Views
बॅडमिंटनपटू श्रीकांतचा सर्वोत्कृष्ट दहा खेळाडूंमध्ये समावेश :
- जागतिक क्रमवारीत स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत झेप घेतली आहे.
- तसेच इंडोनेशियन ओपन आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर श्रीकांतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत श्रीकांतने सर्वोत्तम दहा खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला.
- नवीन क्रमवारीनुसार किदाम्बी श्रीकांत आठव्या स्थानावर विराजमान आहे. गुंटूरच्या या 24 वर्षांच्या खेळाडूचे आता 58,583 इतके गुण झाले.
- 2015 साली श्रीकांत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र त्यानंतर श्रीकांतचा फॉर्म हरवल्यामुळे त्याची घसरण झाली. मात्र लागोपाठ दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवित श्रीकांतने सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत पुन्हा एकदा धडाक्यात पुनरागमन केले आहे.
'जीसॅट-17' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अंतराळ मोहिमेत इस्रोने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
- अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट 17 चे फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. 'एरियन-5' या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट 17 हे अंतराळात झेपावले.
- जीसॅट 17चे वजन जवळपास 3477 किलोग्रॅम एवढे आहे. या उपग्रहात दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे.
- तसेच यात हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी उपकरणही बसवण्यात आले आहे. शिवाय सर्च आणि रेस्क्यू सेवेसाठी जीसॅट 17 ची मदत होणार आहे.
पोलीस अधिकारी महेश भागवत यांचा अमेरिकेत गौरव :
- तेलंगणामधील मराठमोळे आयपीएस अधिकारीमहेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेने बहुसन्मान केला आहे.
- अमेरिकेने 'ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड'देऊन महेश मुरलीधर यांचा गौरव केला आहे.
- महेश भागवत आता हैदराबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत.
- महेश भागवत हे गेल्या 13 वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या तेरा वर्षांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणात त्यांनी व त्यांच्या पथकासोबत शेकडो बालमजुरांची सुटका केली.
एससी मॅग्लेव जगातील सर्वात वेगवान रेल्वे :
- जपानने या रेल्वेला एससी मॅग्लेव असे नाव दिले आहे. ताशी 600 कि.मी. वेगाने धावणारी हे रेल्वे डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच समोरून निघून जाते.
- सर्वात वेगाने धावण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड या रेल्वेच्या नावावर आहे. 2015 मध्ये या रेल्वेने 603 कि.मी.चे अंतर एका तासात कापत नवा विक्रम केला होता.
- तसेच त्यावेळी ही रेल्वे 11 सेकंदांत 1.8 कि.मी.चे अंतर कापत होती. ही रेल्वे मॅग्नेटिक सिस्टीमवर आधारित आहे. अशा प्रोजेक्टसाठी खर्चही खूप येतो. मॅग्नेटिक लेविएटेशनमध्ये (चुंबकीय उत्क्रांती) रेल्वे रूळ आणि चाके यात चुंबकीय दबाव असतो.
- जेव्हा रेल्वे धावत असते तेव्हा ती रुळाच्या 1 ते 6 इंच वरून जात असते. अगदी वेगात असणाऱ्या या रेल्वेला जवळून कॅमेऱ्यात टिपणेही अवघड आहे.
दिनविशेष :
- अल्बर्ट आईनस्टाईन यांनी 30 जून 1905 रोजी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
- 30 जून 1917 हा भारतीय अर्थशास्त्रज्ञ 'दादाभाई नौरोजी' यांचा स्मृतीदिन आहे.