Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, June 2, 2015

    विज्ञान क्षेत्रात २०१५ मध्ये लागलेले महत्त्वाचे शोध

    Views
    Science:
    विज्ञान क्षेत्रात २०१५ मध्ये लागलेले महत्त्वाचे शोध
    निरोप घेण्याच्या शेवटच्या पायरीवर असलेले २०१५ चे वर्ष संशोधकांसाठी फार महत्त्वाचे ठरले आहे. या वर्षात संशोधकांच्या संशोधनातून अनेक महत्त्वाची रहस्ये उकलली गेली. मंगळावर पाणी असल्याचा शोध, नव्या आकाशगंगेचा शोध, आकाशगंगेतील धुमकेतू, पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला ग्रहणग्रस्त सुपरमून याच वर्षात पाहिला गेला आहे.
    १)मंगळावरील पाण्याची शक्यता
    मंगळावर भविष्यात वस्ती करता येण्याच्या दृष्टीने तेथे आढळलेले हिमखंड अत्यंत महत्त्वपूर्ण आहेतच पण मंगळ हा उजाड ग्रह नाही हेही त्यामुळे स्पष्ट झाले आहे. नासाचे रोव्हर हे अंतराळयान २०१२ पासून मंगळाची अनेक निरीक्षणे नोंदवित आहे आणि तेथील फोटो सातत्याने पृथ्वीवर पाठवित आहे. त्यातूनच मंगळावर नद्यांच्या खुणा आढळल्या आहेत. नासाचे खगोल विभागातील संशोधक जिम ग्रीन यांच्या म्हणण्यानुसार जीवन अस्तित्वात येण्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि मंगळावर ती शक्यता दिसल्याने तेथे वस्तीही शक्य होणार आहे. मंगळावर सापडलेल्या १३० फूटाच बर्फाच्या खंडामुळे संशोधकांत उत्साह संचारला आहे.
    २)इलेक्ट्राॅनिक रोप
    वनस्पतीच्या रोपाच्या संवाहन यंत्रणेत इलेक्टॉनिक सर्कीट लावून इलेक्टॉनिक रोपे बनविण्यात संशोधकांनी यश मिळविले आहे. हे यश म्हणजे वनस्पतीशास्त्रातील नवीन युगाची सुरवात मानले जात आहे. स्वीडनच्या लिकोपिंग विद्यापीठातील तज्ञांनी वनस्पतीच्या रोपात तारा, डिजिटल लॉजिक घालण्यात यश मिळविले व त्यामुळे वनस्पती विज्ञानात विकास होण्यासाठी नवीन उपकरणे विकसित करण्यास सहाय्य होणार आहे.
    ३) जेम्स वेब दुर्बिणीवर फ्लाईट मिरर
    नासाने जेम्स वेब दुर्बिणीवर पहिला फ्लाईट मिरर लावण्यात यश मिळविले. असे १८ फ्लाईट मिरर या दुर्बिणीवर लावले गेले आहेत. २०१८ मध्ये सध्याच्या हबल दुर्बिणीच्या जागी ही दुर्बिण कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हा बदल फारच महत्त्वाचा आहे. नासाचे जॉन गर्न्सफेल्ड यांच्या म्हणण्याप्रमाणे जेम्स वेब ही पुढील शतकातील प्रमुख खगोल वेधशाळा असेल.
    ४)मंगळावर आढळलेल्या विविध आकृत्या
    मंगळावर केस मोकळे सोडलेली बाई, उड्या मारणारे उंदीर, खड्यातील माकडे, प्रचंड मोठी बुद्ध मूर्ती आढळल्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली आणि लोकांची करमणूकही झाली. अर्थात हे सत्य असणे शक्य नाही असे लक्षात आले तरी शेवटी हे फोटो नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने पाठविलेले असल्याने ते गंभीरपणे घेणे भाग होते.
    ५) सुपर मून
    पूर्ण चंद्राच्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून खूप जवळ असेल तर त्याला सुपरमून म्हटले जाते. असा योग वर्षातून एक दोनदा येतोही. मात्र २०१५ साल त्यासाठी विशेष ठरले. कारण सप्टेंबरच्या २७ तारखेच्या पौर्णिमेला दुर्लभ अशी खगोलिय महत्त्वाची घटना घडली. या दिवशी सुपर मून होताच पण त्याचदिवशी चंद्रग्रहणही झाले.एरवी सर्व चंद्रग्रहणे पौर्णिमेला होतातच पण सुपरमून असनाता चंद्रग्रहण हा दुर्मिळ योग असतो.
    ६) जीसॅट १५ चे यशस्वी प्रक्षेपण
    भारताच्या जी सॅट १५ या उपग्रहाचे फ्रेंच गियाना येथून अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले गेले.
    ७) डायनासोरचे पंख, त्वचा असलेले जीवाश्म
    कॅनडात डायनासोर या नामशेष झालेल्या प्रजातीचे पंख, त्वचा आणि शेपूट असलेले जीवाश्म सापडले.
    ___________________________________

    No comments:

    Post a Comment