Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    भांडण आणि इर्षा

    4 Views

    सुंदर बोधकथा


    एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे.
    परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.

    माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.

    लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.

    काही दिवसानंतर _ धाकटीसून स्वयंपाक बनवत होती,
    तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणि दूसरं काम करायला निघून गेली.
    त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणि कामाला निघून गेली.
    त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या .

    जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला.

    त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ? तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू.
    त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं.

    संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मि निघून चाललो आहे.
    माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही.
    ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.

    *तातपर्य* :- भांडण आणि इर्षा यामूळं दरिद्री आणि आपलं नुकसानचं होतं.
    ज्या घरात प्रेम शांती आणि आपूलकी असते तिथं लक्ष्मी राहत असते...

    -:-स्वामी विवेकानंद-:-

    No comments:

    Post a Comment

    Menu

    Contact Form

    Name

    Email *

    Message *