवात केली होती. १९९० मध्ये आलेला ‘होम अलोन’ या सिनेमाने हा अभिनेता घराघरात पोहोचला.
    • जॉन हर्ड यांनी कटर्स वे, सीएचयूडी अॅण्ड ग्लॅडिएटर या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
    • १९९९ मध्ये टिव्ही सिरीज ‘द सोप्रानोज’मधील त्यांच्या उत्तम अभिनयाबद्दल जॉन हर्ड यांना अॅमी पुरस्कारही मिळाला होता.

    लिंकिंग पार्कचा गायक चेस्टर बेनिंग्टनची आत्महत्या

    • अमेरिकेतील सुप्रसिद्ध म्युझिक बॅण्ड ‘लिंकिंग पार्क’चा मुख्य गायक चेस्टर बेनिंग्टनने २० जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
    • नंब आणि समव्हेअर आय बिलॉन्ग या गाण्यांमुळे त्याने जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
    • लिंकिंग पार्क या म्युझिक बॅण्डमधून बेनिंग्टनने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या या बॅण्डने तयार केलेला हायब्रीड थिअरी हा अल्बम प्रचंड गाजला होता.
    • त्यानंतर मेटेओरा, वन मोर लाईट, लिविंग थिंग्स, अ थाउझंट सन यांसारख्या संगीत अल्बमची त्यांनी निर्मिती केली.
    • त्याने २००५ साली त्याचा स्वतःचा ‘डेड बाय सनराईझ’ नावाचा म्युझिक बॅण्ड सुरु केला. या बॅण्डचा पहिला अल्बम ‘आऊट ऑफ ॲशेस’ २००९ साली रिलीज झाला.
    • यशाच्या शिखरावर असताना बेनिंग्टन अंमली पदर्थांच्या आहारी गेल्याने त्याची मानसिकता दिवसेंदिवस खालावत गेली.
    • चेस्टरच्या वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेल्या तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज कॅलिफोर्निया पोलिसांनी वर्तवला आहे.

    No comments:

    Post a Comment